सर्व माध्यमांच्या शाळांसाठी 'दत्तक शाळा योजना' राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण
शिक्षणासाठी निर्णय
Schools in the state can now adopt the decision for
quality education
शाळा दत्तक योजना ; राज्यातील शासकीय, तसेच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी 'दत्तक
शाळा योजना' राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात
आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या योजनेत रकमेच्या स्वरुपात देणगी देता अथवा स्वीकारता
येणार नाही. कॉर्पोरेट ऑफिसेसना सीएसआरच्या माध्यमातून अशा प्रकारची देणगी देता
येईल. पायाभूत व भौतिक सुविधा ज्यामध्ये स्थापत्य व विद्युत काम, काळानुरूप
आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, डिजीटल साधने, आरोग्य सुविधा, रेन वाटर हार्वेस्टिंग, सॅनिटरी पॅड व्हेंडीग मशिन्स यासारख्या नाविन्यपूर्ण बाबींसाठी वस्तू व
सेवांच्या स्वरुपात देणगी देता येईल. देणगीदारास पाच वर्षे अथवा दहा वर्षे
कालावधीसाठी शाळा दत्तक घ्यावी लागेल.
राज्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी
संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेस आदींच्या सहकार्यातून शाळांसाठी
पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनांची उपलब्धता वाढवून त्यायोगे गुणवत्तापूर्ण व
दर्जेदार शिक्षणाचा प्रसार करण्याचा या योजनेचा मुळ उद्देश आहे. यात समाजातील
दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट
ऑफिसेस यांना विशिष्ट शाळा दत्तक घेता येईल. या शाळेच्या गरजेनुसार त्यांना आवश्यक
वस्तू व सेवांचा पुरवठा करता येईल. त्याचप्रमाणे अतिरिक्त वर्ग खोल्यांचे बांधकाम,
इमारतींची दुरुस्ती, देखभाल व रंगरंगोटी या
मार्गाचा देखील अवलंब करण्यास मुभा असेल.
दत्तक शाळा योजने अंतर्गत सर्वसाधारण पालकत्व व नामकरण
आधारित विशिष्ट पालकत्व अशा दोन पद्धतीने देणगी देता येईल. 'अ'
व 'ब' वर्ग महानगरपालिका
क्षेत्रातील शाळांसाठी पाच वर्ष कालावधीसाठी देणगीचे मूल्य २ कोटी व १० वर्ष
कालावधीसाठी ३ कोटी रुपये इतके राहील. तर 'क' वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी हे मुल्य अनुक्रमे १ कोटी व २
कोटी रुपये तसेच, 'ड' वर्ग
महानगरपालिका, नगरपरिषदा व ग्रामीण भागातील शाळांसाठी हे
मूल्य अनुक्रमे ५० लाख व १ कोटी रुपये इतके होत असेल तर देणगीदाराच्या इच्छेनुसार
त्याने सुचविलेले नांव शाळेस त्या विशिष्ट कालावधीकरिता देता येईल.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. १कोटी व त्याहून अधिक मूल्याचे प्रस्ताव या समितीस सादर करण्यात येतील. क्षेत्रीय स्तरावर महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांकरिता अनुक्रमे आयुक्त, महानगरपालिका, संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात येतील. या समितीस १ कोटीहून कमी मूल्यांच्या प्रस्तावांची छाननी करून त्यास मान्यता देण्याचे अधिकार असतील.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS