⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

नवोदय प्रवेश परीक्षा मराठी आणि इंग्रजी उतारा

नवोदय प्रवेश परीक्षा मराठी उतारा

नवोदय प्रवेश परीक्षा मराठी उतारा

बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.

बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे. त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला. बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते. त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्या ने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.

इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला. ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.

***************************

Birsa Munda was born on November 15, 1875 in Ulihatu, a village in Jharkhand. He was educated in the German Missionary School. Birsa had the nature of mixing with everyone. So at a young age, he organized peer and like-minded collaborations.

Biras was very angry with the Christian missionaries and the British for the forced conversion of his father Sugan Mundas. In that, he thought of teaching a lesson to the British authorities after seeing the oppression of the uneducated tribals by the British. Birsa Mundas considered Swami Anand Pandey of Godgeda village as their gurusthani. With his blessings and his cooperation, Birsa Munda started a fight against the injustice of the British government in Chota Nagpur area in 1895 AD.

The British arrested him and severely tortured him in jail. On 9 June 1900, Birsa Munda died in Ranchi Jail. Birsa Munda was conferred the title of Jananayak by the people.

सराव प्रश्नसंच सूचना :
  1. या सराव उताऱ्यात एकूण 5 प्रश्न देण्यात आलेले आहेत.
  2. मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न देण्यात आलेले आहे.
  3. एकूण 5 गुणांचा सरावसंच आहे.
  4. सर्व प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे.
  5. उतारा व्यवस्थितपणे वाचून घ्यावा.
नवोदय सराव मराठी उतारा |Navodaya practice English passage

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम