⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मीपा (MIEPA) मार्फत “शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन” या विषयावर, फ्री ऑनलाईन कोर्स

school leadership and management,school leadership and management pdf,school leadership and management courses online,school leadership and management journal,school leadership and management courses,school leadership and management ppt,school leadership and management in hindi,school leadership and management book pdf,school leadership and management proposed action,school leadership and management support needed

मीपा मार्फत शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापनया विषयावर, फ्री ऑनलाईन कोर्स- मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच भावी मुख्याध्यापक यांच्यासाठी

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मीपा), औरंगाबाद यांच्या मार्फत मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच भावी मुख्याध्यापक यांच्यासाठी शालेय प्रशासन व नियोजन या संदर्भात मोफत ऑनलाईन कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्समध्ये शालेय नियोजन व व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर अगदी सखोल व सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कोर्स पूर्ण झाल्यावर निपा, नवी दिल्ली यांच्यामार्फत ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापनावरील ऑनलाइन कार्यक्रमासाठी नोंदणी इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, आसामी, मिझो, तेलुगु, गुजराती आणि मल्याळममध्ये खुली आहे.

शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन या FREE ONLINE COURSE साठी नोंदणी करण्याकरिता स्टेप्स

  1. सर्वप्रथम www.pslm.niepa.ac.in (http://www.pslm.niepa.ac.in/या वेबसाईट ला भेट द्या.
  2. वेबसाईट ओपन झाल्यावर स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात रजिस्टर नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. आता new अकाउंट चा फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये आपली युजर आय डी व पासवर्ड सेट करा व विचारलेली आपली संपूर्ण माहिती भरा. जसे, इ मेल आय डी, नाव, पत्ता, लिंग, शाळेचे नाव, यु डाईस नंबर, माध्यम इत्यादी.
  4. सर्व माहिती सविस्तर भरून झाली की शेवटी सबमिट या टॅब वर क्लिक करा.
  5. आता आपण वर दिलेल्या e-mail वर एक लिंक पाठवली जाईल.
  6. ती लिंक ओपन करा व आपले रजिस्ट्रेशन कन्फर्म (Registration Confirmation) करा.
  7. वरील स्टेप follow केल्यास या कोर्सकरिता आपली नोंदणी / रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

कोर्सला सुरवात कशी करावी?

  • सर्वप्रथम www.pslm.niepa.ac.in (http://www.pslm.niepa.ac.in/या वेबसाईट ला भेट द्या.
  • आता स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात रजिस्टर च्या बाजूलाच लॉगइन Login हा पर्याय असेल, त्यावर क्लिक करा.
  • आता ओपन झालेल्या डॅशबोर्डवर आपण रजिस्ट्रेशन करताना जी युजर आय डी व पासवर्ड वापरला होता, तोच आय डी व पासवर्ड या ठिकाणी टाईप करा.
  • शेवटी खाली दिलेल्या Login या टॅबवर क्लिक करा.
  • आता आपण मुख्य डॅश बोर्डवर प्रवेश करू.
  • आता वेबसाईट च्या वरच्या बाजूला भाषेचा पर्याय दिलेला असेल, त्यामधून आपल्याला ज्या भाषेतून कोर्स पूर्ण करावयाचा असेल ती भाषा निवडा.
  • आता आपल्यासमोर आपण निवडलेल्या भाषेत संपूर्ण माहिती दिसेल.
  • या कोर्समध्ये पायाभूत अभ्यासक्रम या सदराखाली एकूण आठ कोर्स दिलेले असतील.
  • दिलेल्या आठ कोर्सपैकी क्रमवार एकेक कोर्स ओपन करा.
  • प्रत्येक कोर्सवर क्लिक केल्यास सुरुवातीला प्रस्तावना दिसेल, ती काळजीपूर्वक वाचा. व शेवटी दिलेल्या स्टडी मटेरियल या टॅबवर क्लिक करा.
  • स्टडी मटेरियल वर क्लीक केल्यावर त्या कोर्सशी संबंधित उपघटक दिसतील, त्यांचे क्रमवार वाचन करा.
  • सर्व उपघटकांचे वाचन झाल्यावर स्टडी मटेरियल च्या खाली MCQ असा टॅब दिसेल त्यावर क्लिक करा.
  • MCQ मध्ये आपण आतापर्यंत वाचलेल्या घटकांवर आधारित काही वैकल्पिक प्रश्न असतील ते सोडवून घ्या.
  • अशाप्रकारे प्रत्येक कोर्समधील उपघटकांचे सविस्तर वाचन करून हा कोर्स तीन आठवड्यात म्हणजेच 21 दिवसांत पूर्ण करून घ्यावा.
  • कोर्स पूर्ण झाल्यानंतर, निपा, नवी दिल्ली मार्फत प्रमाणपत्र कोठून व कसे Download करावे ?
  • प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी वरीलप्रमाणे तीन आठवड्यांचा कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • कोर्स पूर्ण झाल्यावर दोन दिवसांनी याच वेबसाईटवर वरच्या बाजूला दिलेल्या Certificate या टॅबवर क्लिक करा.
  • आता आपले प्रमाणपत्र ओपन होईल. त्याखाली डाउनलोड सर्टिफिकेट Download certificate असा टॅब दिसेल त्यावर क्लिक केल्यास आपले प्रमाणपत्र डाउनलोड होईल.
  • अशाप्रकारे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राचार्य व जेष्ठ शिक्षक या कोर्ससाठी नोंदणी करून कोर्स पूर्ण करू शकतात. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

   आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम