⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 | बक्षीस विजेत्यांची यादी

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ करिता नावनोंदणी व व्हिडीओ अपलोड करणे

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ करिता नावनोंदणी व व्हिडीओ अपलोड करणे

राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ बाबत आयोजन, सविस्तर सूचना वितरण व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना सोपविण्यात आलेले आहेत. यानुसार २०२३-२४ दरम्यान शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ साठी नियोजन करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीमध्ये प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक-प्रशिक्षक यांचे कडून आवेदन स्वीकारण्याचे प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदरील लिंकवर स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांनी नोंदणी करावयाची आहे.

राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित

शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023- तालुका व जिल्हास्तर निकाल


[तालुका स्तरावरील निकाल]


[जिल्हा स्तरावरील निकाल]



[राज्य स्तरावरील निकाल]


बक्षीस विजेत्यांची यादी

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 | बक्षीस विजेत्यांची यादी

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 | बक्षीस विजेत्यांची यादी

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 | बक्षीस विजेत्यांची यादी

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 | बक्षीस विजेत्यांची यादी

 

स्पर्धेसाठी आवश्यक अटी:- (कृपया अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा)

१. स्पर्धेकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या ऑनलाईन https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या संकेतस्थळास भेट देवून आपली सर्व माहिती अचूक भरावी.

२. उमेदवारांना कोणत्याही एका गटासाठीच अर्ज सादर करावा. एका उमेदवारास एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत.

३. ज्या शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्यांना तालुका/जिल्हा/राज्य पातळीवरील निवड समितीत सदस्य म्हणून घेवू नये. याबाबतची खात्री संबंधित तालुका/जिल्हा/राज्य पातळीवरील निवड समितीने करावी.

४. स्पर्धेची नोंदणी व व्हिडीओ अपलोड प्रक्रिया दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. स्पर्धेची नोंदणी दिनांक 15/10/2023 रोजी रात्री १२.०० वाजता बंद होईल.

५. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर व व्हिडीओ अपलोड संदर्भ क्र. १ चे निकषानुसार त्यांचे प्रथम तालुका स्तरावर मूल्यमापन होईल. तालुका स्तरावरील यशस्वी उमेदवार जिल्हा स्तरावरील मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. त्यानंतर जिल्यातील यशस्वी उमेदवार राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. असे सर्व ३६ जिल्यातील उमेदवारांमधून योग्य उमेदवार राज्यस्तरावर राज्य स्तरीय निवड समिती मार्फत निवडून त्यांना पारितोषिके देण्यात येतील.

६. यासाठी उमेदवारांना संबधित जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतून पुढील सूचना देण्यात येतील.

७. प्रस्तुत स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे ०६ गट करण्यात आलेले आहेत.

  • गट क्र.१- १ ली व२री
  • गट क्र. २-३री व ५ वी
  • गट क्र. ३-६ वी ते ८ वी
  • गट क्र. ४- ९ वी ते १० वी
  • गट क्र. ५ - ११ वी व १२ वी
  • गट क्र. ६- अध्यापक विद्यालय

८. स्पर्धेसाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने पोर्टलवर शाळेची माहिती, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय.डी, बँक खाते तपशील, व्हिडीओ लिंक इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ९. स्पर्धेसाठी संबंधितांनी गटनिहाय भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह या विषयांपैकी आपला योग्य तो विषय निवडावा.

१०. नावनोंदणी करत असताना खालीलपैकी एका प्रकारावरील व्हिडीओ तयार करावा,

  • ·         कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे.
  • ·         स्वतः स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ
  • ·         स्वतः केलेला Animated व्हिडिओ
  • ·         स्वतः पेन टॅबलेटचा वापर करून बनवलेला व्हिडीओ.
  • ·         Immersive eContent (Augmented Reality / Virtual Reality / Virtual Lab/३६० Degree/Simulations) वर आधारित व्हिडीओ
  • ·         खेळावर आधारित व्हिडीओ (Gamification)
  • ·         ई-चाचणीवर आधारित व्हिडीओ (E-assessments)
  • ·         शासन प्रणालीवर आधारित बोलीभाषेतून केलेला व्हिडीओ
  • ·         दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हिडीओ
  • ·         राज्य/ राष्ट्रीय शिष्यवृत्ती वर आधारित व्हिडिओ
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा२०२३ माहिती
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३

उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष

  • व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय - मजकूर आदर्श असावा.
  • व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.
  • व्हिडीओ ची साईज हि विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.
  • निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम. व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.
  • शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल.
  • आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोहअवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बॅकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बॅकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.

व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी

  • शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे.
  • व्हिडिओ बनविणार्याने स्वत: चा थोडक्यात परिचय समावेश करावा.
  • व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ठ करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.
  • घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.
  • व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी. व्हिडीओ फॉरमॅट MP4 असावा.
  • व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची, व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी.
  • व्हिडीओ मधील मजकूर व आशयाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे, याची नोंद घ्यावी.
  • व्हिडीओ मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्त (Creative Commons) सण्याबाबत क्षता घेण्यात यावी. कॉपीराईटची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जबाबदार असतील.
  • राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडीओजच्या creator ला तो व्हिडीओ त्यांनीच तयार केला आहे हे सिद्ध करावे लागेल. अन्यथा तो व्हिडीओ स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
  • शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जानुसार शिक्षकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल व सदरच्या दर्जेदार शैक्षणिक
  • व्हिडीओज हे त्याच्या creator च्या नावासह शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. स्टॉक शॉट्स किंवा कोणतेही कॉपीराइट केलेले ग्राफिक्स/इमेज संकलित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील.
  • एका स्पर्धकाने एका गटासाठी फक्त एकच व्हिडिओ पाठवावा.
  • सर्व नोंदींची एक प्रत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राखून ठेवली जाईल.
  • वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक
  • पुरस्कार विजेत्या व्हिडिओचे प्रसारण DIKSHA/OER आणि शासनाद्वारे व्यवस्थापित इतर वेबसाइट्स/पोर्टलवर अपलोड करण्यात येतील.
  • तालुका / जिल्हा / राज्य स्तरावरील स्पर्धांचे निकाल तालुका / जिल्हा / राज्य निवड समिती मार्फत अंतिम केला जाईल (स्वतंत्रपणे ऑडिओ आणि अॅनिमेशन/इमर्सिव्ह ई-कॉन्टेंट/डिजिटल गेम्स आणि अॅप्लिकेशन श्रेणीसाठी) ज्युरीने घोषित केलेले निकाल बंधनकारक असतील. 

व्हिडिओ निर्मितीसाठी पुढील दक्षता पाळण्यात यावी

  • ·         कोणत्याही प्रकारची हिंसा, लैंगिक प्रदर्शन, असभ्य भाषा, अमली पदार्थांचा वापर यांचा व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,
  • ·         वांशिक, सांस्कृतिक, धार्मिक, स्त्रिया किंवा लिंग पूर्वाग्रहाचे समर्थन करणारी सामग्री व्हिडीओ निर्मितीत समावेश असल्यास,
  • ·         तांत्रिक त्रुटीं असल्यास (उदा. सुरु न होणे, मध्येच बंद होणे),
  • ·         कोणत्याही कॉपीराइट ©, वैयक्तिक बौद्धिक संपदा (IPR), Creative Commons कायद्याचे उल्लंघन असल्यास,
  • ·         साहित्यिक चोरीचा (plagiarism) समावेश असल्यास,
  • असे व्हिडीओ पडताळणी अंती कोणत्याची स्तरावर बाद करण्यात येतील. यावर स्पर्धकाचा कोणताही आक्षेप ग्राह्य धरण्यात येणार नाही.

शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करून Anyone with link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील इच्छुकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात व सदर स्पर्धेसाठी जास्तीत जास्त उमेदवारांना नावनोंदणी करण्यास आदेशित करण्यात यावे . स्पर्धेच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

  • १. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४
  • २. डॉ. संदीप मुळे, अधिव्याख्याता, मो. क्र. ८६९२८५७२२२
  • ३. श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९४

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम