चॅटबॉट पायाभूत चाचणीचे गुण भरण्यासाठी उपलब्ध swiftchat by convegenius,swiftchat by convegenius app,swiftchat by convegenius login,swiftchat by convege
PAT महाराष्ट्र या ChatBoat वर गुण भरणे सुविधा उपलब्ध
पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT - १ ) ( महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण भरणे
STARS प्रकल्पामधील SIG - २ Improved
Learning Assessment System नुसार सन २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षात
इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित
मूल्यमापन २ ( PAT-१ ते ३ ) चे आयोजन करण्यात येणार आहे.
उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी - १ (PAT -२ ) चे आयोजन दि. २२ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक
स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा
(सर्व माध्यम), गणित ( सर्व माध्यम), तृतीय
भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT -२)
घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी - १ (PAT -२
) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण
विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून
देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी
यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.
राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-२) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना यापूर्वी दि. ११ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि, सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील फक्त ४० टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केलेली दिसून येत आहे.
तथापि, सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. २७ नोव्हेंबर २०२४ ते ५ डिसेंबर २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.
तसेच १०० टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. याबाबत उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी - १(PAT -२ )गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित ' चाचणी - १ (PAT -२ ) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे.
चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA प्रतिसाद नोंदवावा.
१.पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT - १ ) चाटबॉट
मार्गदर्शिका :
२. पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT - १) गुणांची
नोंद करणेसाठी लिंक -
-
पायाभूत मूल्यमापन चाचणी (PAT - १ ) ( महाराष्ट्र) वेबपेज
LIVE NOW TRAINING
- [accordion]
- आपण एप्लीकेशन ओपन केल्यानंतर आपल्या शाळेतील काही
विद्यार्थी एप्लीकेशन वर दिसून येतात तर काही विद्यार्थी दिसून येत नाही असे का?
- कोरोना कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने स्वाध्याय उपक्रम सुरू केला होता सदर स्वाध्याय उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्याच्या मोबाईलवरून भरायचा होता ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेस स्वाध्याय उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला अशा विद्यार्थ्यांचे नावे यामध्ये आहेत इतर विद्यार्थ्यांचे स्टुडन्ट पोर्टल वरून नावे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे संपूर्ण नावे स्टुडन्ट चेकबोट वर आल्यानंतर आपल्याला त्यांची देखील माहिती भरता येईल.
- दुसऱ्या शाळेतून विद्यार्थी आला असेल तर तो दिसत नाही?
- याची देखील उत्तर हेच आहे की स्टुडन्ट पोर्टलला आपण त्याला अटॅच केले असेल तर तो आपल्याला डेटा अपडेट झाल्यानंतर दिसेल.
- जे जास्तीचे विद्यार्थी दिसत आहेत त्यांच्याबाबत काय करायचे?
- शाळेत नसणारे या अगोदर शाळेत असणारे दुसऱ्या शाळेत गेलेले
विद्यार्थी आपल्या शाळेत गुण भरताना दिसत आहेत सदर विद्यार्थ्यांची गुण आपण भरायचे
नाही किंवा त्यांना अनुपस्थित देखील दाखवायचे नाही त्यांची माहिती प्रलंबित
ठेवायची आहे जेव्हा स्टुडन्ट पोर्टलवरून CHATBOT वर माहिती अपडेट
होईल अशावेळी सदर विद्यार्थी त्या त्या शाळेवर दिसतील व आपल्या शाळेवरून कमी
होतील.
- आपण विद्यार्थी माहिती भरत असताना वर्ग निवडला विषय निवडला व विद्यार्थी माहिती भरण्यास सुरुवात केली माहिती भरताना आपण मध्येच नंतरचा विद्यार्थी भरण्याचे ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला मुख्यमणीवर किंवा मागे येता येत नाही जर आपले आपण मागे आलात तर अगोदर भरलेली सर्व माहिती सेव न होता ती माहिती आपल्याला परत भरावी लागू शकते त्यामुळे काळजीपूर्वक शेवटचा विद्यार्थी माहिती म्हणजेच गुण भरल्यानंतर पुढील विद्यार्थ्यांचे गुण भरा हे ऑप्शन न निवडता त्यानंतरचे मेन्यू चे ऑप्शन निवडावे.
- जर पुढील विद्यार्थ्यांची माहिती भरा असे ऑप्शन निवडले असेल तर आपल्याला भरलेलाच विद्यार्थी निवडून त्याचे गुण परत भरावे लागतील व त्यानंतर मेन्यू बदलून घ्यावा लागेल.
जर वर्गातील विद्यार्थी दिसत नसतील तर आपले स्टुडन्ट पोर्टल
वरील विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवून ते स्टुडन्ट पोर्टलवर घ्यावे विद्यार्थी
आपल्याला चॅटबॉट मध्ये देखील दिसतल.
Attendance Bot बाबत वारंवार विचारल्या
जाणाऱ्या समस्यांची उत्तरे
जास्तीचे विद्यार्थ्यांना डिटॅच करावी म्हणजेच ज्या शाळेत
केले आहेत त्या शाळेत दिसतील.
पायाभूत चाचणीचे गुण
PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर शिक्षकांनी नोंदविणे बाबत
प्रशिक्षण
Training for Teachers to Payabhut Chachni Marks on Chatbot
PAT (Maharashtra)
विद्यार्थ्यांचा अध्ययन संपादणूकीचा नियमित आढावा घेऊन आवश्यक कृती-योजना राबविण्यासाठी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात STARS प्रकल्प अंतर्गत वर्षभरात तीन नियतकालिक चाचण्यांचे आयोजन इयत्ता तिसरी ते आठवीसाठी करण्यात येत आहे. यातील पहिली पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाळास्तरावर घेण्यात आलेली आहे. दुसरी संकलित मूल्यमापन १ ही चाचणी ३१, ३१ ऑक्टोंबर व ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आली आहे.तरी आपणास कळविण्यात येते की, संदर्भ क १ नुसार विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन १ या चाचणीचे गुण भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर चॅटबॉटवर शिक्षकांनी गुण कसे नोंदवावेत याबाबतचे ऑनलाईन स्वरुपात यु-ट्युबद्वारे प्रशिक्षण शिक्षकांना दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ठीक १२ ते १ या कालावधीत देण्यात येणार आहे. तरी आपल्या अधिनस्त शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा मधील शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण घेणेबाबत सूचित करण्यात यावे. प्रशिक्षण झालेनंतर सदर शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या संकलित मूल्यमापन १ चे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर नोंदविणेबाबत आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात.
PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याचा कालावधी दि. २८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ असणार आहे.
चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक मदतीसाठी श्री. वेंकटेश अनंतरामन ८०००४९४७६४ यांचेशी संपर्क करण्यात यावा.
PAT चॅटबॉट मार्गदर्शिका
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS