राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शासन आदेश ; या जिल्ह्यातील शाळांना असेल सुट्टी
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शासन आदेश ; या जिल्ह्यातील शाळांना असेल सुट्टी
१९ जुलै २०२३ ज्याअर्थी, कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडुन
पूरस्थिीती निमार्ण झाली आहे. तसेच येणा-या तीन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता
वर्तवण्यात आली आहे. त्याअर्थी, माननीय
मुख्यमंत्री महोदयांनी कोकणातील दि. २० जुलै, २०२३ रोजी अनुक्रमे ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
संबंधित जिल्हाधिकारी यांनी यास
अनुसरून त्यांच्या स्तरावर आज रात्री दहाच्या आत आदेश काढून सर्व संबंधित शालेय
आस्थापनेस कळवावे, जेणेकरून
शाळा मुलांना व पालकांना वेळेमध्ये याची कल्पना होईल व त्याबाबतचा अनुपालन अहवाल
शासनास सादर करावा.
शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या
अनुषंगाने राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत आपल्या कार्यकक्षेतील स्थानिक
परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित
जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच
त्या-त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या
कार्यकक्षेतील/स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने
सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS