३ ऑगस्ट दिनविशेष,३ ऑगस्ट दिनविशेष मराठी,3 ऑगस्ट दिनविशेष,३ ऑगस्ट दिनविशेष मराठी,3 august dinvishesh,3 aug dinvishesh,3 august 2022 dinvishesh,3 august
दिनविशेष ३ ऑगस्ट | August 3 dinvishesh marathi | 3 ऑगस्ट
नायजरचा स्वातंत्र्य दिन
[no_toc]
- [accordion]
- महत्त्वाच्या घटना:
- २००४-राज्यपाल महंमद फझल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले. १ ऑगस्ट २००४ रोजी या विद्यापीठाची स्थापनाझाली होती.
- २०००-मल्याळी दिग्दर्शक शाजी एन. करुण यांना फ्रेन्च सरकारने ‘नाईट ऑफ आर्टस अँड लेटर्स’ पुरस्काराने सन्मानित केले.
- १९९४-संगीतकार अनिल विश्वास यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
- १९९४-सहज सोप्या व गोड कविता आणि सूक्ष्म व मार्मिक वर्णनात्मक लेख यांद्वारे हिन्दी साहित्याची अमूल्य सेवा करणारे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना उत्तर प्रदेश सरकारतर्फे विषेश पुरस्कार जाहीर.
- १९६०-नायजरला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
- १९००-‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी’ ची स्थापना झाली.
- १७८३-जपानमधील माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सुमारे ३५,००० जण मृत्यूमुखी पडले.
- जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १९५६-बलविंदरसिंग संधू – १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील क्रिकेटपटू
- १९२४-लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (मृत्यू: २१ जून २००३)
- १९१६-शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (मृत्यू: २० एप्रिल १९७० - मुंबई)
- १९००-क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ‘पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)
- १८९८-उदयशंकर भट्ट – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार. त्यांनी पंजाब विद्यापीठातून ‘शास्त्री’ आणि कलकत्ता विद्यापीठातून ‘काव्यतीर्थ’ या उपाध्या मिळवल्या. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)
- १८८६-मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)
- मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- २००७-सरोजिनी वैद्य – लेखिका (जन्म: १५ जून १९३३)
- १९९३-स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू (जन्म: ८ मे १९१६)
- १९५७-देवदास गांधी – पत्रकार, ‘हिन्दुस्तान टाइम्स’चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव (जन्म: ३ ऑगस्ट १९५७ - दरबान, दक्षिण अफ्रिका)
- १९३०-‘विज्ञान यात्री’ व्यंकटेश बापूजी केतकर – विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद. नेपच्युन ग्रहापलीकडे परिक्रमा करीत असलेला ग्रह आणि त्याची परिक्रमा याचे भाकीत केतकर यांनी केले होते. (जन्म: १२ जानेवारी १८५४)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS