⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीतर्गत उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य सूचना

मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीतर्गत उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य सूचना

मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीतर्गत उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य सूचना

Interview and teaching skill instruction of the candidates under the Pavitra Portal in the institutes given the option of recruitment along with the interview

१. आपल्या संस्थेने पवित्र पोर्टलवर मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेला आहे. निवडलेल्या पर्यायानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस करुन संस्थेच्या लॉगीनवर गुणवत्ता यादी उपलब्ध करुन दिलेली आहे.

२. मुलाखतीसह शिक्षक पदभरती हा विकल्प निवडलेल्या संस्थांना उमेदवारांची शिफारस करते वेळी उमेदवारांस अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील प्राप्त गुण, बिंदुनामावली (समांतर आरक्षणासह), जाहिरातीतील विषय, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व दिलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेण्यात आलेल्या आहेत.

३. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी १:१० या मर्यादेत (सामाजिक व समांतर आरक्षणासह) उमेवार उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

४. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण आहेत, उमेदवारांची अंतीम निवड या ३० गुणांच्या आधारे करण्यात यावी.

५. आपल्या संस्थेच्या जाहिरातीतील इ. ६वी ते इ. ८वी / इ. ९वी ते इ. १०वी/ इ.११वी ते इ.१२वी या गटातील रिक्त पदांसाठी उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

६. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील प्रलंबित पुनर्विलोकन याचिकेमुळे इ. १ली ते इ.५वी या गटातील रिक्त पदांसाठी शिफारस करण्यात आलेली नाही. मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार स्वतंत्रपणे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. त्या जागा सद्यस्थितीत रिक्त राहतील.

७. उमेदवारांकडून कोणतीही कागदपत्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाहीत. उमेदवारांनी केवळ पोर्टलवर नोंद केलेल्या माहितीच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

८. उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी यापुर्वी करण्यात आलेली नाही. त्यासाठी संस्थेच्या लॉगीनवर उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र ( Self-Certified copy) उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने शिफारस केलेले पद व गट, विषय, आरक्षण, सादर केलेली कागदपत्रे इत्यादी बाबींच्या आधारे उमेदवार पात्र ठरतो किंवा नाही, याची तपासणी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यापूर्वी संस्थेने तपासणी करावी.

९. नियुक्तीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची नियुक्ती पुर्वी प्रत्यक्ष पडताळणी करावी. मुलाखतीपूर्वीच्या कागदपत्र पडताळणीच्या वेळी तसेच नियुक्तीच्या वेळच्या मूळ कागदपत्र पडताळणीच्या वेळी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी उपस्थित राहील.

१०. उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीच्या वेळी प्रामुख्याने खालील बाबी विचारात घ्याव्यात.

अ) मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केलेल्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दि.२२.११.२०१७ रोजी पर्यंत धारण केलेली असावी.

ब) उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संदर्भाधिन शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय दि.०७.०२.२०१९, दि.२५.०२.२०१९, दि.१६.०५.२०१९ व दि. १२.०६.२०१९ मध्ये नमूद केल्यानुसार असावी.

क) उच्च माध्यमिक स्तरावरील पदासाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असल्याची खात्री करावी. तसेच माध्यमिक स्तरावरील पदासाठी पदवी स्तरावर उमेदवार किमान उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण असल्याची खात्री करावी.

११. पवित्र पोर्टलवर मुलाखतीसह पदभरतीसाठी संस्था व उमेदवार यांच्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना (दि.१५.०७.२०२३) उपलब्ध आहेत, त्यानुसार पदभरतीसाठी कार्यवाही करावी.

१२. कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची कारणासह माहिती संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना निवड यादी अंतीम करण्यापूर्वी पाठविण्यात यावी.

१३. मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही दि. ११.०८.२०२३ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे, यासाठीचे नियोजन/वेळापत्रक तयार करुन संबंधित उमेदवारांस ठराविक वेळेपुर्वी कळवावे. उमेदवारास वेळापत्रकाची अडचण येत असल्यास त्या उमेदवारांच्या बाबतीत वेळापत्रकामध्ये आवश्यक तो बदल करावा.

१४. पदभरतीसाठी काही अडचणी येत असल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

१५. पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीसाठी शासनाच्या तरतुदीसह सामाजिक व समांतर आरक्षणाच्या तरतूदीचे काटेकोरपणे पालन करावे, अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेली असल्याचे निर्दशनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची राहील.

मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीतर्गत उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य सूचना
मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीतर्गत उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य सूचना
मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीतर्गत उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य सूचना
मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणालीतर्गत उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य सूचना


कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम