शालेय व इतर क्रीडा स्पर्धा 2023-24 मधील आयोजन,शालेय व इतर क्रीडा स्पर्धा,School and Other Sports Competitions
शालेय व इतर क्रीडा स्पर्धा 2023-24 मधील आयोजन
School and Other Sports Competitions 2023-24
- दि. २४ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार वरील अ.क्र १ ते ४६ खेळ प्रकारांच्या तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनास संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयानुसार निधी वितरीत करण्यात येणार असून उर्वरीत अ.क्र ४७ ते ९० या खेळ प्रकाराचे आयोजन संबंधीत संघटनांच्या तांत्रीक व आर्थिक सहकार्याने करावे.
- कराटे, किकबॉक्सींग व तायक्वांदो या खेळप्रकारांच्या अधिकृतते बाबत एकविध खेळसंघटना मध्ये वाद असल्याने क्षेत्रीय कार्यालयांना विविध स्तरावरील स्पर्धा आयोजनास अडचण निर्माण
- होते, यास्तव अधिकृतता निश्चित होईपर्यंत सदर खेळांच्या सर्वच स्तरावरील स्पर्धांचे आयोजन स्थगित करण्यात येत आहे.
- शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाची निवड प्रचलित कार्यपध्दतीनुसार करावी. स्पर्धेचे आयोजन प्रशासकीय व तांत्रिकदृष्ट्या त्या-त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटना व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या नियमावलीनुसार करावे.
- स्पर्धेसाठी सुयोग्य / नियमानुसार मैदान इतर आवश्यक साहीत्य उपलब्ध करुन घ्यावे. स्पर्धेच्या स्तरानुसार अधिकृत एकविध खेळ संघटनेकडून निष्पक्ष तसेच पात्र पंच उपलब्ध करुन घ्यावेत.
- प्रत्येक स्तरावरील स्पर्धा कालावधीत किमान प्रथमोपचाराची व्यवस्था करावी. क्रीडा स्पर्धा आयोजना दरम्यान, निवास तसेच स्वच्छतागृहांची असुविधा तसेच निकृष्ठ दर्जाचे भोजन याबाबत संचालनालयास तक्रारी प्राप्त होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा पुर्ण पत्ता, ट्रॅकसुट/गणवेशाची साईज, संपर्क क्रमांक तसेच बँक खात्याची माहीती (RTGS करीता) बिनचुक घ्यावी.
- राज्य स्पर्धेचे आयोजन पुर्ण झाल्यानंतर आयोजक कार्यालयांनी दुसऱ्याच दिवशी स्पर्धेचा अंतिम निकाल, खेळाडूंचा पुर्ण पत्ता, ट्रॅकसुट / गणवेशाची साईज, संपर्क क्रमांक तसेच बँक खात्याची माहीती संचालनालय तसेच स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीर आयोजक कार्यालयास पाठवावी व भारतीय शालेय खेळ महासंघाच्या संकेतस्थळावर खेळाडूंची नोंदणी करुन अंतिम प्रवेशिका प्रत शिबीर आयोजकांना उपलब्ध करुन द्यावी.
राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनबाबत प्राप्त झालेल्या मागणीनुसार खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे राज्य स्पर्धा आयोजन स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS