पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदुनामावली Bindu Namali for Shikshak Bharti through Pavitra Portal,maharashtra shikshak bharti 2023,maharasht
पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदुनामावली
Bindu Namali for Shikshak Bharti through Pavitra Portal
राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी माहे फेब्रुवारी-मार्च - २०२३
मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी-२०२२ घेण्यात आली आहे. या परीक्षेतील
गुणवत्तेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक पदभरती करण्यात येणार आहे.
त्यासाठी विषय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची माहिती तयार असणे आवश्यक आहे.
त्यानुसार मा. प्रधान सचिव, (ग्राम विकास व
पंचायती राज ) व मा. प्रधान सचिव, (शालेय शिक्षण व क्रीडा)
यांचे संयुक्त अध्यक्षतेखाली दिनांक ३०/०६/२०२३ रोजी ऑनलाईन मिंटिंग घेण्यात आली.
त्यामध्ये बिंदुनामावली अद्ययावत करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली व आवश्यक
ते शंकासमाधान करण्यात आले. बिंदुनामावली अद्ययावत करताना खुल्या प्रवर्गातील
रिक्त पदांची संख्या विचारात घेता खाली नमूद केलेल्या बाबी विचारात घेवून
बिंदूनामावली अद्ययावत करावी.
प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली :-
यापुर्वी बिंदुनामावलीतील खुल्या प्रवर्गाच्या रिक्त
पदांबाबत विविध तक्रारींवर चौकशी समिती गठीत करुन खुल्या प्रवर्गातील बिंदुवर
दर्शविण्यात आलेल्या पदांवाबत चौकशी करण्याचे निर्देश ग्राम विकास व जलसंधारण
विभाग यांचे पत्र दिनांक २९/११/२०१७ अन्वये देण्यात आलेले होते. सदर पत्रानुसार
जिल्हा परिषद, नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद, सोलापूर,
यवतमाळ, बीड, अहमदनगर,
सातारा आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांच्या
बिंदुनामावलीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती.
उपरोक्त दि.२९/११/२०१७ च्या पत्रानुसार चौकशी समितीने खालील
मुद्याबाबत चौकशी करुन शासनास अहवाल सादर करावायाचा होता.
- १. जुन्या बिंदुनामावलीमध्ये मागासवर्गीय प्रवर्गात दर्शविण्यात आलेल्या उमेदवारांना नवीन बिंदुनामावलीमध्ये खुल्या प्रवर्गाच्या बिंदुवर दर्शविण्यात येणे.
- २. सीईटी- २०१० मध्ये मागासवर्गीय प्रवर्गामध्ये निवड झालेलया उमेदवारांना सन २०१७ मध्ये बिंदुनामावली अद्ययावत करताना खुल्या प्रवर्गाच्या बिंदुवर दर्शविण्यात येणे.
- ३. काही कर्मचाऱ्याची माहिती सापडत नाही असा शेरा मारला असून त्यांना खुल्या प्रवर्गाच्या बिंदुवर दर्शविण्यात येणे.
- ४. सेवानिवृत झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे बिंदुनामावलीमध्ये दिसून येणे.
- ५. वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक पदावर सामावून घेताना रिक्त असलेल्या प्रवर्गावर सामावून न घेता जून २०१७ च्या बिंदुनामावली मध्ये खुल्या प्रवर्गाच्या बिंदुवर दर्शविण्यात येणे.
- ६. काही जिल्हा परिषदांमध्ये कर्मचाऱ्यांची जात बदललेली असणे.
वरील मुद्दे विचारात घेवून यापुर्वी तपासलेल्या बिंदुनामावलीचे अभिलेख पुढील बिंदुनामावली तपासण्यासाठी तयार ठेवावेत.
maharashtra shikshak bharti 2023,maharashtra shikshak bharti 2023 @
mahateacherrecruitment.org.in,kala shikshak bharti 2023 maharashtra,shikshak
bharti result 2023 maharashtra,maharashtra shikshak bharti 2023 @
mahateacherrecruitment.org.in,kala shikshak bharti 2023 maharashtra,shikshak
bharti result 2023 maharashtra,shikshak bharti 2023 maharashtra,shikshak bharti
vacancy, शिक्षक
भरती,शिक्षक भरती जाहिरात,शिक्षक भरती प्रक्रिया,शिक्षक भरती वयोमर्यादा,शिक्षक भरती पात्रता,शिक्षक भरती जाहिरात 2022,शिक्षक भरती 2023,शिक्षक भरती मुलाखत,शिक्षक भरती महाराष्ट्र 2022
जाहिरात,शिक्षक भरती जाहिरात 2023
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS