पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार यादीमध्ये नाव नोंदणी,padvidhar election registration,padvidhar election registration nashik,padvidhar election regi
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी
Enrollment of name in voter list for elections in graduate
and teacher constituencies
भारत निवडणूक आयोगाच्या दि.०९.०८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये
दिलेल्या निर्देशानुसार, राज्यातील मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व
नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघामध्ये सन २०२४ मध्ये होणाऱ्या द्विवार्षिक
निवडणूकींसाठी त्या विभागातील अनुक्रमे पदवीधर व शिक्षक यांची दि. १.११.२०२३ या
अर्हता दिनांकावर पुर्णत: नविन मतदार यादी (de-novo elector's roll) तयार करण्याची मोहीम दि.३०.९.२०२३ पासून सूरु होत आहे. या मोहिमेंतर्गत
दि. ३०.९.२०२३ ते दि. ६.११.२०२३ या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना १८ (Form
१८) व शिक्षक मतदार नोंदणीसाठी नमुना १९ (Form १९) स्विकारण्यात येतील. दि.२३.११.२०२३ रोजी प्रारुप मतदार याद्या
प्रसिद्ध करण्यात येतील व दि. २३.११.२०२३ ते दि. ९.१२.२०२३ या कालावधीत दावे व
हरकती स्विकारल्यानंतर, दि.३०.१२.२०२३ रोजी अंतिम मतदार
याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.
या निवडणूकांसाठी संबंधित विभागीय आयुक्त हे मतदार नोंदणी
अधिकारी (Electoral Registration Officer) तसेच त्या विभागातील
जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी (Assistant Electoral
Registration Officer) असतात.
द्विवार्षिक निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी, मुंबई
व कोकण विभागातील पात्र पदवीधर व्यक्तींनी तसेच मुंबई व नाशिक विभागातील पात्र
शिक्षकांनी त्या संबंधित विभागामध्ये पदवीधर/ शिक्षक मतदार म्हणून मोठ्या प्रमाणात
नाव नोंदणी करावी, यासाठी मुंबई, नाशिक
व कोकण विभागातील शाळांनी खालीलप्रमाणे मोहिम राबविण्याबाबतची विनंती अपर मुख्य
सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुंबई,नाशिक व कोकण विभागातील
शैक्षणिक संस्था / शाळांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही
अ) पदवीधर मतदार संघ
मुंबई व कोकण विभागामध्ये पदवीधर विधानपरिषद मतदारसंघासाठी मतदार यादी तयार करण्यात येत असल्याने, त्या विभागातील पात्र पदवीधर शिक्षकांनी (अर्हता दिनांक दि. १.११.२०२३ पुर्वी किमान ३ वर्षे आधी पदवी धारण केलेल्या) संबधित पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात यावे तसेच प्रोत्साहित करण्यात यावे.
मुंबई व कोकण विभागातील शिक्षण संस्था/शाळामध्ये कार्यरत
असलेल्या पात्र पदवीधर शिक्षकांना संबधित पदवीधर विधान परिषद मतदार संघाच्या मतदार
यादीमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी नमुना १८ (FORM १८) भरावा लागेल. सदर
नमुना १८, संबधित विभागीय आयुक्त ( या निवडणूकीचे मतदार
नोंदणी अधिकारी), संबधित जिल्हाधिकारी (या निवडणूकीचे मतदार
नोंदणी अधिकारी), विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले
उप विभागिय आयुक्त तसेच तहसिलदार यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील तसेच सदर
योग्यरित्या भरलेले अर्ज त्या कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणे, हा नमुना मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य
यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Downloads/DownloadForms/Form-१८.pdf येथे सुद्धा उपलब्ध आहे. सदर नमुना
संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घेऊन (प्रिन्ट काढून) भरुन देता येईल. (ऑन-लाईन
पद्धतीने नमूना सदर करण्याची सुविधा उपलब्ध नाही)
योग्य रितीने भरलेला नमुना १८ (FORM १८), त्यासोबत शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक
पुराव्यासह वर नमूद संबंधित कार्यालयात सादर करता येईल. सदर अर्ज प्रत्यक्ष
कार्यालयात सादर केल्यास, संबधित पदनिर्देशित अधिकाऱ्याला
मुळ पदवी प्रमाणपत्र/ गुणपत्रिका किंवा अन्य विहित कागदपत्र दाखवावे लागेल.
टपालाद्वारे नमुना १८ पाठविल्यास, संबधित शैक्षणिक पात्रता
दर्शविणारा पुरावा / कागदपत्रे पदनिर्देशित अधिकारी/सहायक पदनिर्देशित अधिकारी /
संबंधित जिल्ह्यातील राजपत्रित अधिकारी/ नोटरी पब्लिक यांच्याकडून प्रमाणित केलेली
असणे आवश्यक आहे.
ब) शिक्षक मतदार संघ
मुंबई व नाशिक विभागामध्ये शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी
मतदार यादी तयार करण्यात येत असल्याने, त्या विभागातील, लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या अधिनियम २७ (३)(ब) खाली राज्य शासनाने
निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित केलेल्या , माध्यमिक
शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शाळांमध्ये दि. १.११.२०२३ या अर्हता
दिनांकापुर्वीच्या लगतच्या सहा वर्षामध्ये किमान ३ वर्षे शिक्षक म्हणून कार्यरत
असलेल्या शिक्षकांना संबधित शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नाव
नोंदविण्याचे आवाहन करण्यात यावे तसेच प्रोत्साहित करण्यात यावे.
मुंबई व नाशिक विभागातील पात्र शिक्षकांना संबधित शिक्षक
विधान परिषद मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करण्यासाठी नमुना १९ (FORM १९) व त्यासोबत विहित नमुन्यातील संबधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने
दिलेले प्रमाणपत्र भरावे लागेल. सदर नमुना १९ व विहित प्रमाणपत्राचा नमुना,
संबधित विभागीय आयुक्त (या निवडणूकीचे मतदार नोंदणी अधिकारी),
संबधित जिल्हाधिकारी (या निवडणूकीचे मतदार नोंदणी अधिकारी), विभागीय आयुक्तांकडून पदनिर्देशित केलेले उप विभागिय आयुक्त तसेच तहसिलदार
यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील तसेच सदर योग्यरित्या भरलेले अर्ज व त्या
कार्यालयात भरुन देता येतील. त्याच प्रमाणे, नमुना १९ व
विहित प्रमाणपत्राचा नमुना, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर अनुक्रमे, Downloads/DownloadForms/Form-19.pdf Downloads/DownloadForms/Certificate-Form-19.pdf
येथे सुद्धा उपलब्ध आहेत. सदर नमुने संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन
घेऊन (प्रिन्ट काढून) भरुन देता येतील. (ऑन-लाईन पद्धतीने नमूना सदर करण्याची
सुविधा उपलब्ध नाही) योग्य रितीने भरलेला नमुना १९ ( FORM १९),
त्यासोबतच्या वर नमूद केलेल्या विहित, प्रमाणपत्रासह
उपरोक्त संबंधित कार्यालयात सादर करणे अपेक्षित आहे.
एकत्रित स्वरुपात अर्ज (Application in bulk) प्रत्यक्ष
किंवा टपालाद्वारे स्विकारण्यात येत नाहीत. तथापि, संस्था
प्रमुख (Head of Institution ) त्यांच्या संस्थेतील पात्र
शिक्षक / पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज एकत्रित रित्या सादर करु शकतात. राजकीय पक्ष,
मतदान केन्द्र निहाय प्रतिनिधी किंवा रहिवाशी कल्याणकारी संघटना
यांच्यामार्फत एकत्रित स्वरुपात अर्ज (Application in bulk) प्राप्त
होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही.
विधानपरिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघासाठी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठीची पात्रता तसेच कार्यपध्दती या बाबतची सविस्तर माहिती भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र.३७/एलसी/इन्स्ट/इसीआय/एफयुएनसी/इआरडी/इआर /२०१६ दि. ५ सप्टेंबर, २०१६ च्या पत्रात नमूद करण्यात आली आहे. सदर पत्र मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर Schedule for de-novo preparation of electoral rolls w.r.t. १-११-२०२३ as qualifying date in respect of Graduates' and Teachers' Constituencies of State Legislative Council” या शिर्षकाखाली उपलब्ध आहे.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS