⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या

Inter-district transfers of primary teachers in Zilla Parishad

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यां ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत दिनांक ०७.०४.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर धोरणानुसार सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आलेली आहे. सदर प्रक्रीया राबविताना विविध शिक्षक संघटनाकडून प्राप्त झालेली निवेदने व न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता, सन २०२३ साठी आंतरजिल्हा / जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेबाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा सुचविण्याकरिता दि. १४.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट गठीत करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासगटाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनानुसार दि.०७.०४.२०२१ रोजीच्या आंतरजिल्हा बदली बाबतच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वंतत्रपणे सुरु आहे.

सन २०२३ साठी आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने खालील मुद्यांनुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

  • १. निव्वळ रिक्तपदांची यादी (Clear Vacancy )
  • २. शिक्षकांचे रोस्टर (बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे.
  • ३. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणारे जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत अशा शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घेणे.
  • ४. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनुसुचित जमातीचे शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचे आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी करुन त्यांना संमतीपत्र देणे.
  • ५. सन २०२३ च्या आंतरजिल्हा बदली प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरुन काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास अशा आदेशांची प्रत, मुळ याचिकेचे प्रत गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना देणे. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम