⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

केंद्रप्रमुख भरती विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ अर्ज करण्यास सुरुवात | Kendra Pramukh Bharti Exam 2023

kendra pramukh bharti 2023,kendra pramukh bharti 2023,kendra pramukh bharti,kendrapramukh bharti 2022 maharashtra,kendrapramukh bharti 2022,kendra pramukh bharti 2021,kendrapramukh bharti 2022 maharashtra,kendrapramukh bharti 2022 maharashtra,kendrapramukh bharti 2022

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ | Kendra Pramukh Departmental Limited Competitive Exam 2023

केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये घेण्याचे नियोजित होते. परंतू मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका दाखल झालेल्या होत्या. त्यामुळे शासन पत्र संकिर्ण २०२२/ प्र.क्र. ८१/ टीएनटी-०१, दि. २० जून २०२३ अन्वये मान्यता मिळाल्यानुसार मा. न्यायालयीन दाखल याचिका व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानुसार शासन निर्णय संकिर्ण २०२२/ प्र.क्र.८९/ टीएनटी-०१, दि. २७ सप्टेंबर, २०२३ अन्वये सदर परीक्षेच्या अर्हतेबाबत सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार असून परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे www.mscepune.in या संकेतस्थळावर दि. ०१ / १२ / २०२३ ते दि. ०८ / १२ / २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क भरण्याची कार्यवाही करावी. यापूर्वी सर्व पात्रतेसह यशस्वीरीत्या ऑनलाईन पध्दतीने योग्य शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा २०२३ परिपूर्ण  ibps paper pattern course - http://courses.aapalathakare.com/

तसेच मा. न्यायालयाच्या आदेशान्वये ज्या उमेदवारांनी ईमेलव्दारे माहिती पाठवून परीक्षा शुल्काचा भरणा केला आहे, अशा उमेदवारांचे पडताळणी करुन त्यांच्या बँक खाते क्रमांकावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत सदरील परीक्षा शुल्क यथावकाश परत करण्यात येईल. तथापि सदर उमेदवारांनी पुनश्चः ऑनलाईन आवेदनपत्र व शुल्क दिलेल्या मुदतीत भरणे बंधनकारक राहील.

केंद्र प्रमुख भरती whats app ग्रुप जॉईन करा.

केंद्रप्रमुख भरती २०२३ अर्ज लिंक  

क्लस्टर हेड (केंद्रप्रमुख) ची भरती

तपशील कालावधी
ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - https://ibpsonline.ibps.in/mscepapr23
ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक- ०१/१२/२०२३ ते दिनांक ०८/१२/२०२३
ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक - दि. ०८/१२/२०२३ रोजी २३:५९ वाजे पर्यंत.
ऑनलाईन परीक्षा दिनांक विहित कालावधी - परीक्षा दिनांक यथावकाश

kendrapramukh bharti,kendrapramukh bharti 2023,kendrapramukh bharti 2022 maharashtra,kendrapramukh bharti 2022,kendra pramukh bharti 2021,kendrapramukh bharti 2023,kendrapramukh bharti 2022 maharashtra,army bharti 2022 date,kendrapramukh bharti 2022 maharashtra,kendrapramukh bharti 2022

केंद्रप्रमुख पात्रता

·        फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प. / न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

·        जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

किंवा

·        प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, त्या दिनांकापासून ३ वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे.

·        विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा ५० वर्ष राहील.

·        विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी पात्र राहतील.

केंद्रप्रमुख परीक्षा योजना:

·        परीक्षेचे टप्पे :- एक - लेखी परीक्षा

·        परीक्षेचे स्वरूप:- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

·        प्रश्नपत्रिका:- एक

·        एकुण गुण:- २००

केंद्रप्रमुख लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम:

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील:

kendrapramukh bharti,kendrapramukh bharti 2023,kendrapramukh bharti 2022 maharashtra,kendrapramukh bharti 2022,kendra pramukh bharti 2021,kendrapramukh bharti 2023,kendrapramukh bharti 2022 maharashtra,army bharti 2022 date,kendrapramukh bharti 2022 maharashtra,kendrapramukh bharti 2022

अनुक्रमांक 2 मधील उपघटकांचे

उपघटक 1 : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक शासन निर्णय

  • अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह) 
  • ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, 2011 (अद्ययावत दुरस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी. 
  • क) बाल हक्क संरक्षण कायदा, 2005- बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता. 
  • ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती. 
  • इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना.

उपघटक 2 : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ. 

उपघटक 3 : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

उपघटक 4 : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र

फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक 5 : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे. 

ड) संप्रेषण कौशल्य : समाज संपर्काची विविध साधने

उपघटक 6 : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान

ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.

केंद्रप्रमुख निवड प्रक्रिया :

लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. ६.२ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दत:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://ibpsonline.ibps.in/mscepapr23 या लिंकव्दारे विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे आवश्यक आहे.

केंद्रप्रमुख भरती २०२३ अर्ज लिंक

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

  आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम