स्वच्छता पंधरवडा,स्वच्छता पंधरवडा 2023,स्वच्छता पंधरवडा 2023,स्वच्छता शपथ दिन,स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम,स्वच्छता पंधरवडा या कार्यक्रमाला चालना देण्या
स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम
शालेय शिक्षण व साक्षरता विभाग हा राज्य शासन व केंद्रशासित
प्रशासन यांच्या समन्वयाने सन 2016 पासून प्रत्येक वर्षी स्वच्छता पंधरवडा साजरा
करत आहे. दरवर्षी या विभागाचा स्वच्छता पंधरवडा लाखो मुले आणि समाजातील सदस्यां
व्यतिरिक्त इतर कार्यकर्ते यांचा समावेश असलेली एक जनतेची यशस्वी चळवळ बनली आहे व
तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेश यांच्या द्वारे, स्वच्छतेबाबत
केलेल्या उत्तम कार्याचा गुणगौरव करण्यात येत आहे.
कॅबिनेट सचिवालय,भारत सरकार आणि जलशक्ती
मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग (DDWS) यांनी प्रसारित केलेल्या वर्ष 2023 च्या स्वच्छता पंधरवडा दिनदर्शिकेनुसार
भारतासाठी स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाची अंमलबजावणी दि.1 ते 15 सप्टेंबर,2023 या कालावधीत करावयाची आहे. लक्षवेधी सहभागासाठी योग्य पध्दतीने
स्वच्छता पंधरवडा साजरा करुन विद्यार्थी, शिक्षक व समाज
यांचा सक्रीय सहभाग घेवून साफसफाई, स्वच्छता व आरोग्य आणि
शाळेतील इतर संबंधित उपक्रमांची अंमलबजावणी शाळा / संस्था यांनी करण्याकरीता सूचित
करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील
उपशिक्षणाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी द्यावी. सदर नोडल अधिकारी
यांनी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत / संस्थेत सदर स्वच्छता पंधरवडा
कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व शाळांना या पत्रातील सूचना
देण्यात याव्यात.
1. सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांमधून स्वच्छतेची शपथ
घेण्याकरिता विद्यार्थी शिक्षक/कर्मचारी यांचा सहभाग घेण्यात यावा.
2.स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शालेय व्यवस्थापन
समिती / पालक शिक्षक संघ तसेच पालक व शिक्षक यांच्या बैठका घेण्यात याव्यात व या
बैठकांमध्ये साफ सफाई व स्वच्छतेचे महत्व निर्दशनास आणून द्यावे व तसेच शाळेत व
घरी आरोग्य व स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रूजविण्याबाबत प्रोत्साहित करुन प्रेरणा
देण्यात याव्यात.
3.शिक्षकांनी शाळेतील/संस्थेतील स्वच्छता विषयक सुविधांची
तपासणी करुन गरज भासल्यास त्या सुविधांची दुरुस्ती व देखभाल यासाठीची योजना तयार
करावी.
4. जिल्हा / गट/केंद्र या स्तरावर स्वच्छतागृह व स्वच्छ
शालेय परिसर या विषयी स्पर्धांचे आयोजन करावे.
5.शाळेतील स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी याबाबत
विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा / प्रश्न मंजुषा / घोषवाक्य / कविता लेखन या
स्पर्धांचे आयोजन करावे.
6. विद्यार्थी, शिक्षक व पालक यासाठी
चित्रकला स्पर्धा / प्रतिकृती निर्मिती स्पर्धा आयोजित करावी.
7. स्वच्छता या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करावी.
8. शाळा व संस्था यांच्या संकेत स्थळांवर स्वच्छतेच्या
जागृतीचे संदेश अपलोड करावे व शाळेत स्वच्छतेवरील छायाचित्रे प्रदर्शित केले
जावेत.
वरील सहयोगी उपक्रमाशिवाय शिक्षक आणि शाळा प्रशासन यांच्या
करिता खालील उपक्रमही हाती घेण्यात यावेत.
1.विहित नियमानुसार अनावश्यक जुने रेकॉर्ड व अनावश्यक
फाईल्सचे निर्लेखन करणे आणि त्यांच्या नोंदी ठेवणे.
2. सर्व प्रकारचे खराब साहित्य, जसे
की मोडकळीस आलेले फर्निचर, वापरात नसलेली सामग्री, निकामी वाहने इ. शाळा/संस्थेच्या परिसरातून पूर्णपणे काढून टाकून योग्य
कार्यपध्दतीनुसार निकाली काढावीत.
3.शाळेच्या आवारात एकेरी वापरातील प्लास्टीकवर बंदी घालणे, प्लास्टिक
वापरातून होणाऱ्या प्रदुषणाबाबत जागरुकता निर्माण करणे तसेच 3R - कमीवापर, पुनरवापर आणि पुनर्चक्रिकरण या तत्वाबाबत
जागरुकता निर्माण करावी.
4.स्थानिक प्रतिनिधीच्या सहकार्याने शिक्षक आणि विद्यार्थी
यांनी जवळच्या परिसरातील नागरिक, स्वतःचे कुटूंब,शेजारी
यांचेकडे स्वच्छता पंधरवडा या विषयाचा प्रचार करावा.
5. शालेय परिसरात वारंवार वापरल्या जाणा-या साहित्याची दररोज
स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
स्वच्छता पंधरवडा या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी व
सामुहिक जाणीव निर्माण करण्यासाठी खालील उपक्रम हाती घ्यावेत.
अ) स्वच्छता आणि जलसंवर्धनाबाबत दृकश्राव्य कार्यक्रम/IEC साहित्याची निर्मिती करुन विद्यार्थी, शिक्षक व
इतरांना प्रेरीत करावे.
ब) स्वच्छता पंधरवडा ठळकपणे निदर्शनास आणण्यासाठी
इलेक्ट्रॉनिक फलकाची / बॅनरची निर्मिती करुन ते फलक शाळा / तालुका/जिल्हा/विभाग/
राज्याच्या संकेत स्थळावर ते अपलोड करावेत. सामाजिक माध्यमाचा व इलेक्ट्रॉनिक्स
आणि प्रिंट मिडीया चा वापर करुन स्वच्छता पंधरवड्याची जाहिरात देवून जनजागृती
निर्माण करण्यात यावी.
स्वच्छता पंधरवडा, 2023 करिता सूचविलेली
कार्य योजना (दि. 1 ते 15 सप्टेंबर, 2023) सोबत जोडत आहोत.
दि.1 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा कृती आराखड्याप्रमाणे
मनापासून विद्यार्थी, शिक्षक, पालक
स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आपण त्यानुसार COVID-19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी दिलेल्या आरोग्य व स्वच्छता विषयक
सूचनांचे पालन करण्यासंबंधी सर्व शाळा / शैक्षणिक संस्था यांना आवश्यक सूचना
निर्गमित कराव्यात.
स्वच्छता पंधरवडा यशस्वी होण्याकरीता आपण आपल्या जिल्ह्यातील
स्वछता पंधरवडा कालावधीत सहभागी होणाऱ्या शाळा व विद्यार्थ्यांची संख्या तसेच
दररोज स्वच्छता पंधरवडा बाबतचे ठळक वैशिष्ट्यासह दररोज (दिननिहाय ) छायाचित्रे, व्हिडीओ
चित्रफित इत्यादी https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड
करण्यात यावेत. सर्वोत्तम सादरीकरण करणारे राज्य/केंद्रशासित प्रदेश / संस्था
यांना त्याच्या स्वच्छता पंधरवड्यातील सहभागावर आधारित बक्षीस ही दिले जाणार आहे.
स्वच्छता पंधरवडा अंतर्गत सूचविलेले सर्व उपक्रम नियमित, वर्षभर
एकात्मिक पध्दतीने सतत शाळां व संस्थांमध्ये सुरु रहावेत यासाठी प्रोत्साहन
द्यावे.
स्वच्छता पंधरवडा दि.१ ते १५ सप्टेंबर २०२३ साजरा करावयाचा
कृती आराखडा दि.०१/०९/२०२३ (शुक्रवार)
स्वच्छता शपथ दिन
- विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांचा सहभाग घेऊन
स्वच्छता शपथ दिन कार्यक्रमाचे आयोजन करावे व त्यात विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
शपथ / प्रतिज्ञा म्हणवून घ्यावी.
- स्वच्छतेची काळजी व वैयक्तिक स्वच्छतेबाबतच्या जाणीव जागृतीचे संदेश शाळेच्या / संस्थेच्या / विभागाच्या वेबसाईटवर तसेच शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावे.
- स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबतचे आणि स्वच्छतेच्या बाबत जाणीव जागृतीचे इलेक्ट्रॉनिक बॅनर्स तयार करून विभागाच्या किंवा राज्याच्या वेबपोर्टलवर प्रदर्शित करणे.
- स्वच्छतेबाबत शपथ घेतलेल्या शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच
शपथविधी कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीसंबंधीचे साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करावे.
दि.०२/०९/२०२३ ते दि. ०३/०९/२०२३ (शनिवार व रविवार) स्वच्छता जाणीव जागृती दिन
- विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये
स्वच्छतेबाबत जाणीवजागृती निर्माण होण्याकरिता शाळा व्यवस्थापन समिती / पालक
शिक्षक संघ यांची सभा गुगलमीट, झूम द्वारे आयोजित करणे आणि
विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळेमध्ये व घरामध्ये
स्वच्छता करण्याबाबत प्रेरित करणे.
- शिक्षकांकरवी शाळेतील / संस्थेमधील प्रत्येक कानाकोप-यामध्ये स्वच्छतेविषयक सुविधांची पाहणी करावी आणि आवश्यक तेथे सदर सुविधांच्या अद्ययावततेबाबत प्रस्ताव द्यावेत.
- दैनंदिन स्वच्छता,मुला-मुलींसाठी स्वतंत्र
शौचालये, पाण्याची सुविधा, वायूविजण,
कचरा व्यवस्थापन, साबण व हॅन्डवॉश पुरवठा,
स्वच्छ पाणी, स्वच्छता कर्मचारी या सर्व
स्वच्छता विषयक बाबींसाठी स्थानिक प्रतिनिधींसोबत चर्चा करावी.
- जलजीवन मिशनच्या दृष्टीने शाळेतील पाईपद्वारे पाणीपुरवठा
जोडणीसाठी आवश्यक तपासणी करावी. सध्याच्या जलशक्ती अभियान - Catch the rain (पावसाचे पाणी साठवणे) २०२३ मोहीमेच्या पार्श्वभूमीवर
- शाळेतील पाणी साठवण व्यवस्थेबाबत सद्यस्थिती तपासून साठवण क्षमता वाढविण्यासाठी योग्य उपाययोजना करावी.
- स्वच्छतागृह,स्वयंपाकघर, वर्गखोली, पंखे, दारेखिडक्या,
परिसराती झुडूप साफ करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी, SMC सदस्य, शिक्षक - पालक संघातील सदस्य यांचे सहकार्य
घेता येईल.
- सर्व प्रकारचे टाकाऊ साहित्य जसे तुटलेले फर्निचर, निरुपयोगी
उपकरणे, निकामी झालेली वाहने, शाळा व
संस्थांच्या आवारातून पूर्णपणे काढून टाकावीत.
- वरील उपक्रमांत सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच
उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिद्धीसंबंधीचे साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करावे.
दि.०४/०९/२०२३ ते दि. ०५/०९/२०२३ (सोमवार व मंगळवार) समुदाय पोहोच :
- स्वच्छतेबाबत समाजाचे उद्बोधन करण्याकरिता सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेच्या गावामध्ये भेटी देणे. त्यांच्या भेटीचा मुख्य उद्देश लोकांनी शौचालयाचा वापर करणे आणि त्यांच्या परिसरातील कचरा व्यवस्थापनाचे काम याबाबत पाहणी करणे हा असेल. शिक्षकांनी तेथील लोकांना पाण्याच्या अपव्ययाबद्दल आणि जलसंधारणाच्या महत्वाबद्दल तसेच सध्या चालू असलेले जलशक्ती अभियान याविषयी महत्त्व स्पष्ट करावे.
- विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्थानिक प्रतिनिधीच्या समन्वयाने / सहकार्याने स्वच्छता पंधरवड्याच्या महत्त्वाविषयी स्थानिक परिसरामध्ये प्रसार-प्रचार करावा.
- प्रत्येक शाळेत शिक्षक दिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करावेत.
- समुदाय पोहोच उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी
संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीविषयक
साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करावे.
दि.०६/०९/२०२३ (बुधवार) हरित शाळा अभियान
- जलसंवर्धन, एकेरी वापराचे प्लास्टिक काढून टाकणे
यासारख्या विविध विषयांवर कल्पक घोषवाक्य,पोस्टर आणि
माहितीपत्रक तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे व तयार झालेले
साहित्य शालेय प्रदर्शन, शाळा परिसर, गावातील
भिंती येथे प्रदर्शित करावे.
- विद्यार्थ्यांना पाण्याच्या संवर्धनाविषयी शिक्षित करणे, विद्यार्थ्यांना
पाण्याच्या टंचाईच्या परिणामाबद्दल जागरुक करणे तसेच पाण्याच्या नैसर्गिक
स्त्रोतांचे संरक्षण करण्यास सक्षम करणे. प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज किमान एक
लिटर पाण्याची बचत करण्यास मदत करणे. घर आणि शाळेत पाण्याचा कमीत कमी वाया
जाण्याचा विवेकपूर्ण वापर करण्याबाबत प्रोत्साहित करणे.
- सदर उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच
उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीविषयक साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करावे.
दि. ०७/०९/२०२३ व ०८/०९/२०२३ (गुरुवार व शुक्रवार) स्वच्छता सहभाग दिन
- जिल्हा / तालुका / केंद्र स्तरावर शाळांमध्ये स्वच्छ शाळा, स्वच्छ
परिसर, स्वच्छ स्वच्छतागृहे अशा स्पर्धा घेण्यात याव्यात.
- शाळास्तरावर निबंध, घोषवाक्य, वकतृत्व, प्रश्नमंजूषा, चित्रकला, स्कीट (प्रहसन), कविता लेखन, घोषवाक्य लेखन, प्रतिकृति तयार करणे अशा स्पर्धा घेण्यात याव्यात.
- सदर उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच
उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ व प्रसिध्दीविषयक साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंकवर अपलोड करण्यात यावे.
दि.०९/०९/२०२३ व दि.१०/०९/२०२३ ( शनिवार व रविवार)
हात धुणे दिन :
- दैनंदिन जीवनामध्ये हात धुण्याचे महत्त्व याविषयी जाणीव जागृती निर्माण करण्यात यावी.
- विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी व जेवणानंतर योग्य प्रकारे हात धुण्याच्या पद्धती शिकविण्यात याव्या.
- दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अडथळेविरहित पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी.
- पाण्याच्या अपव्ययाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी.
- हात धुणे स्टेशनपासून ते शालेय बगीचा या दरम्यानच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- मुलांना दुषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांबद्दल माहिती द्यावी. पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी करण्याबाबत माहिती द्यावी जेणेकरुन विद्यार्थी हात व पिण्याचे पाणी याबाबत सुरक्षितता राखतील.
- उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच फोटो, व्हिडीओ
व प्रसिध्दीविषयक साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड
करणे.
दि.१९/०९/२०२३ (सोमवार) वैयक्तिक स्वच्छता दिन :
- विद्यार्थी शिक्षक कर्मचाऱ्यांना वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत प्रेरणा देण्याकरिता दृकश्राव्य कार्यक्रमांचे आयोजन करावे.
- नखे कापणे व स्वच्छता राखणे याबाबत विद्यार्थ्यांना योग्य पद्धती शिकविण्यास मदत करावी.
- स्वच्छतेच्या सवयींचा संपूर्ण आरोग्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष परिणामाबाबत माहिती देण्यात यावी.
- विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह आणि पिण्याचे पाणी या सूविधा योग्य वापरण्याबाबत मार्गदर्शन करावे.
- विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात दिवसातून दोन वेळा दात घासण्याचे व स्वच्छ करण्याचे महत्व पटवून द्यावे.
- उपक्रमामध्ये शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो/व्हिडीओ / प्रसिध्दी साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करणे.
दि. १२/०९/२०२३ (मंगळवार) शाळा स्वच्छता प्रदर्शन दिन :
- शाळेमध्ये स्वच्छतेवर आधारित छायाचित्रे, चित्रकला,
कार्टून्स, घोषवाक्ये इ. Online /
Offline प्रदर्शित करावीत.
- सदरच्या प्रदर्शनाचे दस्तऐवज तयार करणे.
- स्थानिक पुनर्वापरयोग्य कच्च्या मालाचा वापर करून कचराव्यवस्थापनासाठी शिल्पकलेचा उपयोग करावा जसे की स्थानिकांच्या कौशल्यांचा उपयोग करून त्यांच्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी कचरापेटी तयार करावी.
- उपक्रमामध्ये सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम
/ कार्यक्रमाचे फोटो / व्हिडीओ व प्रसिध्दीविषयक साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करणे.
दि. १३/०९/२०२३ ते १४/०९/२०२३ (बुधवार व गुरुवार) स्वच्छता कृती दिन :
- समग्र शिक्षा योजनेंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती/शाळा व्यवस्थापन व विकास समिती मार्फत विद्यार्थी पालक आणि स्थानिक लोकांमध्ये जाणीव जागृती व स्वच्छता कृती आराखडा तयार करण्यात यावा.
- शाळेमध्ये स्वच्छता पंधरवडा विषयक आयोजित कृतींच्याबाबत चर्चा करण्याकरिता आणि शाळेव्दारे स्वच्छता विषयक नवीन कृतींचे आयोजन करण्याकरिता बालसंसद किंवा बालसभा बोलविण्यात यावी.
- स्वच्छता पंधरवडा अंतर्गत विविध नवीन उपक्रम समाविष्ट केले जाऊ शकतात. याबद्दलच्या शिफारसी देण्याकरीता नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहित करावे तसेच आपल्या शिफारसी राज्याच्या व केंद्राच्या शिक्षण विभागाकडे पाठवाव्यात.
- उपक्रमांतील सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो व प्रसिध्दीविषयक साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करावे.
दि.१५/०९/२०२३ (शुक्रवार) पारितोषिक वितरण दिन :
- स्वच्छतेस प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला, निबंधलेखन,
वादविवाद आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना पारितोषिक वितरण करण्यात यावे.
- स्वच्छता पंधरवडा दरम्यान सर्व शाळा / शैक्षणिक संस्थांनी
आयोजित केलेल्या कृतींमधील सर्वोत्तम कृतीची निवड करून जिल्हा / राज्यस्तरीय
अधिकाऱ्यांकडे पाठवून द्यावी, संबंधित कृती राज्य/राष्ट्र स्तरावरील
वेबसाईटवर अपलोड करण्यात यावे.
- उपक्रमांमधील सहभागी शिक्षक व विद्यार्थी संख्या तसेच उपक्रम / कार्यक्रमाचे फोटो व प्रसिध्दी विषयक साहित्य https://forms.gle/srMKA3q8xg3mmRHn9 या लिंक वर अपलोड करावे.
विशेष सूचना
- प्रत्येक उपक्रमाचे दिननिहाय फोटो व व्हिडीओ त्या-त्या दिवशी सायंकाळपर्यंत सर्व शाळांनी वरील लिंकवर अपलोड करोवत.
- फोटो मर्यादा 1 ते 2 फोटो - (1 ते 5 MB)
- उपक्रम व्हिडीओ 1 - ( 1 ते 10 MB)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS