राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत राज्य मूल्यमापन कक्षातील विविध पदांकरीता निवड प्रक्रिया - २०२३
SCERT येथे राज्य मूल्यमापन कक्ष अंतर्गत प्रतिनियुक्ती पदांच्या निवड प्रक्रिया
STARS (Strengthening Teaching &
Learning and Results for States) प्रकल्प अंतर्गत
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य मूल्यमापन कक्ष स्थापन करणेबाबत संदर्भीय शासन
निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्य मूल्यमापन कक्षांतर्गत
विविध पदांवर नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर पदभरती
प्रतिनियुक्ती अथवा कंत्राटी तत्त्वावर करण्यात येणार आहेत. त्यानुसार पात्र व
इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन आवेदन पत्रे मागविण्यात येत आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदनपत्र https://forms.gle/nZ6mQXvEYDqHp9Lv7 या लिंकद्वारे सादर करावीत. आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्याचा कालावधी दि. 22 जुलै, 2023 ते 31 जुलै,2023 राहील.
राज्य मूल्यमापन कक्षातील कर्मचारी यांची निवड व नियुक्तीसाठी
अटी व शर्ती
प्रतिनियुक्तीद्वारे निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारास पुढील अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
1. प्रतिनियुक्ती स्वरूपातून नियुक्त करावयाच्या पदांसाठी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे शाळांतील शिक्षक / शालेय शिक्षण विभागातील
अधिकारी यांचेमधून मुलाखत अथवा अन्य निवड प्रक्रिया राबवून उमेदवारांची निवड
करण्यात येईल.
2. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आवेदनपत्रांची छाननी करुन, उमेदवारांना
पात्रता पडताळणी व मुलाखतीचे नियोजन कळविणेत येईल.
3. प्रतिनियुक्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील
(जि.प./ न.प./ म.न.पा.) प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी
(शिक्षण), गटशिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी /
अधिव्याख्याता / जेष्ठ अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी यांना
उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.
4. प्रतिनियुक्तीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सेवा
निवृत्तीस दोन वर्षे शिल्लक असल्यास प्रतिनियुक्तीस अर्ज करता येणार नाही.
5. प्रतिनियुक्तीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारास
जिल्हास्तरावर, विभागस्तरावर व राज्यस्तरावर विविध स्वरुपाचे काम
करण्याचा अनुभव असावा.
6. उमेदवारास संगणक ज्ञान असणे, मराठी
व इंग्रजी टायपिंग करता येणे आवश्यक आहे.
7. सदरची निवड ही राज्यशासनाच्या प्रतिनियुक्ती नेमणुकी
संदर्भातील प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येईल. मात्र प्रतिनियुक्तीचा
कालावधी STARS
प्रकल्प सुरु असे पर्यंत असेल अथवा STARS प्रकल्पाची
मुदत संपल्यानंतर शासनाने राज्य मूल्यमापन कक्ष सुरु ठेवण्यास मुदतवाढ दिल्यास
प्रतिनियुक्ती सुरु राहू शकेल.
8. प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये कोणताही विशेष भत्ता अनुज्ञेय
राहणार नाही.
9 प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे
वेतन व भत्ते मूळ आस्थापनेवरुन काढण्यात येतील.
10. सुरुवातीस प्रतिनियुक्ती कालावधी हा एक वर्षाचा असेल
त्यानंतर मूल्यमापन करण्यात येईल. मूल्यमापनातील प्रतिसादानुसार पुढील नियुक्ती
कालावधी वाढविण्यात येईल.
11. विषयतज्ज्ञ या पदावर प्रतिनियुक्तीसाठी निवड झाल्यास
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिलेल्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या पूर्ण करणे बंधनकारक राहील.
12. प्रतिनियुक्ती कालावधीमध्ये संबंधितांचे काम समाधानकारक
नसल्यास अथवा संस्थेच्या प्रतिमेस / हितास बाधा पोहोचेल असे गैरवर्तन केलेले
निदर्शनास आल्यास त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून मूळ आस्थापनेवर रुजू
व्हावे लागेल. तसेच अशा प्रसंगी प्रकरणपरत्वे आवश्यकतेनुसार कारवाई प्रस्तावित
करण्यात येईल.
13. प्रतिनियुक्तीने निवड झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र
नागरी सेवा रजा नियम १९८९ मधील तरतूदीनुसार देय ठरणाऱ्या नैमत्तिक, अर्जित
व वैद्यकीय रजा अनुज्ञेय राहतील. प्रतिनियुक्ती कालावधीत शिक्षकांना दीर्घ मुदत
सुटी लागू असणार नाही.
14. प्रतिनियुक्तीने अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कार्यरत
आस्थापनेवरील संनियंत्रण अधिकारी / सक्षम प्राधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र
मुलाखतीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
15. प्रतिनियुक्तीने विषयतज्ज्ञ या पदावर निवड झाल्यानंतर
रुजू होताना मूळ आस्थापनेकडील कार्यमुक्ती प्रमाणपत्र व विहित नमुन्यामध्ये
बंधपत्र भरुन देणे बंधनकारक राहील.
कंत्राटी पद्धत्तीने निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारास पुढील अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
1. कंत्राटी तत्तवावर नियुक्ती करावयाच्या पदांसाठी ऑनलाईन
स्वरुपात आवेदन पत्रे मागवून उमेदवाराची मुलाखत अथवा अन्य निवड प्रक्रिया करून
उमेदवारांची निवड करण्यात येईल.
2. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आवेदनपत्रांची छाननी करुन, उमेदवारांना
पात्रता पडताळणी व मुलाखतीचे नियोजन कळविणेत येईल.
3. कंत्राटी तत्वावर नियुक्तीसाठी या पत्रामध्ये विहित
अटींची पूर्तता करणाऱ्या पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरता येईल.
4. कंत्राटी स्वरुपात निवड ही ११ महिन्यांसाठी असेल.
5. कंत्राटी सेवेचा ११ महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्या
पदावर पुढील सेवेच्या कालावधीसाठी कोणताही हक्क असणार नाही. तसेच ११ महिन्यांच्या
आत STARS
प्रकल्पाची मुदत संपल्यास सेवा समाप्त करण्यात येईल अथवा STARS
प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर शासनाने राज्य मूल्यमापन कक्ष सुरु
ठेवण्यास मुदतवाढ दिल्यास ११ महिन्यापर्यंत सेवा सुरु राहू शकेल.
6. ११ महिन्याचा सेवा कालावधी पूर्ण झालेनंतर संबंधित
कर्मचाऱ्याचे काम समाधानकारक असल्यास, १ दिवसाचा खंड देऊन
(खंडाच्या दिवशी रविवार वा सार्वजनिक सुटी आल्यास पुढील
दिवस) वेळोवेळी (प्रकल्प पूर्ण होईपर्यंत अथवा राज्य मूल्यमापन कक्षास शासन
मान्यता असेपर्यंत) पुढील ११ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाऊ शकेल.
7. उमेदवारास संगणक ज्ञान असणे, मराठी
व इंग्रजी टायपिंग करता येणे आवश्यक आहे.
8. मूल्यमापन तज्ज्ञ यांचे साठी दरमहा रुपये ६०,०००/-
एकत्रित मानधन देय असेल.
9. मानसोपचार तज्ज्ञ यांचे साठी दरमहा रुपये ६०,०००/-
एकत्रित मानधन देय असेल. 10. माहिती विश्लेषक यांचे साठी दरमहा रुपये ५०,०००/- एकत्रित मानधन देय असेल.
11. कार्यक्रम व्यवस्थापक हे पद शालेय शिक्षण विभागातील
सेवानिवृत्त अधिकारी यांचेमधून कंत्राटी तत्वावर निवडल्यास यांचेसाठी दरमहा रुपये
६०,०००/- एकत्रित मानधन देय असेल.
12. कंत्राटी स्वरूपातील सेवा कालावधीमध्ये कोणताही विशेष
भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
13. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,
पुणे यांनी दिलेल्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या पूर्ण करणे बंधनकारक
राहील.
14. सेवा कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याकडून कोणताही अनुचित
प्रकार,
गैरवर्तन वा इतर गंभीर बाब घडल्यास त्यास सेवेतून कोणत्याही क्षणी
काढून टाकण्याचा अधिकार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना असेल. तसेच अशा प्रसंगी
प्रकरणपरत्वे आवश्यकतेनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
15. कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीस अर्ज करणाऱ्या उमेदवाराने
सक्षम प्राधिकारी यांचे चारित्र्य पडताळणी / वर्तणूक प्रमाणपत्र तसेच आवश्यक मूळ
प्रमाणपत्रे मुलाखतीवेळी सादर करणे आवश्यक आहे.
मूल्यमापन कक्षातील पदांची कार्ये :
1. विषय तज्ज्ञ व मूल्यमापन तज्ज्ञ
राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांचे नियतकालिक मूल्यांकन
करण्यासाठी परिषदेतील विषय विभागाकडून इयत्तानिहाय व विषयनिहाय विविध चाचण्या, प्रश्नपेढी
(Item Bank) चे विकसन करणे. तयार करण्यात आलेल्या चाचण्यांचे
प्रमाणिकरण करणे.
राज्यस्तरावरून विद्यार्थ्यांचे नियतकालिक मूल्यांकन
करण्यासाठी परिषदेतील विषय विभागाकडून इयत्तानिहाय व विषयनिहाय विविध चाचण्या, प्रश्नपेढी
(Item Bank) चे विकसन करणे.
राज्यस्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध सर्वेक्षण साहित्याचे
विकसन (चाचणी पुस्तिका, उत्तरपत्रिका, शिक्षक
प्रश्नावली, मुख्याध्यापक प्रश्नावली इ.) करणे. माहिती
विश्लेषण करणे, सर्वेक्षण अहवाल तयार करणे. शिक्षकांना
मूल्यमापन विषयक प्रशिक्षण देण्यास सहाय्य करणे.
विषयनिहाय शिक्षकांच्या गरजांची निश्चिती करणे.
शिक्षकांसाठी गरजाधिष्ठित प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
समग्र प्रगती पत्रक (HPC) चे विकसन शाळास्तरावर
अंमलबजावणी करणे.
विद्यार्थ्यांच्या संपादणूकीचे सातत्याने मूल्यमापन करून
गुणवत्ता समृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना करणे.
NCERT, PARAKH या संस्थांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार
मूल्यमापन पद्धती, सर्वेक्षण इत्यादी कामकाज पाहणे.
सार्थक पुस्तिकेमधील NEP टास्कची प्रभावी अमलबजावणी करणे.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध अहवाल (उदा. NAS, ASER FLS,
SLAS, PAT) यांचे विश्लेषण संबधित विषयातील संपादणूक वाढविण्यासाठी
पुढील कार्यदिशा निश्चित करून अंमलबजावणी करणे.
राज्याच्या शालेय शिक्षणाच्या मूल्यमापन पद्धतीमध्ये
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय निकषांच्या आधारे सुधारणा करणे.
मूल्यमापन संबंधातील सर्व कामकाज परिषदेतील मूल्यमापन
विभागाच्या सनियंत्रनाने करणे.
2. मानसोपचार तज्ज्ञ:
राज्य मूल्यमापन कक्षातील विषय तज्ज्ञ यांना
मानसशास्त्रीयदृष्ट्या अचूक चाचणी विकसन करण्यासाठी मदत करणे. विषय तज्ज्ञ यांचे
मार्फत तयार करण्यात आलेल्या चाचण्यांचे प्रमाणीकरण करणे.
प्रमाणीकरण केलेल्या चाचण्यांची विषय तज्ज्ञ यांचे सहायाने
पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करणे.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्वेक्षण अहवालाचे मानसशास्त्रीय
दृष्टीने विश्लेषण करणे.
राज्यस्तरीय सर्वेक्षण अहवाल निर्मितीसाठी राज्य मूल्यमापन
कक्षास सहाय्य करणे.
आवश्यकतेनुसार दहावी, बारावीच्या
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन सेवा देणे.
मूल्यमापन संबंधातील सर्व कामकाज परिषदेतील मूल्यमापन
विभागाच्या सनियंत्रनाने करणे.
3. माहिती विश्लेषक:
परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध सर्वेक्षणातून संकलित
होणाऱ्या माहितीचे विविध प्रकारे विश्लेषण करणे. राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात
येणाऱ्या विविध सर्वेक्षण अहवालांचे विश्लेषण करणे.
शाळास्तरावर घेण्यात येणाऱ्या विविध नियतकालिक चाचण्यांचा data analysis करणे.
विद्या समीक्षा (VSK) केंद्राची माहिती
विश्लेषणात मदत घेणे.
विषय तज्ज्ञ यांना चाचणी विकसन व विविध सर्वेक्षण व
मूल्यांकन अहवाल तयार करण्यास मदत करणे.
4. कार्यक्रम व्यवस्थापक:
मूल्यमापन कक्षातील सर्व कर्मचारी यांच्याशी समन्वय साधून
दिनांक २४ एप्रिल २०२३ च्या राज्य मूल्यमापन कक्ष शासन निर्णय मधील उद्दिष्टानुसार
कामकाज पाहणे.
परिषदेतील मूल्यमापन विभाग यांच्या संनियंत्रणाखाली व
समन्वयाने राज्य मूल्यमापन कक्षाचे कामकाज पाहणे. मूल्यमापन कक्षातील सर्व
कर्मचारी यांच्या सहकार्याने मूल्यमापन विषयक सर्व प्रकारचे कामकाज मूल्यमापन
विभागाच्या सनियंत्रनाने पाहणे.
विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे आवश्यक ते सहाय्य घेणे.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS