⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिक्षक प्रेरणा परीक्षा (Shikshak Prerana Pariksha) आयोजन- औरंगाबाद विभाग

शिक्षक प्रेरणा परीक्षा (Shikshak Prerana Pariksha)

शिक्षक प्रेरणा परीक्षा आयोजन- औरंगाबाद विभाग

शिक्षक प्रेरणा परीक्षा (Shikshak Prerana Pariksha) आयोजनाच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही

  • 1) परीक्षा ही वैश्विक स्वरूपाची असेल परंतु प्रस्तुत परीक्षेच्या निकालानिरुप कुठलीही कारवाई शिक्षकांवर केली जाणार नाही याची शिक्षक जाणीव करून देऊन अधिकाधिक शिक्षक परीक्षेस प्रविष्ठ होतील व आपली विषयज्ञान पातळी आजमावून स्वयंअध्ययन करतील याअनुषंगाने कार्यवाही करावी 
  • 2) परीक्षाठी विदिनिष्ठ केलेला अभ्यासक्रम सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावा. 
  • 3) जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्रशासनाच्या इ. 1 ते 10 वी पर्यंत अध्यापन करणारे शिक्षक यांना शिक्षक प्रेरणा परीक्षेत सहभागी करून घ्यावे.
  • 4) शिक्षक परीक्षाथ्र्यांना बैठक क्रमांक दयावा. बैठक क्रमांकास जिल्ह्याच्या आद्याक्षरापासून सुरुवात करावी. (उदा. औरंगाबाद A-1, जालना J-1. याप्रमाणे)
  • 5) परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर परीक्षा केंद्र संख्या निश्चित करावी 
  • 6) परीक्षेची प्रश्नपत्रिका विभागस्तरावरून A, B, C या संघाप्रमाणे तयार करून दिली जाईल.
  • 7) जिल्हयाने परीक्षार्थी शिक्षकांच्या प्रमाणात प्रती तयार करून घेऊन परीक्षेचे नियोजन करावे (प्रश्नपत्रिका या A, B, C या संघाप्रमाणे असतील. त्याप्रमाणे शिक्षक परीक्षार्थीना त्या वितरित कराया सलगच्या दोन शिक्षकांना समान संचाच्या प्रश्नपत्रिका मिळणार नाही. याप्रमाणे आसन व्यवस्था करावी,
  • 8) प्रश्नपत्रिकेवर परीक्षार्थी यांचा आसन क्रमांक नमुद करावा, तसेच उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीच्या प्रश्नपत्रिकेचा क्रमांक नमुद करावा. प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडिंग करावे. विभागात परीक्षेसाठीचा दिनांक व वेळ ही सर्व जिल्हयांसाठी एकच असेल.
  • 9) परीक्षेचा दिनांक व वेळ, विहीत प्रपत्रे, पेपर तपासणीचा दिनांक स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.
  • 10) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र या विषयांवर प्रत्येकी 50 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल
  • 11) प्रत्येक प्रश्नपत्रिका ही 50 प्रश्न असलेली वस्तुनिष्ठ स्वरूपाची व 50 गुणांची असेल, प्रत्येक प्रश्नास 01 गुण दिला जाईल
  • 12) चुकीच्या एका उत्तरासाठी 0.5 गुण वजा केले जातील.
  • 13) परीक्षेची वेळ ही प्रत्येक विषयासाठी 01 तासांची असेल. 
  • 14) परीक्षेकामी पर्यवेक्षक केंद्रसंचालक याची नियुक्ती जिल्हा संनियंत्रण समिती करेल
  • 15) उत्तरपत्रिका या ओएमआर मशीनवर तपासल्या जातील अशा स्वरूपाच्या असतील.
  • 16) उत्तरपत्रिकाची छपाई ही जिल्हास्तरावर केली जाईल.
  • 17) उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थीचे आसन क्रमांक नोंदवून घेतला जाईल. 
  • 18) उत्तराच्या योग्य पर्यायावर गोल करण्यासाठी काळ्या शाईच्या पेनचा वापर करावा.
  • 19) उत्तर पत्रिकेवर उत्तर नोंदवितानाच्या व इतर नोंदीच्या सूचना उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर देण्यात याव्यात.
  • 20) परीक्षा संपन्न झाल्यानंतर परीक्षार्थीची उपस्थिती यादी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या पर्यवेक्षक केंद्रसंचालकांकडे जमा करतील. केंद्रसंचालक या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व उपस्थिती अहवाल स्वतंत्ररित्या सीलबंद करून जिल्हा कक्षाकडे सुपूर्द करतील.
  • 21) परीक्षा संपन्न झाल्यानंतर जिल्हा कक्ष प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करेल. तसेच ओएमआर मशीनच्या सहाय्याने उत्तरपत्रिकांची तपासणी करून परीक्षार्थीनी संपादन केलेल्या गुणांची विषयनिहाय यादी तयार करेल, (गुणांची यादी करत असतांना ऋण गुण मिळालेल्या गुणांमधून विजा केले जातील व अंतिम निकाल तयार केला जाईल.) 
  • 22) परीक्षेमध्ये अंतिम गुणांच्या आधारे एकुण गुणांपैकी 50% व त्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या परीक्षार्थ्यास उत्तीर्ण ठरविले जाईल. अंतिम निकाल तयार झाल्यानंतर जिल्हास्तरावर गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या 50 परीक्षाधी नावे, उत्तीर्ण परीक्षार्थींची नावे व एकूण निकाल जिल्हास्तरावर घोषीत करावा.
  • 23) गुणानुक्रमे जिल्हयातून प्रथम येणान्या 50 परीक्षार्थीना सत्कारपूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करून CSR / सेस फंडातून भेटवस्तु देऊन जिल्हाधिकारी यांचे हस्ते सत्कार करावा.

शिक्षक प्रेरणा परीक्षेसाठी (Shikshak Prerana Pariksha) अभ्यासक्रम

इ. 5 वी ते 12 वी पर्यतच्या SCERT NCERT पाठ्य पुस्तकामधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी व जीवशास्त्र इ. विषयासंबंधीचा अभ्यासक्रम राहील. उपरोक्त प्रमाणे सर्व संबंधितांनी परीक्षेचे नियोजन करावे, तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व शिक्षकांचे निदर्शनास आणावा. परीक्षेची दिनांक व वेळ ही स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

परीक्षेची गोपनीयता व दर्जा राखण्याची जबाबदारी ही सर्व संबंधित जिल्हाधिकारी व कार्यकारी अधिकारी, जि.प यांची राहील. केलेल्या नियोजनास बाधा न पोहचता सर्व संबंधित मुख्यजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प हे आपल्या कल्पकेची भर घालून परीक्षा या अधिक सुरळीत व आनंददायी वातावरणात पार पाडणेस सक्षम राहतील.

जिल्हास्तरीय शिक्षक प्रेरणा परीक्षा (Shikshak Prerana Pariksha) संनियंत्रण समितीची कर्तव्ये जबाबदाऱ्या

  • 1. प्रस्तुत परीक्षा ही शिक्षकांना विषयज्ञानात पारंगत करून त्यांचे विषयज्ञान वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने घेण्यात येत असुन यापरीक्षेचा त्यांचे सेवाविषयक बाबीवर कुठलाही परिणाम होणार नाही. यादृष्टीने घेण्यात येत असलेसंबंधी संबंधितांना जाणीव करून दयावी.
  • 2. जिल्हा परिषद प्रशासनाच्या इ. 1ली ते इ.10 वी अध्यापन करणाऱ्या व शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची यादीसह संख्या अंतिम करावी. (याकामी शिक्षकांकडून अनुवेदन मागवून परीक्षेसाठी संख्या निश्चित करावी) 
  • 3. शिक्षक प्रेरणा परीक्षेस बसण्यास इच्छुक नसणाऱ्या शिक्षकांची यादी करुन संख्या निश्चित करावी. 
  • 4. विभागस्तरावरुन प्राप्त परीक्षार्थीच्या प्रमाणात छपाई करुन घ्यावी. (प्रश्नपत्रिकेचा A, B, C संघ विचारात घ्यावा) 
  • 5. परीक्षार्थीच्या प्रमणात उत्तरपत्रिकाची छपाई करावी. (OMR मशीनवर तपासणी केली जाईल )
  • 6. परीक्षा केंद्र निश्चिती करणे, परीक्षा दालनांवर पर्यवेक्षक केंद्रचालक झोनल ऑफीसर इ.ची नियुक्ती करणे,
  • 7. प्रत्येक परीक्षार्थीस बैठक क्रमांक देऊन केद्रांवर परीक्षार्थीची आसन व्यवस्था करणे 
  • 8. प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात परीक्षा केंद्रावर पोहोच करणे
  • 9. प्रश्नपत्रिका तपासणी करणे OMR मशीन्सची व्यवस्था करणे (ऋण गुण विचारात घेऊन निकाल तयार केला जाईल यापमाणे)
  • 10 परीक्षा पार पडल्यानंतर उत्तरपत्रिका सीलबंद स्वरूपात जिल्हा कक्षात जमा करून घेणे. 
  • 11. प्रत्येक उत्तरपत्रिकेस बारकोडींग करणे. 
  • 12 उत्तरपत्रिका ओएमआर मशीनवर तपासणी करून घेणे.
  • 13. जिल्हास्तरावर अंतिम निकाल तयार करणे, 50% पेक्षा अधिक गुण प्राप्त परीक्षार्थ्यांना उत्तीर्ण म्हणून घोषीत करने. 
  • 14 परीक्षेनंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तपासणी करून सीलबंद करून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करणे
  • 15. उत्तीर्ण परीक्षार्थीची यादी प्रसिद्ध करणे व त्यांचे करिता प्रमाणपत्र तयार करणे
  • 16. विहीत प्रपत्रात माहिती जिल्हा कक्षात ठेवणे. 
  • 17. परीक्षा कामांसाठी जसे (पानपत्रिका उत्तरपत्रिका छपाई परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाची नेमणूका करणे, केंद्रचालकाची नेमणूक करणे परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका पोहोच करणे, परत कार्यागात जमा करण परीक्षार्थी उपस्थिती जात तयार करणी, उत्तरपत्रिकांना बारकोडींग करणे, OMR मशीनवर उत्तरपत्रिकांची तपासणी करणे गुण विचारात घेऊन निकाल तयार करणे, विविध विहित प्रपत माहिती तयार करणे, परीक्षेच्या अनुषंगाने तदर्प कामे पार पाठ इ. कामांसाठी अतिरिक्त कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती करून विविध कामाची जबाबदारी सोपविणे.
  • 18. विभागीय स्तरावरुन देण्यात येणारा अभ्यासक्रम शिक्षकाच्या निदर्शनास आणणे. 

शिक्षक प्रेरणा परीक्षा (Shikshak Prerana Pariksha) आयोजनाचे उद्देश

  • शिक्षकांचे विषयज्ञान वृद्धिंगत व्हावे
  • त्यांना स्वयंअध्ययनाची गोडी लागावी
  • विषयज्ञान वृद्धिंगत होण्याची संधी निर्माण व्हावी. 
  • स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी. 
  • विद्यार्थ्यांना चौफेर अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकाची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावी

या हेतूने शिक्षक प्रेरणा परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम