14 ऑगस्ट दिनविशेष | 14 August dinvishesh | 14 ऑगस्ट,14 august dinvishesh,14 august history,14 august is celebrated as,14 august history,14 august hist
14 ऑगस्ट दिनविशेष | 14 August dinvishesh | 14 ऑगस्ट
पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन
[no_toc]
- [accordion]
- महत्त्वाच्या घटना:
- २०१०-पहिल्या ‘युवा ऑलिम्पिक स्पर्धा‘
सिंगापूरमधे घेण्यात आल्या.
- २००६-श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ ६१ शाळकरी मुली ठार झाल्या.
- १९७१-बहारीनला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
- १९५८-‘एअर इंडिया’ची
दिल्ली-मॉस्को विमानसेवा सुरू झाली. सुपर कॉन्स्टलेशन (L1049G) या प्रकारच्या विमानातून ही सेवा आठवड्यातून एकदा देण्यात येत होती.
विमानाचे नाव ‘रानी ऑफ बिजापूर’ असे
होते.
- १९४७-भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.
- १९४७-पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
- १९४३-नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
- १८९३-मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश बनला.
- १८६२-मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना
- १८६२-कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना
- १६६०-मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.
- जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १९६८-प्रवीण आम्रे – क्रिकेटपटू
- १९६२-रमीझ राजा – पाकिस्तानी क्रिकेटपटू व
समालोचक
- १९५७-जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ‘जॉनी
लीवर’ – विनोदी अभिनेता
- १९२५-जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख
असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)
- १९११-वेदतिरी महाऋषी – भारतीय तत्त्वज्ञानी (मृत्यू: ? ? ????)
- १९०७-गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व
लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी,
डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून
वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ‘जेव्हा माणूस जागा होतो‘ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या
जगाची ओळख करुन देणारे आहे. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)
- १७७७-हान्स क्रिस्टियन ओरस्टेड – विद्युतबल
व चुंबकीय बल यातील परस्पर संबंध शोधणारा डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ मार्च १८५१)
- मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- २०१२-विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (जन्म: २६ मे १९४५)
- २०११-शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व
निर्माता (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)
- १९८८-एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि
ड्रायव्हर (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)
- १९८४-कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२
च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (जन्म: १५ जानेवारी १९२६)
- १९५८-जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (जन्म: १९ मार्च १९००)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS