India Scouts and Guides Annual Planning,भारत स्काऊट आणि गाईडस वार्षिक नियोजन,स्काउट,स्काउट गाइड सर्टिफिकेट के फायदे,स्काउट भनेको के हो,स्काउट गाइड,स्क
भारत स्काऊट आणि गाईडस वार्षिक नियोजन | India Scouts and
Guides Annual Planning
2023-2024 या शैक्षणिक वर्षात, सरकारने त्यांच्या
अखत्यारीतील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कब/बुलबुल, स्काउट/गाईड या विषयांचा समावेश करणे अनिवार्य केले आहे. या विषयांवर
सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाने
आपले वार्षिक नियोजन सादर केले आहे. कब/बुलबुल, स्काउट/गाईड
विषयांच्या अभ्यासक्रमात काय समाविष्ट आहे हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक आहात का?
आपण शोधून काढू या!
- [accordion]
- प्रथम वर्ष प्रवेश व प्रथम सोपान अभ्यासक्रम
- जून :-
- १) स्काऊट गाईड चळवळीचा प्रारंभ व संक्षिप्त इतिहास याची माहिती
- २) स्काऊट गाईड प्रार्थना, झेंडा गीत व राष्ट्रगीत योग्य चालीवर म्हणता येणे.
- जुलै :-
- १) स्काऊट गाईडचे नियम, वचन, ध्येय, स्काऊट / गाईड चिन्ह, वंदन,
डाव्या हाताने हस्तांदोलन यांचे ज्ञान असावे.
- २) स्काऊट गाईडच्या गणवेशाचे वेगवेगळे भाग व ते कसे वापरावे याची माहिती असावी.
- ३) सत्कृत्य
- ऑगस्ट :-
- १) दीक्षाविधी घेणे.
- २) राष्ट्रध्वज, भारत स्काऊट गाईड ध्वज,
जागतिक स्काऊट गाईड ध्वज याची रचना व वैशिष्ट याची माहिती असावी.
- ३) संघाची माहिती असणे, स्वतःचा संघ, त्याचा ध्वज, आरोळी किंवा गीत व संघकोपरा यांची
माहिती असणे,
- संघ सभा व सन्मान सभा याची माहिती असणे व आयोजन करता येणे.
- ४) गाठी व त्यांचा उपयोग सुकर गाठ (Reef Knot), शीड गाठ (Sheet Knot), दोरीचे टोक शेवटणे.
- ५) संघाबरोबर एक दिवसाच्या वर्षा सहलीस जाणे.
- सप्टेंबर :-
- १) प्रथमोपचार पेटीतील वस्तूंची माहिती असणे व रोलर बँडेज व
त्रिकोणी पट्ट्या, कॉलर व कफ झोळी आणि त्रिकोण सस्पेंशन झोळी
ह्यांच्या उपयोगाची प्रात्याक्षिके करून दाखविणे, कापणे,
खरचटणे यावर प्रथमोपचार करता येणे.
- २) हाताच्या खुणा व शिटीच्या खुणा सराव करा.
- ३) स्काऊट गाईड यासाठी विस्तृत खेळात सहभाग घेणे. उदा. चोर
शिपाई,
लंगडी व पळण्याची शर्यत इ.
- ऑक्टोबर :- दिवाळीची सुट्टी
- नोव्हेंबर :-
- १) आरोग्याचे सर्व साधारण नियम असावेत व बी.पी. प्रणीत सहा व्यायाम प्रकार किंवा सहा आसने किंवा सुर्य नमस्कार शिकून त्याचा सराव करावा.
- २) वनविद्येतील मागाच्या खुणा शिकणे व त्यांच्या अनुरोधाने मार्ग शोधून काढणे.
- ३) चौर आढी (Clove hitch), साखळी गाढ
बांधता येणे
- ४) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड दिन सर्व धर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे.
- डिसेंबर :-
- १) पालकांच्या मदतीने एक आठवडाभर स्वयंपाक करणे, पाणी
साठविणे, घरच्या कामाची जबाबदारी स्वीकारणे (फक्त गाईडसाठी)
- २) दोरीचे टोक शेवटणे.
- ३) स्काऊटसाठी आडवडाभर एखादी बाग, पाणवठा,
बस थांबा किंवा इमारत दत्तक घेऊन स्वच्छता राखण्याची योजना आखणे.
- ४) स्काऊट गाईड हस्तकला, गॅझेटस, हातपंखा, वर्तमानपत्र रॅक तयार करणे, पाकीटे व नववर्ष भेटकार्ड तयारकरणे.
- जानेवारी :-
- १) स्काऊट गाईड नियमावर आधारीत एखाद्या सेवा प्रकल्पाबद्दल
स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टनकडे विचारविनिमय करून तो प्रकल्प पुर्ण करणे, त्याचा
अहवाल स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टनकडे एक आठवड्याच्या आत सादर करणे.
- २) एका वळसा व दोन ओढ्या (One round & two half hitches),
पक्का फास (Bow Line),कोळी गाठ (Fisherman
Knot)
- फेब्रुवारी :-
- १) ग्रामपंचायत / पंचायत समिती / नगर परिषद कार्यालय यांपैकी एका कार्यालयात जनतेसाठी कोणकोणत्या सेवा सुविधा पुरवितात ह्याची माहिती करून घेणे व अहवाल सादर करणे.
- मार्च :-
- १) झालेल्या अभ्यासक्रमाची चाचणी घेणे, मुल्यमापन तक्त्यात नोंद करणे.
- द्वितीय वर्ष द्वितीय सोपान व द्वितीय वर्ष
- जून :-
- १) पायोनियरींग – मोळी गाठ (Timber hitch), सरकती आढी (Rolling hitch), शिबीर औजारे, त्याची माहिती व उपयोग तसेच घ्यावयाची काळजी
- जुलै :-
- १) प्रथमोपचार
- अ) सेंट जॉर्जची झोळी तयार करता येणे आणि त्याचे प्रात्याक्षिक करून दाखविणे.
- ब) कामचलावू स्ट्रेचर, उदा. स्कार्फपासून, शर्टपासून दोरीच्या साहाय्याने, गोणपाट किंवा सतरंजीच्या साहाय्याने इ.
- क) १० मीटर अंतरापर्यंत प्राणरक्षक दोर फेकता येणे.
- ङ) भाजणे, खरचटणे, मुरगळणे, दंश आणि नाकातून रक्तस्त्राव होणे यावर प्रथमोपचार करणे.
- इ) त्रिकोण बंधन, गुंडाळी बंधन, चिटकविणारे बंधन आणि क्रेप बँण्डेज याची माहिती असणे व उपयोग करता येणे.
- ऑगस्ट :-
- १) मालन स्पाईक / लिव्हर हिच गाठ बांधता येणे.
- २) अंदाज करणे स्काऊट गाईड दंडासारख्या साहित्याचा उडयोग करून १०० मीटर पर्यंत रुंदी असलेल्या दोन अंतराचे अंदाज घेणे.
- ३) स्काऊट गाईडना सद्वर्तनाचे ज्ञान असणे आवश्यक
- ४) गाठी व त्यांचा उपयोग सुकर गाठ, शीड गाठ, दोरीचे टोक शेवटणे.
- ५) संघाबरोबर एक दिवसाच्या वर्षा सहलीस जाणे.
- सप्टेंबर :-
- १) होकायंत्र-
- अ) होकायंत्राच्या साहाय्याने १६ उपदिशा ओळखणे व होकायंत्राचा उपयोग करता येणे. ब) रात्रीच्या वेळी आकाशातील किमान एका नक्षत्राच्या साहाय्याने उत्तर दिशा ओळखता येणे. क) नकाशातील अंतर, दिशा, अंश आणि प्रमाण यांचे ज्ञान असणे.
- ऑक्टोबर :-
- दिवाळीची सुट्टी
- नोव्हेंबर :-
- १) विस्तव उघड्यावर काटक्या रचून जास्तीत जास्त दोन आगकाड्यात ते पेटविता येणे, ते शक्य नसेल तर केरोसिनचा किंवा गॅसचा स्टोव्ह करून पेटविणे.
- प्रात्याक्षिक
- अ) आग विझविणे व आगीपासून बचाव करणे याची माहिती असणे.
- ब) आग विझवायच्या बकेट चेन (साखळी) पद्धतीची माहिती असणे.
- क) जंगलातील वाळलेल्या गवताला लागलेली आग कशी आटोक्यात आणाल ? याची माहिती मिळविणे.
- २) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड दिन सर्व धर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे.
- डिसेंबर :-
- १) ळ आकाराची बांधणी
- २) समांतर, चौरस व तिरकस बांधणी करता येणे.
- ३) स्वयंपाक उघड्यावर लाकडाची चुल पेटवून तिच्यावर किंवा स्टोव्ह वर दोन माणसाला पुरेसा खाद्यपदार तयार करणे. एका संघाला पुरेल इतका चहा तयार करणे.
- जानेवारी :
- १) संदेशन-
- अ) अग्निच्या साहाय्याने
- ब) धुराच्या साहायाने
- क) ध्वनीच्या साहाय्याने संदेशन करता येणे व माहिती असणे.
- २) खालीलपैकी कोणत्याही दोन्हीची पुर्तता करणे.
- अ) आपली संस्कृती व आपली परंपरा याबद्दल माहिती मिळविणे व त्याची नोंदवही तयार करणे. आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संमतीने व संघाच्या मदतीने शाळेचा एखाद हाती घेणे.
- सामाजिक सेवा शिबीरात सहभाग घेणे.
- परिसरातील प्रदूषण प्रश्नावर पालक आणि शेजाऱ्यांशी चर्चा करूण त्यावर अहवाल तयार करणे. आणि गाईडसाठी खालीलपैकी कोणत्याही एका प्राविण्य पदकाची पात्रता प्राप्त करावी.
- फेब्रुवारी :
- मेळाव्यात वा सार्वजनिक उत्सवात किंवा यात्रेत सेवा कार्य करणे.
- ऑगस्ट :-
- १) मालन स्पाईक / लिव्हर हिच गाठ बांधता येणे.
- २) अंदाज करणे :- • स्काऊट गाईड दंडासारख्या साहित्याचा उडयोग करून १०० मीटर पर्यंत रुंदी असलेल्या दोन अंतराचे अंदाज घेणे.
- ३) स्काऊट गाईडना सद्वर्तनाचे ज्ञान असणे आवश्यक
- ४) गाठी व त्यांचा उपयोग सुकर गाठ, शीड गाठ, दोरीचे टोक शेवटणे,
- ५) संघाबरोबर एक दिवसाच्या वर्षा सहलीस जाणे.
- सप्टेंबर :-
- १) होकायंत्र:-
- अ) होकायंत्राच्या साहाय्याने १६ उपदिशा ओळखणे व होकायंत्राचा उपयोग करता येणे.
- ब) रात्रीच्या वेळी आकाशातील किमान एका नक्षत्राच्या साहाय्याने उत्तर दिशा ओळखता येणे.
- क) नकाशातील अंतर, दिशा, अंश आणि प्रमाण यांचे ज्ञान असणे.
- ऑक्टोबर :-
- दिवाळीची सुट्टी
- नोव्हेंबर :-
- १) विस्तव :- उघड्यावर काटक्या रचून जास्तीत जास्त दोन आगकाड्यात ते पेटविता येणे, ते शक्य नसेल तर केरोसिनचा किंवा गॅसचा स्टोव्ह करून पेटविणे.
- प्रात्याक्षिक
- अ) आग विझविणे व आगीपासून बचाव करणे याची माहिती असणे. ब) आग विझवायच्या बकेट चेन (साखळी) पद्धतीची माहिती असणे.
- क) जंगलातील वाळलेल्या गवताला लागलेली आग कशी आटोक्यात आणाल ? याची माहिती मिळविणे.
- २) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड दिन सर्व धर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे. –
- डिसेंबर :-
- १) ळ आकाराची बांधणी
- २) समांतर, चौरस व तिरकस बांधणी करता येणे.
- ३) स्वयंपाक उघड्यावर लाकडाची चुल पेटवून तिच्यावर किंवा स्टोव्ह वर दोन माणसाला पुरेसा खाद्यपदार – तयार करणे. एका संघाला पुरेल इतका चहा तयार करणे.
- जानेवारी :-
- १) संदेशन-
- अ) अग्निच्या साहाय्याने
- ब) धुराच्या साहायाने
- क) ध्वनीच्या साहाय्याने संदेशन करता येणे व माहिती असणे.
- २) खालीलपैकी कोणत्याही दोन्हीची पुर्तता करणे.
- अ) आपली संस्कृती व आपली परंपरा याबद्दल माहिती मिळविणे व त्याची नोंदवही तयार करणे.
- ब) आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संमतीने व संघाच्या मदतीने शाळेचा एखादा विकास कार्यक्रम हाती घेणे.
- क) सामाजिक सेवा शिबीरात सहभाग घेणे.
- ड) मेळाव्यात वा सार्वजनिक उत्सवात किंवा यात्रेत सेवा कार्य करणे.
- इ) परिसरातील प्रदुषण प्रश्नावर पालक आणि शेजाऱ्यांशी चर्चा करूण त्यावर अहवाल तयार करणे.
- स्काऊट आणि गाईडसाठी खालीलपैकी कोणत्याही एका प्राविण्य पदकाची पात्रता प्राप्त करावी.
- फेब्रुवारी :-
- अ) स्वंयपाकी / स्वंयपाकीन (Cook)
- ब) वक्ता (Debator)
- क) माळी / माळीन (Gerdener)
- ड) धोबी / धोबीण (Loundrer/Laundress)
- इ) प्राणी मित्र (Friend to Animals)
- ई) हरकाम्या / हरकामीन (Handyman /Handiwoman)
- प) सायकलस्वार (Cyclist)
- मार्च :-
- १) झालेल्या अभ्यास क्रमाची चाचणी घेणे, मुल्यमापन तक्त्यात नोंद करणे.
- तृतीय वर्ष तृतीय सोपान व तृतीय वर्ष
- जून:
- १) भारतीय स्काऊट गाईड चळवळीचे ज्ञान असणे.
- २) प्रथम सोपान चाचणीमध्ये दर्शविलेली त्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने दोरीची टोके शेवट
- जुलै :-
- १) ओड गाठ (Draw hitch), खुर्ची गाठ (Fireman’s
chair knot) बांधता येणे.
- (Man hamess knot and splicing-eye, back, short)
- २) पोहणे
- अ) ५० मीटर पोहणे. ब) सुरक्षित पोहण्याच्या पद्धतीचे ज्ञान असावे.
- क) पोहताना स्वायुची कोणती काळजी घ्यावी याची माहिती असावी.
- किंवा
- स्काऊट /
- गाईडसाठी खालीलपैकी एक प्राविण्य पदक मिळविणे.
- अ) खेळाडू (Athlete)
- ब) गिर्यारोहक (Climber)
- अ) जिमनॉस्ट (Gymnast)
- ब) हाईकर (Hiker)
- अ) योगा (Yoga)
- ब) खेळ मार्गदर्शक (Games Leader)
- अ) ऊंट पालक (Camel man)
- ऑगस्ट :-
- ५) प्रथमोपचार
- अ) विजेचा धक्का बसणे, मुर्च्छा येणे, घशात अडकणे यावर उपचार करता येणे. ब) बाहू, गळा,
हनुवटीचे हाड मोडल्यास प्रथमोपचार करता येणे.
- क) पाण्यात बुडालेल्या व विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीवर प्रथमोपचार करता येणे.
- ड) तोंडाने बासोच्छवास करण्याच्या पद्धतीने प्रात्याक्षिक करून दाखविता येणे.
- सप्टेंबर :-
- १) अंदाज
- अ) ३० मीटर पेक्षा जास्त नाही इतकी उंच अगर खोली असलेल्या दोन ठिकाणांचा अंदाज करता येणे.
- ब) २ किलोपेक्षा जास्त वजन नाही अशा दोन वस्तूंचा अंदाज करता येणे.
- क) दोन प्रकारच्या वस्तूंची संख्या मोजता येणे. उदा. नाणे, मार्बल,
बिस्किट इत्यादी.
- ऑक्टोबर :-
- दिवाळीची सुट्टी
- नोव्हेंबर :-
- नकाशा –
- अ) वेगवेगळ्या खूणा काढून व ग्रीड रेफरन्स यांचे ज्ञान असावे. प्रवाशांच्या उपयोगाच्या टूरिस्ट नकाशा व
- सर्वे ऑफ इंडिया यांनी तयार केलेल्या नकाशाचे वाचन करता येणे. एखाद्या व्यक्तीला नकाशात दाखविलेल्या रस्त्याने प्रवासास नेता येणे याचे ज्ञान असावे.
- ब) त्रिकोण पद्धतीने, प्लेन टेबल, रोड ट्रॅव्हल्सच्या पद्धतीने नकाशा काढता येणे..
- २) उघडयावर चार व्यक्तींना पुरेल इतका स्वयंपाक तयार करणे.
- ३) ७ नोव्हेंबर स्काऊट गाईड स्थापना दिन सर्वधर्मिय प्रार्थना सभा घेऊन साजरा करणे.
- डिसेंबर :-
- १) तंबू उभारणे व गुंडाळणे किंवा दोन व्यक्तींना आत झोपता येईल असा तात्पूरता निवारा तयार करणे.
- २) स्काऊट संघ किंवा गाईड कंपनीने आयोजित केलेल्या
रात्रीच्या शिबीरात सहभागी होणे,
- ३) चाकू व हात कुन्हाडीचा उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक
करून दाखवावे. सुरक्षिततेच्या नियमांचे असावे,
- जानेवारी:-
- १) खालीलपैकी एका कार्यक्रमात भाग घेऊन त्यांची दैनंदिनी तयार करा. अ) तुमच्या युनिटमध्ये राष्ट्रीय एकात्मतेवर भाषण तयार करा.
- ब) युनिटच्या शेकोटीच्या कार्यक्रमात भाषण द्या, किंवा
एखादी गोष्ट सांगा..
- २) संदेशन म्हणजे काय व त्याची सुरुवात कशी झाली व त्याचा
उपयोग काय याची माहिती असावी,
- ३) मार्स संदेशन पद्धतीने कमीत कमी ३० शब्दांचा संदेश पाठविणे व घेता येणे.
- ४) दुसऱ्या स्काऊट गाईड सोबत अनुक्रम २५ किलो मीटर अंतराची सायकल सहल किंवा १०/१५ किलोमीटर अंतराची पायी सहल आयोजित करून त्याचा अहवाल स्काऊट मास्तर गाईड कॅप्टनकडे सादर करावा.
- फेब्रुवारी :-
- स्काऊट गाईडने खालीलपैकी कोणतेही दोन प्रत्येक विभागातील एक प्राविण्य पदकांची पात्रता मिळविणे.
- विभाग अ)
- १) नागरी सुरक्षा (Civil Defence)
- २) आघाडीचा हरकाम्या / हरकामी (Pioneer)
- ३) सामाजिक कार्यकर्ता/कार्यकर्ती (Community Worker)
- ४) विश्वसंधारक (World Conservation)
- ५) सेप्टी नॉलेज
- ६) सेल्फ डिफेन्स (Self Defence)
- विभाग ब)
- १) बुक बाईंडर (Book Binder)
- ३) निसर्ग तज्ञ (Naturalist)
- २) नागरीक (Citizen)
- ४) वाटाड्या (Path Finder)
- मार्च :-
- १) झालेल्या अभ्यासक्रमाची चाचणी घेणे व मुल्यमापन तक्त्यात नोंद करणे.
- राज्य पुरस्कार ( वयाची १३ वर्षे पुर्ण
झालेली असावीत.)
- १) तृतिय सोपान पदक व प्राविण्य पदके यांचे अद्यावत ज्ञान अवगत असावे.
- २) तृतीय सोपान पदक
- 3) स्काऊट गाईडने खालीलपैकी कोणतेही दोन प्राविण्य पदके मिळविणे. (यापुर्वी न मिळालेली)
- अ) बालसंगोपन (Child Nurse) (फक्त
गाईडसाठी)
- ब) सामाजिक कार्यकर्ता / कार्यकर्ती (Community Worker)
- क) पर्यावरण तज्ज्ञ (Ecologist)
- ड) कुष्टरोग निवारक (Leprosy Control)
- इ) साक्षरता (Literacy)
- फ) आरोग्य विषयक संरक्षक (Sanitation Promoter)
- भ) ग्रामीण कार्यकर्ता/कार्यकर्ती (Rural Worker)
- खालीलपैकी कोणतेही एक प्राविण्य पदक प्रत्येक गटातील मिळविणे.
- म) भू-संरक्षक (Soil Conservator)
- अ गट
- १) निसर्ग निवास (Camper)
- २) संदेशक (Signaller)
- ४) निसर्गतज्ज्ञ (Naturalist)
- ३) विद्युत (Electrician)
- ५) डेअरी मॅन (Dairy man)
- ६) नक्षत्र तज्ज्ञ (Starman)
- ७) टेलर फक्त गाईडसाठी (Tailar)
- ८) विद्युत उपकरण तज्ज्ञ फक्त गाईडसाठी (Electronics)
- ब गट
- १) सामाजिक आरोग्य रक्षक
- २) रुग्णालय
- ३) सुदृढ कार्यकर्ता
- ४) जीवरस सत्वतज्ज्ञ
- टीप :-
- ५) शेतकरी फक्त स्काऊटसाठी
- १) राज्य संस्थेचे आश्रयदाते मा. राज्यपाल हे राज्य पुरस्कार पदक प्रदान करतात.
- २) जिल्हा किंवा स्थानिक पदक कमेटीने नियुक्त केलेल्या परिक्षकाकडून प्राविण्य पदकाच्या परिक्षा घेण्यात येतात. व त्यांच्या शिफारशीनुसार प्राविण्य पदके प्रदान करण्यात येतात.
- ३) राज्य कार्यालय मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या राज्य पुरस्कार फेर चाचणी शिबीरात तृतीय सोपान पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमाच्या चाचण्या पुन्हा द्याव्या लागतील. राज्य पुरस्कार पदक तृतीय सोपान पदकाच्या जागेवर लावण्यात यावे.
- राष्ट्रपती पुरस्कार
(वयाची १४ वर्षे पुर्ण व १८ वर्षाच्या आत)
- १) राज्य पुरस्कार पदक धारक असावा.
- २) शिबीर निवास
- अ) किमान सलग तीन रात्रीच्या शिबीर निवास केलेला असावा (जिल्हा मेळावे, जांबोरी यांचा अंतर्भाव नसावा.)
- ब) चाकू, हात, कुन्हाड, हात करवत, कटर, हातोडा, खुंटया यांचा योग्य प्रकारे उपयोग करता यावा. करून दोन व्यक्तींना आत अजोपता येईल असा तात्पुरता
- क) उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साहित्याचा उपयोग निवार मचाण अगर झोपडी बनविता यावी.
- ३) अम्ब्युलन्स मॅन हे प्राविण्य पदक मिळालेले असावे.
- ४) खालीलपैकी पुर्वी न मिळालेली अशी दोन प्राविण्य पदके मिळवावी.
- स्काऊटसाठी :-
- १) निसर्ग निवासी (Camper)
- ३) ग्रामीण कार्यकर्ता/कार्यकर्ती (Rural Worker)
- ५) अग्री संरक्षक (Fireman)
- ७) वार्ताहर (Journalist)
- गाईडसाठी –
- अ गट
- १) टोपल्या बनविणारी (Basket Worker)
- ३) मनोरंजन करणारी (Entertainer)
- ५) शिंपी (Tailor)
- ब गट
- १) होम मेकर (गृहव्यवस्थापिका) (Home maker)
- ३) वाटाड्या (Path Finder)
- २) चिटणीस (Secretary)
- ४) विद्युत उपकरणे (Electronics)
- ६) वनतज्ज्ञ (Forester)
- ८) कुष्ठरोग नियंत्रक (Leprosy Controler)
- २) विद्युत उपकरण तज्ज्ञ (Electronics)
- ४) संगीतकार (Musician)
- २) वार्ताहर (Journalist)
- ४) ग्रामीण कार्यकर्ता (Rural Worker)
- ५) किमान दोन महिने मुदतीपर्यंत चालणाऱ्या समाजसेवा प्रकल्पात दर आठवड्यास १ दिवस या प्रमाणे ३६ तास कार्य करावे. केलेल्या कार्याची दैनंदिनी तयार करावी व ती सन्मान समेत दर आठवड्यास सादर करावी.
- ६) दुसऱ्या स्काऊट गाईड समवेत १० किलोमीटर अंतराची रात्रीची सहल आयोजित करा. किंवा ५० किलोमीटर अंतराची सायकल सहल (गाईडसाठी ३५ किलोमीटर) आयोजित करा आणि सहलीचा अहवाल १० दिवसाच्या आत स्काऊट मास्तर / गाईड कॅप्टन यांना सादर करा.
- ७)बचत योजना, साक्षरता प्रसार, सामुदायिक आरोग्य किंवा सामाजिक वनीकरण याविषयी भरीव समाज विकास
प्रकल्पांची आखणी करावी व त्यात सहभागी व्हावे.
- 8) परिसरात सुरू असलेल्या कब पॅक / बुलबुल फ्लॉक किंवा स्काऊट / गाईड युनिटना वेगवेगळी पदके कोणती व ती कशी मिळवावीत यांचे शिक्षण द्या किंवा परिसरातील लहान मुलांना पंधरा दिवसांपर्यंत निरनिराळे खेळ खेळायला शिकवा..
- ९) राज्य पुरस्कारांनंतर किमान १ वर्षे कार्य केलेले असावे.
- टीप :- १) राष्ट्रीय संस्थेचे आश्रयदाते मा. राष्ट्रपती, राष्ट्रपती
पुरस्कार पदक प्रदान करतात. २) राष्ट्रीय कार्यालय नवी दिल्लीच्या वतीने आयेजित
केलेल्या राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबीरात राज्य
- पुरस्कार पर्यंतच्या सर्व अभ्यासक्रमाच्या कौशल्याच्या चाचण्या द्याव्या लागतील. राष्ट्रपती पुरस्कार जागेवर लावण्यात यावे.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS