Ratio for recommending private sponsored interview candidates for teacher recruitment is 1:3,शिक्षक भरतीसाठी खासगी अनुदानित मुलाखत उमेद्वारांची शिफारस
शिक्षक भरतीसाठी खासगी अनुदानित मुलाखत उमेद्वारांची शिफारस
करण्यासाठीचे प्रमाण 1:3
Ratio for recommending private sponsored interview
candidates for teacher recruitment is 1:3
राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अभियोग्यता व
बुध्दीमत्ता चाचणीत गुणांच्या आधारे उच्चतम गुण प्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण
सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे संबंधित संस्था करील अशी तरतूद विहीत करण्यात
आलेली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी, २०२२ च्या आधारे व
तद्नंतर करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी
व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या निवड प्रक्रीयेमध्ये अधिक पारदर्शकता
आणण्याच्या दृष्टीने विहीत कार्यपध्दतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत:-
अ) मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या
शाळांतील शिक्षण सेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त
शिक्षकीय जागेकरीता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय, दिनांक
७.२.२०१९ अन्वये विहीत केलेल्या १:१० प्रमाणाऐवजी १:३ या गुणोत्तराप्रमाणे
उमेदवारांचा प्राथम्य क्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय
व बिंदूनामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची त्या व्यवस्थापनाच्या
लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येईल.
आ) संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण ३० गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावयाचा असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर निवड करावयाची आहे. त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहीत केलेल्या एकूण ३० गुणासंदर्भात आयुक्त (शिक्षण) यांनी मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) तयार करावी.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS