उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ,Increase in scholarship amount of the scheme
उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा
योजना या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ
Scholarship Exam Scheme Increase in scholarship amount of
the scheme
scholarship amount of the scheme उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) पास
झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्षाकरीता व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा
(इयत्ता ८ वी) पास झाल्यानंतरच्या वर्षापासून २ वर्षाकरीता शिष्यवृत्ती देण्यात
येते. तथापि, विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येणारी
शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने तसेच सदर शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये गेल्या १३
वर्षांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
१. “उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा
शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ
करून ती उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ५ वी) सर्व संचांकरीता रू. ५००/- प्रतिमाह
प्रमाणे (रू. ५०००/- प्रतिवर्ष) व माध्यमिक शाळा (इयत्ता ८ वी ) सर्व संचाकरीता
रू. ७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रू. ७५००/- प्रतिवर्ष) इतकी निश्चित करण्यास मान्यता
देण्यात येत आहे.
२. शिष्यवृत्तीचे सुधारीत दर सन २०२३-२४ पासून लागू
राहातील.
३. “उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा
शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल
करण्यात येत नसून केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक २२.०७.२०१० रोजीच्या शासन निर्णयाचे सहपत्र ई व एफ मध्ये नमूद संच एच (H) व संच आय (1) करीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात येत आहे.
शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ .pdf
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS