⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

स्टार्स प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंतर्गत शाळास्तरावरील मेळावा क्र २ आयोजन

स्टार्स प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंतर्गत शाळास्तरावरील मेळावा क्र २ आयोजन  School Level Melava No. 2 under STARS Project Shala Purv Tayari Abhiyan 2023

स्टार्स प्रकल्पांतर्गत शाळापूर्व तयारी अभियान २०२३ अंतर्गत शाळास्तरावरील मेळावा क्र २ आयोजन

School Level Melava No. 2 under STARS Project Shala Purv Tayari Abhiyan 2023

स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी मागील वर्षापासून शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आगामी शैक्षणिक वर्षात राज्यातील इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल पात्र मुलांची शंभर टक्के पट नोंदणी होऊन ते शाळेत नियमितपणे यावेत यासाठी राज्यस्तरावरून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळापूर्व तयारी अभियान मेळावा क्र .१ दिनांक २४ ते २९.०४.२०२३ दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यालयाचे संदर्भीय पत्र क्र.१ नुसार माहे जून २०२३ मध्ये शाळा सुरु झाल्यावर शाळापूर्व तयारी मेळावा क्र.२ चे शाळास्तरावर आयोजन करण्यात यावे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दि. २० ते ३० जून २०२३ या कालावधीमध्ये तर विदर्भातील शाळांमध्ये दि. १ ते ५ जुलै २०२३ या कालावधीमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.

शाळापूर्व तयारी अभियान माहिती 

मेळावा क्र.२ च्या आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना पुढीलप्रमाणे :

[१] शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन आयोजनाबाबत मार्गदर्शक सूचना क्रमांक १ जिल्ह्यातील सर्व जि.प./ मनपा / न पा च्या शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन आयसीडीएस विभागाच्या समन्वयाने करण्यात यावे.

[२] दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे मेळाव्याचा कालावधी साधारणपणे चार तासांचा असावा.

[३] शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

[४] मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दाखल पात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक दोन दिवस मेळावा बाबत वस्ती/ गाव स्तरावर प्रभात फेरी दवंडी देऊन समाज माध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर लावून जनजागृती करण्यात यावी व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील दाखलपात्र सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

मेळाव्यामध्ये सात स्टॉल लावले जावेत सर्व स्टॉलवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांक २ च्या रकाण्यात करण्यात याव्यात. सात स्टॉल पुढील प्रमाणे १. नोंदणी रजिस्ट्रेशन २. शारीरिक विकास सूक्ष्म व स्थूलच स्नायू विकास ३. बौद्धिक विकास ४. सामाजिक व भावनात्मक विकास ५. भाषा विकास ६ गणन पूर्वतयारी ७ बालकांना मार्गदर्शन.

[५] उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार

शाळापूर्व तयारी अभियान 2023-24 चे माहिती संकलन

[६] सर्व BEO, CDPO, शि. वि. अ.. केंद्र प्रमुख यांची सहविचार यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक दोनचे आयोजन करावे.

[७] केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन करावे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळा स्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

[८] मेळावा संदर्भातील फोटो व्हिडिओ इत्यादी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करताना #शाळापूर्वतयारीअभियान२०२३ #ShalapurvaTayariAbhiyan2023,#ShalapurvaTayari2023  या हॅशटॅग चा उपयोग करावा तसेच मेळाव्या संदर्भात प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT महाराष्ट्राच्या https://www.facebook.com/mahascert व डाएट या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे.

[९] मेळाव्यात उपस्थित बालके, पालक, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक यांची सांखिकीय माहिती आपल्या स्तरावर संकलित करण्यात यावी.

[१०] शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक दोन चे आयोजन सुस्थितीत व्हावे याकरिता सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास मेटी द्याव्यात.

[११] जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे मेळाव्याच्या दिवशी शाळांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात यावे.

[१२] शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे तसेच शाळापूर्व तयारी मेळाव्यांचा योग्य प्रचार व प्रसार करण्यात यावा.

[१३]. शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक दोनच्या दिवशी आपल्या तालुक्यातील सर्व माननीय लोकप्रतिनिधी सर्व माननीय शासकीय अधिकारी यांना मेळावा उद्घाटनासाठी आपल्या स्तरावरून आमंत्रित करावे.

[१४] शाळा पूर्वतयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाशी तसेच विद्या प्रवेश मॉड्युलशी करावी. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम