⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षण संचालनालयाच्या योजनांची माहिती शाळा, विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कालबध्द कार्यक्रमाची आखणी

शिक्षण संचालनालयाच्या योजनांची माहिती शाळा, विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कालबध्द कार्यक्रमाची आखणी

शिक्षण संचालनालयाच्या योजनांची माहिती शाळा, विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी कालबध्द कार्यक्रमाची आखणी

दिनांक १२ एप्रिल २०२३ ते २५ एप्रिल २०२३ या कालावधीत पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर येथे विभागस्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक व त्यांचे अधिनस्त शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक / योजना) सर्व प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी म.न.पा, न.पा, सर्व, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, अधीक्षक या सर्व क्षेत्रिय अधिका-यांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये योजना संचालनालयाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती पी.पी.टी द्वारे सविस्तरपणे देण्यात आली आहे. तसेच या अनुषंगाने योजना माहितीपुस्तिका, योजना घडीपत्रिका, योजना तपासणीसूची हार्डकॉपी आणि सॉफटकॉपी मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिवाय कार्यशाळांमध्ये क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले आहे.

विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना अधिकाधिक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करणेबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१) सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी आपल्या जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा जिल्हास्तरावर आयोजित करुन त्यात सर्व योजनांची माहिती देण्यात यावी. अशा बैठकांना विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक व योजना), उपशिक्षणाधिकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करावयाचे आहे. या बैठका मे, २०२३ अखेरपर्यंत घेता येतील. मे अखेरपर्यंत घेता न आल्यास जिल्हास्तरावर शनिवार दिनांक १७ जून २०२३ रोजी कार्यशाळा घ्यावी.

२) गटशिक्षणाधिकारी यांनी तालुका स्तरावर सर्व माध्यम व सर्व व्यवस्थानांच्या प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करुन त्या बैठकांमध्ये योजनांची सविस्तर माहिती पीपीटी द्वारे दयावी. या बैठकांना विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन करावयाचे आहे. या बैठका शनिवार दिनांक १७ जून २०२३ रोजी विदर्भ वगळता महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिल्हयांनी घ्यावयाच्या आहेत. तर विदर्भातील जिल्हयांनी या बैठका शनिवार दिनांक १ जुलै २०२३ रोजी घ्यावयाच्या आहेत.

३) जिल्हा/तालुका स्तरांवरील बैठका झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी शाळांस्तरावर सर्व पालकांची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये सर्व योजनांची माहिती दयावयाची आहे. शाळास्तरावर योजनांबाबतच्या पालकसभा विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात जूनच्या चौथ्या आठवडयात व विदर्भामध्ये जुलै, २०२३ च्या पहिल्या आठवडयात घ्यावयाची आहे. योजनांचा अधिकाधिक प्रचार होण्यासाठी प्रिन्ट मिडिया, सोशल मिडिया यांचा उपयोग करून घेता येईल. आकाशवाणी व वृत्तपत्रामध्ये योजनांबाबत मोफत प्रसिध्दी द्यावी.

४) योजना संचालनालयाने तयार केलेल्या योजनांची घडीपत्रिका शाळांच्या दर्शनी भागात / शाळेच्या काचफलकात लावण्याबाबत शाळांना सूचना देण्यात याव्यात. तसेच योजनांबाबतचे मोठे फलक (फलेक्स्) स्वनिधीतून लावण्याबाबत शाळांना प्रोत्साहित करावे.

५) केंद्र व राज्य पुरस्कृत विविध शिष्यवृत्यांसाठी पात्र लाभार्थी निश्चित करण्याकरिता शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासूनच कामकाज सुरु करण्याबाबत शाळांना सूचना देण्यात याव्यात. कोणकोणत्या योजनांसाठी संबंधित शाळांतील विद्यार्थी पात्र आहेत, याचा आढावा घ्यावा आणि योजनांबाबत मार्गदर्शन करावे.

६) विविध योजनांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याबाबतही शाळास्तरावरुन पालकांच्या सभेत सूचना देण्यात याव्यात. योजनांबाबत पालकांच्या शंकांचे समाधान करावे.

७) जिल्हा/तालुकास्तरावर घ्यावयाच्या कार्यशाळासाठीचे वेळापत्रक तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी व त्याची प्रत योजना संचालनायास पाठवावी. जिल्हास्तरावरील कार्यशाळेचे इतिवृत्त शिक्षणाधिकारी (योजना) यांनी कार्यशाळा संपल्यानंतर ८ दिवसांत या संचालनालयास सादर करावे तर तालुकास्तरावरील कार्यशाळा / बैठकांचे इतिवृत्त गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी, योजना यांचेकडे कार्यशाळा संपताच ८ दिवसांत सादर करावे. माध्यमिक शाळांच्या पालकसभेचे इतिवृत्त शाळांनी शिक्षणाधिकारी, माध्यमिक व योजना यांचेकडे ८ दिवसांत सादर करावे. प्राथमिक शाळांच्या पालकसभेचे इतिवृत्त शाळांनी गटशिक्षणाधिकारी यांचेकडे ८ दिवसांत सादर करावे व म.न.पा शाळांचे इतिवृत्त शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी म.न.पा यांचेकडे ८ दिवसांत सादर करावे. नगरपालिका शाळांतील पालकसभांचे इतिवृत्त प्रशासन अधिकारी न.पा यांचेकडे शाळांनी ८ दिवसात सादर करावे.

८) योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची निवडक छायाचित्रे, वृत्तपत्र कात्रणे, व्हीडीओ/ रिल्स् 'शिक्षणाधिकारी (योजना) महाराष्ट्र' या What's App Group वर शिक्षणाधिकारी, योजना / माध्यमिक यांनी वेळोवेळी प्रकाशित करावीत.

शिक्षण संचालनालयाच्या योजनांची माहिती परिपत्रक Download


संचालनालय योजना यांचेकडील कामकाज योजनेचे नाव

प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून वर्ग करण्यात येणा-या योजना

१.       सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना

२.      प्राथमिक शाळेतील पुस्तक पेढी योजना

३.     जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा (मोफत गणवेश व साहित्य पुरवठा)

४.      राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या १०३ विकास गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके

५.     राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या १२० विकास गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मोफत गणवेश व लेखनसाहित्य पुरवठा

६.     इयत्ता पहिली ते चौथीमधील प्राथमिक शाळेत शिकणा-या मुलींना उपस्थितीभत्ता

७.      शालेय पोषण आहार योजना

८.     राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

९.     जिल्हा बालभवन योजना

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून वर्ग करण्यात येणा-या योजना

१०.  इयत्ता दहावी पर्यंत सर्वांना मोफत शिक्षण

११.    इयत्ता बारावी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण

१२.   ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न रु.एक लाखापेक्षा अधिक नाही, अशा इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना फी माफी

१३.  प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

१४.   माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच शिक्षणशास्त्र पदविका विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरांवरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

१५.  स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती

१६.  माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलत

१७.   आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन

१८.  अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी / प्रतिपूर्ती

१९.  शिक्षणशास्त्र पदविका पाठ्यक्रमाकरिता मुलींना मोफत शिक्षण

२०. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी त्यांच्या मुलांना शैक्षणिक सवलत

२१.   माध्यमिक पुस्तकपेढी योजना

२२. राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना

२३. राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्त्या

२४. माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या ग्रामीण भागातील हुशार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती

२५. माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक शाळा

२६. माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्त्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सहाय्य

२७.  माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्त्या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने

२८. कनिष्ठ महाविद्यालयातील खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती

२९. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

३०.भाषा विकास संस्कृत शिक्षण माध्यमिक शाळांमध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती

३१.  माध्यमिक शाळेतील मुलींना राष्ट्रीय योजनेतून रु.३०००/- प्रोत्साहन भत्ता

३२. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना

३३.दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना

३४. अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडील योजना

३५.अल्पसंख्यांक समाजाच्या संस्था/शाळांसाठी पायाभूत विकास योजना

३६.मदरशांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे योजना

३७. मराठी भाषा फाऊंडेशन योजना

केंद्र शासनाच्या नवीन योजना

३८.बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजना

३९. नव भारत साक्षरता कार्यक्रम

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम