युवा पर्यटन मंडळाची स्थापना झाल्यास देशातील युवकांना येथील पर्यटन स्थळे, समृद्ध वारसा व संस्कृती यांची माहिती मिळून, असे युवा हे पर्यटनाचे राजदूत म्हण
शाळा आणि विद्यालयामध्ये युवा पर्यटन मंडळाची स्थापना
देशाच्या अर्थ व्यवस्थेत पर्यटन उद्योगाचा महत्वाचा वाटा
असून देशाची समृद्ध वारसा व संस्कृती जगासमोर आणण्याचे महत्वाचे काम करते. पर्यटन
हे देशाच्या विविध भागातील लोकांमध्ये एकता आणि अखंडता निर्माण करणारे माध्यम
असल्याचे मा. पंतप्रधान यांनी अधोरेखित केले आहे. या अनुषंगाने पर्यटन मंत्रालय, भारत
सरकार यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून युवा पर्यटन मंडळाची
स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत.
युवा पर्यटन मंडळाची स्थापना झाल्यास देशातील युवकांना येथील
पर्यटन स्थळे, समृद्ध वारसा व संस्कृती यांची माहिती मिळून, असे युवा हे पर्यटनाचे राजदूत म्हणून भविष्यात कार्य करतील. तसेच या
उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पर्यटन क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती
झाल्यामुळे त्यांना रोजगाराचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.
अशा युवा मंडळांद्वारे टीमवर्क, व्यवस्थापन,
नेतृत्व आणि सेवा यासारखी महत्वाची कौशल्ये विकसित होण्यास व शाश्वत
आणि जबाबदार पर्यटनाची जाणीव जागृती होण्यास हातभार लागेल.
प्रत्येक विद्यालयामध्ये स्थापन होणाऱ्या युवा पर्यटन
मंडळांमध्ये किमान २५ विद्यार्थी सदस्य असणे गरजेचे आहे. व या पर्यटन मंडळांमार्फत
पर्यटनासंदर्भात विविध उपक्रमांचे नियोजन करुन ते राबविण्यासाठी समन्वयक म्हणून
आपल्या विद्यालयातील एका शिक्षकाची नियुक्ती आवश्यक आहे. युवा पर्यटन मंडळाची रचना
व कार्य या बाबत अधिक माहिती पर्यटन मंत्रालयाद्वारे निर्मित हस्तपुस्तीकेमध्ये
देण्यात आलेली आहे.
युवा पर्यटनमंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन स्वरुप अनुदान म्हणून सन २०२३-२४ या वित्तीय .वर्षामध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु.१०,०००/- व महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी रु.२५,०००/- असे एकूण तरतूद केलेल्या रु.२५.०० कोटी निधीमधून ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा / महाविद्यालयांना देण्यात येईल. यावर होणारा खर्च पर्यटन संचालनालयाकडे ‘प्रसिध्दी' या लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून भागविण्यात येईल.
तपासणी सूची.(Check List)
१. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करताना पुढील कागदपत्रे
आवश्यक आहेत :
- अ) सर्व विद्यार्थी सदस्यांचे आधार क्रमांक.
- ब) शिक्षक व विद्यार्थी समन्वयकाचे आधार क्रमांक.
२. प्रस्ताव मुख्याध्यापक/ प्राचार्यांच्या स्वाक्षरीने
पाठविणे आवश्यक आहे.
३. क्लब स्थापन केल्यानंतर पर्यटन स्थळांना भेटी
देण्याबाबतचे छायाचित्रांसह अहवाल प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सादर करावा.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS