⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा- २०२३ मराठी विज्ञान परिषद, मुंबई अतंर्गत आयोजित

science essay competition 2023,science writing competition 2023,scientific writing competition 2023,computer science essay competition 2023,science writing competition 2023,scientific writing competition 2023,science essay competition 2023,science communication competition 2023,computer science essay competition 2023,scientific writing competition 2023

मराठी विज्ञान परिषद, मुंबई अतंर्गत वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा- २०२३ आयोजित 

Organized under "Annual Science Essay Competition- 2023" under Marathi Science Council, Mumbai

विज्ञान व्यक्त करायला मराठी भाषा समृद्ध करणे, या परिषदेच्या उद्देशाला धरून परिषद १९६७ सालापासून विज्ञान निबंध स्पर्धा घेत आहे. या स्पर्धा विद्यार्थी गट (बारावीपर्यंतचे विद्यार्थी) आणि खुला गट (बारावीपुढचे विद्यार्थी व प्रौढ) असे दोन गट आहेत.

निबंधांसाठी शब्दमर्यादा १५०० ते २००० असून निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. निबंध पाठवायला प्रत्येक भौगोलिक विभागात परिषदेच्या एका विभागाची निवड केलेली आहे.

१. विद्यार्थी गट - विषय : शिक्षणाचे डिजिटायझेशन

२. खुला गट - विषय : पंचाहत्तर वर्षातील भारताची वैज्ञानिक प्रगती

विद्यार्थी गट –

विषय : शिक्षणाचे डिजिटायझेशन

आपल्या दैनंदिन जीवनातील सगळ्याच क्षेत्रांत अंकीय (डिजिटल) पद्धतींचा व त्यावर आधारित उपकरणे / यंत्रे यांचा वापर वाढत असून शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. कोविड-१९मुळे अचानक या मार्गाचा वापर अपरिहार्य म्हणून अंगीकारावा लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना स्वीकारलेली आभासी शिक्षणाची पद्धत आणि पूर्वापार चालत आलेली विद्यार्थी व शिक्षक समक्ष उपस्थित राहून दिली जाणारी शिक्षणाची पद्धत,यांत बराच फरक आहे दोन्ही पद्धतींचे फायदेतोटे आहेत,तसेच मर्यादा आहेत.

यामधून सुवर्णमध्य काढण्यासाठी (अगदी१००टक्के नसला तरी अशा मर्यादित डिजिटायझेशनचा उपयोग शिक्षणात चांगल्या प्रकारे कसा करता येईल, तसेच प्रत्यक्ष अनुभव, एकमेकांशी संवाद, क्षेत्रभेटी यांचा समावेश कसा करता येईल, याविषयी विचार निबंधात अपेक्षित आहेत. सध्या शिक्षण घेत असलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना या दोन्ही पद्धतींचा अनुभव आहे, हे इथे ध्यानात घेतले आहे.

खुला गट - 

विषय : पंचाहत्तर वर्षातील भारताची वैज्ञानिक प्रगती

दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर लोकशाही व्यवस्था स्वीकारून देशाने आपला कारभार आपणच करायला सुरुवात केली. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अन्नधान्य उत्पादन, उद्योग, दळणवळण,संदेशवहन इत्यादी अनेक क्षेत्रांत देश म्हणून आपण खूप मागे होतो.मात्र, या व अशा विविध क्षेत्रांत भारताने गेल्या पंचाहत्तर वर्षांत लक्षणीय प्रगती केली आहे. या प्रगतीत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता, दूध उत्पादनात भरीव प्रगती,दळणवळणाच्या क्षेत्रात रस्ते वाहतुकीपासून ते हवाई वाहतुकीपर्यंत, संदेशवहनाच्या क्षेत्रात साध्या एका जागी बसवलेल्या दूरध्वनीपासून ते स्मार्ट फोनपर्यंत, वस्त्रोद्योगातील प्रपती, संरक्षण व बांधकाम क्षेत्र इत्यादी अनेकानेक क्षेत्रांत आपण मोठी मजल मारली आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्र, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, 7/16 या व अशा अनेक संस्थांनी देदीप्यमान कामगिरी केलेली आहे. या सगळ्या प्रगतीचा सम्यक आढावा या निबंधात अपेक्षित आहे.

निबंध स्पर्धेसाठी नियम आणि अटी :

१. विद्यार्थी गट : इयत्ता बारावीपर्यंतचे विद्यार्थी.

२. खुला गट : इयत्ता बारावीपुढचे विद्यार्थी आणि प्रौढ.

३. एकाच गटात दोनदा पारितोषिक मिळाले आहे अशा व्यक्तीस पुन्हा पारितोषिक दिले जाणार नाही. ४. निबंधांसाठी शब्दमर्यादा १,५००-२,०००अशी आहे. तसेच,कागद ए-४ आकाराचाच वापरावा.

५. स्पर्धकाने पहिल्या पानावर आपले पूर्ण नाव,पिनकोडसह पोस्टाचा संपूर्ण पत्तो,भ्रमणध्वनी क्र आणि इ-मेल लिहावा.

६. स्पर्धेसंबंधी मराठी विज्ञान परिषदेचा निर्णय अंतिम राहील.

७. दोन्ही गटांचे निबंध प्रथम भौगोलिक विभाग पातळीवर तपासले जातील. भौगोलिक विभाग पुढीलप्रमाणे :

  • ·        मुंबई व कोकण (जिल्हे : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
  • ·        दक्षिण महाराष्ट्र (जिल्हे : अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर)उत्तर महाराष्ट्र (जिल्हे : नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार) मराठवाडा (जिल्हे : औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर व उस्मानाबाद)
  • ·        विदर्भ (जिल्हे : बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली)
  • ·        बृहन्महाराष्ट्र (महाराष्ट्राबाहेरचे सर्व स्पर्धक)

८. मराठी विज्ञान परिषदेच्या संबंधित विभागाकडे (भौगोलिक) निबंध पाठविण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३.

९. भौगोलिक विभागस्तरावर निबंधांचे परीक्षण करून, त्यांतून दोन्ही गटांतून - गुणानुक्रमे - प्रत्येकी दोन निबंध निवडले जातील.

१०. या निवडलेल्या निबंधांतून राज्यस्तरीय पातळीवर अंतिम परीक्षण करून प्रत्येक गटातून दोन निबंध निवडले जातील.

पारितोषिके पुढीलप्रमाणे :

11. अंतिम परीक्षणानंतर दोन्ही गटांतील विभागीय विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके दिली जातील : 

  • शालेय गट : प्रथम क्रमांक रु ८००/-, द्वितीय क्रमांक रु.४००/-
  • खुला गट : प्रथम क्रमांक रु १,०००/-, द्वितीय क्रमांक रु. ५००/-

१२. राज्यपातळी विजेते पारितोषिके पुढीलप्रमाणे :

  • विद्यार्थी गट : प्रथम क्रमांक रु.२,०००/- द्वितीय क्रमांक रु. १,५००/-
  • खुला गट : प्रथम क्रमांक रु.२,५००/- द्वितीय क्रमांक रु. २,०००/-


अधिक माहितीकरिता : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई - ४०० ०२२.
दूरध्वनी : (०२२) २४०५ ४७१४, २४०५७२६८
संकेतस्थळ : http://mavipa.org 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम