6 august dinvishesh,6 aug dinvishesh,6 august 2022 dinvishesh,what is august 6,what happens on august 6,what happens on the 6th of august,why is augus
६ ऑगस्ट दिनविशेष August 6
special day | August 6
अणूबॉम्ब निषेध दिन
हिरोशिमा दिन
[no_toc]
- [accordion]
- महत्त्वाच्या घटना:
- १९९७-कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने ६ बाद ९५२ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. त्यात सनत जयसूर्या याने ३४० धावा केल्या.
- १९९४-डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ’इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार’ प्रदान
- १९९०-कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
- १९६२-जमैकाला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
- १९६०-अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला प्रत्युत्तर म्हणून क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९४५-अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा या शहरावर अणूबॉम्ब टाकला. यात ७०,००० जण तात्काळ मृत्यूमुखी पडले तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला.
- १९४०-सोविएत युनियनने इस्टोनियाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतला.
- १९२६-जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
- १९१४-पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १९७०-एम. नाईट श्यामलन – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
- १९२५-योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे. (मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)
- १८८१-अलेक्झांडर फ्लेमिंग – नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश
शास्त्रज्ञ (मृत्यू: ११ मार्च १९५५)
- १८०९-लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (मृत्यू: ६ आक्टोबर १८९२)
- मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १९९९-कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते (जन्म: ४ जानेवारी १९४१ – सेमरी जमालपूर, माऊ, उत्तर प्रदेश)
- १९९७-वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक
- (जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
- १९९१-शापूर बख्तियार – ईराणचे शेवटचे पंतप्रधान. यानंतर इराणमध्ये हुकूमशाही स्थापित झाली.
- (जन्म: २६ जून १९१४)
- १९६५-वसंत पवार – संगीतकार (सांगत्ये ऐका, पठ्ठे बापूराव, बाळा जो जो रे, चिमणी पाखरे, अवघाची संसार, मानिनी, वैजयंता, पसंत आहे मुलगी, धाकटी जाऊ, सवाल माझा ऐका, मल्हारी मार्तंड इ. अनेक चित्रपट) (जन्म: ? ? ????)
- १९२५-सुरेंद्रनाथ बॅनर्जी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ‘राष्ट्रगुरू’ (जन्म: १० नोव्हेंबर १८४८)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS