⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

२९ ऑगस्ट ; राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणे | August 29; Celebrating National Sports Day

national sports day,national sports day 2023,national sports day 2022,national sports day is celebrated on,national sports day of india,national sports day quotes,national sports day speech,national sports day first celebrated in india,national sports day date,national sports day in us

२९ ऑगस्ट ; राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करणे | August 29; Celebrating National Sports Day

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. सन २०२३ मध्ये दि. २१ ऑगस्ट ते दि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोणताही १ दिवस सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा करावयाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. यावर्षीची संकल्पना ही खेळ हा सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी एक सहाय्यक ठरावा (Sports as an enabler for an inclusive and fit society) अशी असून त्यानुसार राष्ट्रीय क्रीडा दिनाचे (National Sports Day)  आयोजन करावयाचे आहे.

राज्यातील सर्व शाळांनी दि. २१ ऑगस्ट ते दि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोणताही १ दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा करावयाचा आहे. त्यासाठी पुढील मुद्द्यांप्रमाणे कार्यवाही करावी.

  • १. उपरोक्त नमूद कालावधीपैकी कोणताही १ दिवस व्यायामाचे खेळ, समकालीन खेळ किंवा स्वदेशी खेळ याबाबतचे उपक्रम आयोजित करावेत.
  • २. वैयक्तिक उपक्रम न घेता समूहातील उपक्रम आयोजित करावेत, जेणे करून विद्यार्थ्यांमध्ये एकता सर्वसमावेशकता ही मूल्ये वाढीस लागतील.
  • ३. विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून क्रीडास्पर्धा किंवा तत्सम उपक्रम आयोजित करावेत.
  • ४. लिंगसमभाव अनुसरून विद्यार्थ्यांना २, ४ किंवा ६ गटांमध्ये विभाजित करावे.
  • ५. गटांची नावे ही स्वातंत्र्यवीर किंवा प्रसिद्ध खेळाडू यांच्या नावाने द्यावीत.
  • ६. विद्यार्थ्यांना स्थानिक उत्तम खेळाडूंचा परिचय करून द्यावा,
  • ७. शिक्षक व विद्यार्थी यांनी शक्यतो खेळासाठी योग्य असा पोशाख करावा.
  • ८. जिंकणाऱ्या गटाला मेजर ध्यानचंद यांच्या नावाची ट्रॉफी देण्यात यावी.
  • ९.शाळांनी त्यांच्याकडे उपलब्ध व्यवस्थे नुसार खाली दिलेल्या खेळांपैकी कोणत्याही खेळांची निवड करावी.

    • १.आउटडोअर गेम्स - चालणे शर्यत, व्हॉलीबॉल, हॉकी, मिनी फुटबॉल, टेनिस बॉल
    • २. इनडोअर गेम्स- खोलीतील किंवा सभागृहातील खेळ-बॅडमिंटन, बुद्धिबळ, बास्केटबॉल, टेबल टेनिस, रस्सीखेच
    • ३.फनी गेम्स - चमचा लिंबू शर्यत / पोते शर्यत, दोरीवर चढणे शर्यत, लगोरी/लंगडी, फळी आव्हान.
  • १०. सदर क्रीडा दिनाच्या दिवशी सोबत जोडलेल्या भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली, यांच्या परिपत्रकातील फिट इंडिया ची शपथ सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी म्हणावी.
  • ११. क्रीडा दिन आयोजित करण्याबाबतच्या आणि साजरा केल्यानंतरच्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये किंवा पोस्ट स्वरूपात जास्तीत जास्त सामाजमाध्यमांवर शेअर कराव्यात.
  • १२. शाळांनी फिट इंडिया पोर्टलवर (https://fitindia.gov.in) किंवा फिट इंडियामोबाईल अॅपवर आपल्या शाळेतील उपक्रमांची माहिती, फोटो व व्हिडीओ अपलोड करावेत. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम