Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

विद्यार्थी विचार मंथन २०२३-२४ परीक्षा | Vichar Manthan Exam 2023-24

SHARE:

vidyarthi vigyan manthan,vidyarthi vigyan manthan syllabus,vidyarthi vigyan manthan question paper,vidyarthi vigyan manthan question paper class 6,vid

vidyarthi vigyan manthan,vidyarthi vigyan manthan syllabus,vidyarthi vigyan manthan question paper,vidyarthi vigyan manthan question paper class 6,vidyarthi vigyan manthan registration,vidyarthi vigyan manthan study material,vidyarthi vigyan manthan prize,vidyarthi vigyan manthan syllabus 2023,vidyarthi vigyan manthan login,vidyarthi vigyan manthan question paper class 10,विद्यार्थी विचार मंथन २०२३-२४ परीक्षा | Vichar Manthan Exam 2023-24

विद्यार्थी विचार मंथन २०२३-२४ परीक्षा | Vichar Manthan Exam 2023-24

विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त विद्यमाने 'विद्यार्थी विज्ञान मंथन (vidyarthi vigyan manthan) ही परीक्षा दरवर्षी इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी तसेच आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या भरीव योगदानाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ही या परीक्षेची उद्दिष्टे आहेत.

भारतीय वैज्ञानिकांच्या कार्याचा परिचय व्हावा आणि त्यापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने या वर्षी थोर भारतीय वैज्ञानिक, नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांची जीवनगाथा विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असणार आहे. भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांचे चरित्र, 'भारताचे विज्ञान-विश्वातील योगदान आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान' हा विशेष अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध होईल.

इयत्ता सहावी ते अकरावीमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी या (vidyarthi vigyan manthan) परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील. यावर्षी मुख्य परीक्षा दि. २९ ऑक्टोबर २०२३ आणि ३० ऑक्टोबर २०२३ या दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी आपल्या घरून अथवा शाळेमधून मोबाईलद्वारे (अँड्रॉइड) परीक्षा द्यायची आहे. परीक्षेचा कालावधी हा दीड तास (९० मिनिटे) असणार आहे. सकाळी १० ते सायं. ६ वाजेपर्यंत मोबाईलवर परीक्षेच्या अँपवर लॉगिन करून कोणत्याही वेळी दीड तासामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना देणे सोपे व्हावे म्हणून चाचणी परीक्षा (मॉक टेस्ट) दि. १ ऑक्टोबर २०२३ पासून घेण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच अन्य १२ भारतीय भाषांमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या भाषांपैकी कोणत्याही भाषेत परीक्षा देता येईल.

मुख्य परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असून या मध्ये १०० प्रश्न (१०० गुण) विचारले जातील.

विभाग अ मध्ये भारताचे विज्ञानातील योगदान, भारतरत्न चंद्रशेखर वेंकट रमण यांची जीवनगाथा आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि विज्ञान यावर आधारित ४० प्रश्न विचारले जातील. विभाग अ हा ४० गुणांचा असून यासाठी वेळ ३० मिनिटे असणार आहे.

विभाग ब मध्ये विद्यार्थ्यांच्या विज्ञान व गणित या शालेय अभ्यासक्रमातील विषयांवर आधारित ५० प्रश्न (५० गुण) आणि सामान्य तर्कशास्त्रावर आधारित १० प्रश्न (१० गुण) विचारण्यात येतील. विभाग ब हा एकूण ६० गुणांचा असून यासाठी वेळ ६० मिनिटे असणार आहे.

जर विभाग अ मध्ये विद्यार्थ्यास २० गुण किंवा अधिक गुण मिळाले तरच विभाग ब चे मूल्यांकन करण्यात येईल.

राज्यातील सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २० विद्यार्थी हे राज्यस्तरीय शिबिरासाठी (State Level Camp) पात्र ठरतील. तसेच राज्यस्तरीय शिबिरामध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २ विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरासाठी (National Camp) पात्र ठरतील. राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन हे २६ नोव्हेंबर २०२३ किंवा ३, १० किंवा १७ डिसेंबर २०२३ यादिवसांपैकी कोणत्याही एका किंवा दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीराचे आयोजन हे १८ आणि १९ मे २०२४ यादिवशी करण्यात येणार आहे. राज्य स्तरीय शिबीर आणि राष्ट्रीय शिबीर हे प्रयोग क्रिया, निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता, परिस्थितीजन्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता, सर्जनशीलता, नेतृत्वगुण इ. घटकांवर आधारित असेल. या शिबिरांची विस्तृत माहिती मुख्य परीक्षेनंतर देण्यात येईल.

या वर्षीच्या परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये

१) सृजन प्रशिक्षण कार्यक्रम : या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये (ISRO, DRDO, CSIR, BARC इ.) स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारण १ ते ३ आठवडे असा असणार आहे.

२) भास्कर शिष्यवृत्ती : भास्कर शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय विजेत्यांसाठी आहे. एक वर्षासाठी रु. २००० प्रति महिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. सृजन प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय विजेत्यांना एखादा प्रकल्प नेमून देण्यात येईल आणि त्या प्रकल्पाचे विषय तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल. या मूल्यांकनानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.

३) रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र : राष्ट्रीय, क्षेत्रीय व राज्य स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.

सध्या परीक्षेसाठी नोंदणी चालू आहे. नोंदणीची प्रक्रिया (Registration) अत्यंत सोपी असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरच वैयक्तिकरित्या नोंदणी (Individual Registration) अथवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी ( Through School Registration) करता येईल. संस्थेमार्फत नोंदणीसाठी रु. २००/- शुल्क ठेवण्यात आलेले आहे.

नोंदणीची अंतिम मुदत दि. १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी http://vvm.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

Registration Link

vidyarthi vigyan manthan,vidyarthi vigyan manthan syllabus,vidyarthi vigyan manthan question paper,vidyarthi vigyan manthan question paper class 6,vidyarthi vigyan manthan registration,vidyarthi vigyan manthan study material,vidyarthi vigyan manthan prize,vidyarthi vigyan manthan syllabus 2023,vidyarthi vigyan manthan login,vidyarthi vigyan manthan question paper class 10

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,137,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,369,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,627,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,524,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,779,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,512,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,31,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : विद्यार्थी विचार मंथन २०२३-२४ परीक्षा | Vichar Manthan Exam 2023-24
विद्यार्थी विचार मंथन २०२३-२४ परीक्षा | Vichar Manthan Exam 2023-24
vidyarthi vigyan manthan,vidyarthi vigyan manthan syllabus,vidyarthi vigyan manthan question paper,vidyarthi vigyan manthan question paper class 6,vid
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiccLN0IGYeTsEb_FxtAmHDa_SZhmgTejP1fnDaC6NasVoJZPOELFKJzOYJPKMR3A7PPLP8YCQC7jMxuwZZ7QbrFYxGD5M2rk-qV5dmB4Gr4ugfY6c_0zy3vuWFm8WGHtj2xIxDG2tFYmc0GyYXdfBMCY4FOqhZrZmQ7ltrHbg40S6LEEIHu0v3QKRcqy8/s16000/VIDYARTHI%20VIGYAN%20MANTHAN%20.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiccLN0IGYeTsEb_FxtAmHDa_SZhmgTejP1fnDaC6NasVoJZPOELFKJzOYJPKMR3A7PPLP8YCQC7jMxuwZZ7QbrFYxGD5M2rk-qV5dmB4Gr4ugfY6c_0zy3vuWFm8WGHtj2xIxDG2tFYmc0GyYXdfBMCY4FOqhZrZmQ7ltrHbg40S6LEEIHu0v3QKRcqy8/s72-c/VIDYARTHI%20VIGYAN%20MANTHAN%20.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/08/vichar-manthan-exam-2023-24.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/08/vichar-manthan-exam-2023-24.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS