सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचे ५१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ५ जानेवारी २०२४ ते २५ जानेवारी २०२४ (अंदाजित कालावधी ) या दरम्यान ५ दिवस काला
५१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय २०२३-२४
2023-24 at Taluka and District level in connection with
51st State Level Science Exhibition
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचे ५१ वे राज्यस्तरीय विज्ञान
प्रदर्शन दिनांक ५ जानेवारी २०२४ ते २५ जानेवारी २०२४ (अंदाजित कालावधी ) या
दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. राज्यस्तरीय प्रदर्शन
हे ऑफलाईन स्वरुपात घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. यावर्षी एन.सी.ई.आर.टी.
नवी दिल्ली च्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय
" समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान ” (SCIENCE AND TECHNOLOGY FOR SOCIETY ) असा निश्चित केला आहे. सामाजिक, पर्यावरणास अनुकूल
आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण
पाच उपविषय निर्धारित केलेले आहेत.
- १. आरोग्य (HEALTH )
- २. जिवन ( LIFE / LIFESTYLE FOR ENVIROMENT )
- ३. शेती / कृषी (AGRICULTURE)
- ४. दळणवळण आणि वाहतुक (COMMUNICATION AND TRANSPORT )
- ५. संगणकीय विचार ( COMPUTATIONAL THINKING)
उपरोक्त उपविषयापैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित उच्च
प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत ) आणि माध्यमिक व उच्च
माध्यमिकस्तरापर्यतच्या (इयत्ता ९ वी ते १२ वी) शालेय विद्यार्थ्यांकडून
प्रदर्शनीयवस्तू, प्रतिकृती, वैज्ञानिक
प्रकल्प तयार करण्याचे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना विज्ञान आणि
तंत्रज्ञान मधील नवकल्पनांचा समावेश असलेली प्रदर्शनीय वस्तू विकसित करण्याचे
स्वातंत्र्य आहे.
सहभाग : एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या
संदर्भीय दिशा निर्देशान्वाये या विज्ञान प्रदर्शनात आपल्या जिल्हयातील सर्व
व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या मान्यता प्राप्त शाळेतील पुढील दोन गटातील
विद्यार्थी
(i) उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे
विद्यार्थी)
(ii) माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९वी ते १२वीचे
विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि
शाळेतील प्रयोगशाळा परिचर / सहाय्यक यांच्या मदतीने वरील उपविषयापैकी एका
उपविषयावर आधारित प्रदर्शनीय वस्तू/ प्रतिकृती / वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे
अभिप्रेत आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना मूळ संकल्पनेवर आधारित कोणताही उपविषय
निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.
(iii) जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाल्यास
त्यांच्यामधून एका विद्यार्थ्यांची निवड करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी
पाठविण्यात यावे. या दिव्यांग विद्यार्थ्याजवळ सक्षम अधिकाऱ्यांचे अपंगत्वाबाबतचे
प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
NCERT यांचे उपरोक्त संदर्भीय दिशानिर्देशान्वये
राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरिता मूल्यमापनासाठी
(i) उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी
पर्यंत)
(ii) माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९
वी ते १२ वी)
असे दोन गट निश्चित केलेले आहेत. विज्ञान प्रदर्शनात सहभाग
घेणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी यापूर्वीच्या विज्ञान प्रदर्शनात
सहभागीझालेले वैज्ञानिक प्रकल्प/ प्रदर्शनीय वस्तूंचे पुन्हा यावर्षीच्या विज्ञान
प्रदर्शनात सादरीकरण व पुनरावृत्ती होणारनाही, तसेच INSPIRE Award
प्रदर्शनात सहभाग घेतलेले विज्ञान प्रकल्प/वैज्ञानिक प्रतिकृती
तालुकास्तरीय / जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पुन्हा मांडले जाणार नाहीत,
त्याचप्रमाणे बाजारातून रेडीमेड साहित्य विकत घेऊन विज्ञान
प्रदर्शनात सादर करण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
व्याप्ती :- या विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व
व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या मान्यता प्राप्त शाळा सहभागी होतील. मान्यता
प्राप्त शाळा म्हणजे (१) शासकीय (२) माजी शासकीय जिल्हा परिषद ( ३ ) महानगर
पालिका/ नगर पालिका/ नगर परिषदेच्या शाळा (४) खाजगी अनुदानित/ विना अनुदानित/ कायम
विना अनुदानित शासन मान्य शाळा (५) मिशनरी शाळा (६) आश्रम शाळा इत्यादी प्रकारच्या
शाळा होय. प्रत्येक शाळेतून वरीलपैकी एका गटात एका वैज्ञानिक प्रकल्पासह फक्त एकच
विद्यार्थी सहभाग घेऊ शकेल.
प्रदर्शन कालावधी :
(१) राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाची
पूर्व तयारी म्हणजे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होय. आपल्या जिल्हयात पुढील कालावधीत प्रदर्शनाचे
आयोजन करावे.
विज्ञान प्रदर्शनाचा स्तरसंभाव्य कालावधी
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनदिनांक : १५ ऑक्टोबर २०२३ ते
१० नोहेंबर २०२३
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनदिनांक : १५ नोहेंबर २०२३ ते
१४ डिसेंबर २०२३
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक (संभाव्य कालावधी): ५
जानेवारी ते२५ जानेवारी २०२४
२) राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (माध्यमिक
शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा २०२३-२४ :-
दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय
शैक्षणिक साहित्य (माध्यमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार
आहे. या स्पर्धेत फक्त माध्यमिक शिक्षक सहभागी होतील. माध्यमिक शिक्षक म्हणजे
इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक. या स्पर्धेतून जिल्हास्तरावर एका
उत्कृष्ट अशा माध्यमिक शिक्षकाच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी. सर्व
माध्यमिक,
उच्च माध्यमिक शाळांनाही याबाबत कळवावे.
३) राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (प्राथमिक
शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा २०२३-२४ :
सन २००६-०७ या वर्षापासून राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षकांनी
तयार केलेल्या (गणित व विज्ञान) शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन
करण्यात येत आहे. या चालू वर्षात राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य
(प्राथमिक शिक्षकांचे) प्रदर्शन व स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्याचे प्रस्तावित
आहे. प्राथमिक शिक्षक म्हणजे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिकविणारे शिक्षक. तरी
जिल्हयातील सर्व शाळांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कळवावे. या स्पर्धेतून
जिल्हास्तरावर एका उत्कृष्ट अशा प्राथमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याची निवड
कारण्यात यावी.
४) राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक
साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा २०२३-२४ :
सन २००६-०७ या वर्षापासून राज्यस्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक
परिचर यांनी तयार केलेल्या (गणित व विज्ञान) वैज्ञानिक उपकरण/ प्रतिकृतीचे
प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी राज्यस्तरीय प्रयोगशाळा
सहाय्यक परिचर यांचे प्रायोगिक साधनांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्याचे
प्रस्तावित आहे. जिल्हास्तरावर वरील प्रमाणे प्रदर्शन आयोजित करावे व सर्व
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांना प्रदर्शनात
सहभागी होण्याचे आवाहन करावे.
निवड प्रक्रिया :
१) विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीय वस्तू :- राज्यातील आदिवासी
भाग असलेल्या जिल्हयांनी उच्च प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून (इयत्ता ६ वी ते ८
वी पर्यंत) चार (४) माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून (इयत्ता ९ वी ते १२ वी) चार
(४) अशा एकूण आठ प्रदर्शनीय वस्तू आणि बिगर आदिवासी जिल्हयांनी उच्च प्राथमिक
स्तरापर्यंतच्या गटातून (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी) तीन (३) आणि
माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून (इयत्ता ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी) तीन (३) अशा
एकूण सहा (६) प्रदर्शनीय वस्तूंची मूल्यमापनाच्या निकषानुसार ५१ व्या राज्यस्तरीय
विज्ञान प्रदर्शनाकरीता निवड करावी.
२) जिल्हास्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता ९
वी ते १२ वी ला शिकविणारे माध्यमिक शिक्षक) प्रदर्शन :या स्पर्धेमधून एका उत्कृष्ट
शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व
स्पर्धेकरीता निवड करावी.
३) राज्यस्तरावर अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य (इयत्ता १
ते ८ ला शिकविणारे प्राथमिक शिक्षक) प्रदर्शन : या स्पर्धेतून एका उत्कृष्ट
शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय
प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड करावी.
(४) जिल्हास्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्या
वैज्ञानिक साधनाच्या प्रदर्शन व स्पर्धेमधून प्रयोगशाळासहाय्यक परिचर यांच्या एका
उत्कृष्ट वैज्ञानिक साधनांची निवड करावी. उपरोक्त १ ते ४ मुद्यात नमुद
केल्याप्रमाणे निवड यादी शिफारशीसह या संस्थेस पाठवावी.
प्रदर्शनीय वस्तूंची मांडणी: प्रदर्शनीय वस्तूंच्या
मांडणीकरीता प्रत्येक गटातील प्रदर्शनीय वस्तूसाठी साधारणपणे १२२ cm x ७६ २७४ cm एवढी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.
विज्ञान प्रदर्शन शक्यतो शाळांच्या इमारती अथवा सार्वजनिक इमारतीमध्ये भरविण्यात
यावे.
आवश्यक सूचना :
१) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई
यांनी जिल्हयातील सर्व शासन मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक
शाळांना परिपत्रक त्वरीत पाठविण्याची कार्यवाही करावी. परिपत्रक शाळांना उशिरा
मिळाल्यामुळे शिक्षकांना, विद्यार्थ्यांना विचार करण्यास फार
थोडा वेळ मिळतो. त्याकरीता शाळांना लवकरात लवकर परिपत्रक पाठवावे जेणे करून
दर्जेदार व नवनवीन प्रदर्शनीय वस्तू प्रकल्प तयार करण्यास पुरेसा वेळ मिळेल.
२) गणित, विज्ञान व पर्यावरण प्रदर्शनाबाबतची
माहिती प्रसार माध्यमांमार्फत जनसामान्यापर्यंत पोहचवावी.
३) तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन तीन (३)
दिवस कालावधीचे ( नमूद कालावधीतील) आयोजित करावे.
४) जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कालावधीत विज्ञानरंजन कार्यक्रमाचे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे.
५) प्रदर्शनाबाबतची माहिती प्रसार माध्यमाशिवाय चित्रपट गृह, व्हिडीओ
गृह, रेडिओ, टी.व्ही व सिटी केबल
द्वारे प्रसिद्धीला देण्यात यावी. प्रदर्शनाबाबतची माहिती ग्रामीण जनतेला, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना होण्यासाठी शिक्षण
परिषद, चर्चासत्रातून दवंडीद्वारे देऊन जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे. विज्ञान प्रदर्शन हे
केवळ औपचारिकता राहणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
६) प्रदर्शन वस्तूंची निवड तज्ञांमार्फत करतांना पुनरावृत्ती
(Repetitions)
होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी मागील पाच वर्षांतील निवड
झालेल्या तालुका व जिल्हास्तरावरील निवड याद्या तज्ज्ञांना पुरवाव्यात म्हणजे
पुनरावृत्ती (Repetitions) टाळता येईल. प्रदर्शनीय वस्तूंचे
मूल्यमापन निकषानुसार वस्तुनिष्ठ व्हावे. याबाबत पालक व विद्यार्थांकडून कोणतीही
तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी.
(७) सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचे बालकांकरिता राज्यस्तरीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शनी २०२३-२४ तथा ५१ वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२४ चे आयोजन होत आहे. त्या निमित्याने जनतेत जनजागृती करावी. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्थळ व संबंधित राज्याचे नाव यथावकाश कळविण्यात येईल.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS