⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

बोधकथा - वाघाचे कातडे पांघरलेला गाढव

बोधकथा- वाघाचे कातडे पांघरलेला गाढव

बोधकथावाघाचे कातडे पांघरलेला गाढव

देवपूर येथे विलास नावाचा धोबी राहात होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. त्याला नीट खाऊ घालणे धोब्यास परवडत नव्हते तेवढी त्याची ऐपत नव्हती. त्याने युक्ती केली कुठून तरी वाघाचे कातडे मिळवले. रात्री तो ते कातडे गाढवाच्या अंगावर नीट बांधून देईमग तो रात्री कोणाच्याही शेतात जाईवाघ आला असे म्हणून सगळे पळून जातमग ते गाढव मोकळ्या मनाने कोठेही फिरे आणि पोटभर चरत असे. असे खूप दिवस होऊन गेले. एक दिवस शेतकरी मचाणीवर बसला होता. त्याने या खोट्या वाघाला दुरून पाहिले होते. त्याने आपल्या गोफणीने एक मोठा दगड वाघाला मारला. तो दगड गाढवाच्या डोक्यावर बसला. गाढव मोठमोठ्याने ओरडू लागलेते ओरडणे ऐकताच शेतकऱ्याने आपल्या मित्रांना बोलावून त्या गाढवाला बडवू लागला. नंतर त्या गाढवाला त्यांनी शेताबाहेर हाकलून दिलेआणि हसत हसतच ते तिघे म्हणाले, 'आपण उगीचच वाघ समजून गाढवाला घाबरत होतो'.

तात्पर्य : उसने अवसान जास्त वेळ राहात नाही. सत्य स्थिती केव्हाही बाहेर येते.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम