स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना,pavitra portal,pavitra portal 2023,pav
स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त
पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना
Advertisement on Pavitra portal for filling up vacancies in local bodies
and private educational institutions
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक
२२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली
आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी
नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. या चाचणीस उपस्थित
उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रे पूर्ण
करून घेण्यात आलेली आहेत.
२. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र
उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर
आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे.
२. रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास
पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरल प्रणालीतील user id हा या पोर्टलचा देखील user id असेल. व्यवस्थापनास forgot
password यावर क्लिक केल्यानंतर option for reset password मध्ये using onetime password (otp) sent via sms खाली
व्यवस्थापनाचा सरल पोर्टल चा user id नोंद करावा व त्यानंतर
मोबाईल क्रमांक नोंद करावा व captcha टाकून proceed यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर otp येईल, आलेला otp नोंद करून verify यावर
क्लिक करावे त्यानंतर reset password मध्ये new
password/confirm new password नमूद करून captcha टाकून change password यावर क्लिक करावे त्यानंतर
नव्याने reset केलेला password टाकून
लॉगीन करता येईल.
सरल पोर्टलवर नोंद असलेला संपर्काचा मोबाईल क्रमांक विचारात
घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरल पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत
नसल्याने password reset होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने आपल्याशी
संबंधित शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात जाऊन त्यांचे लॉगीनवरून मोबाईल क्रमांक
बदल करून नव्याने password reset करता येईल.
३. व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या
व्यवस्थापनाची बिंदूनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या
सहायक आयुक्त, (मावक), मा. विभागीय आयुक्त
कार्यालय यांचेकडून अद्ययावत प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.
४. यापूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदूनामावालीनंतर SEBC चे आरक्षण, पेसा क्षेत्रातील आरक्षण यामध्ये बदल
झाल्यामुळे प्रत्येक व्यवस्थापनास बिंदूनामावली अद्ययावत करून प्रमाणित केलेली
असणे आवश्यक आहे.
५. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा
शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये सक्षम प्राधिकारी नमूद
करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदूनामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे
व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार
संबंधिताना लॉगीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
६. बिंदूनामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणे व
मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालील प्रमाणे आहेत.
अ क्र व्यवस्थापन १. २. ३. ४. ५. ६. जिल्हा परिषद
महानगरपालिका नगर पालिका / नगर परिषदा / कटक मंडळे खाजगी प्राथमिक खाजगी शाळा व
बिंदूनामावली विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरणारे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
प्रशासन अधिकारी / आयुक्त, मनपा शिक्षणाधिकारी (मनपा) प्रशासन (नप/नपा)
अध्यक्ष/सचिव संस्था माध्यमिक | अध्यक्ष/सचिव संस्था खाजगी
उच्च माध्यमिक अध्यक्ष/सचिव शाळा 1 कनिष्ठ | संस्था महाविद्यालये 9 9 तपासणारे व जाहिराती मान्यता
देणारे प्राधिकारी 9 मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी
विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी संबंधित संबंधित (प्राथमिक) (बृहन्मुबई
शिक्षणाधिकारी (मनपा)) संबंधित सबंधित करिता शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण
निरीक्षक बृहन्मुबई (प/उ/द) संबंधित संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण
निरीक्षक, बृहन्मुंबई (प/उ/द)
७. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा
असल्यास बिंदूनामावलीची माहिती माध्यमनिहाय नोंद करावी.
८. रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन २०२२-२३ च्या संच
मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी.
९. रिक्त पदापैकी एखाद्या / काही पदाबाबत मा.न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदूनामावलीतील आरक्षण व विषयाची मागणी नोंदवावी.
१०.रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग, शासन
निर्णय क्रमांक: संकीर्ण२०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१ दिनांक २१/०६/२०२३ मधील
तरतुदीनुसार रिक्त पदांच्या ८० टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी.
११. इ १ ली ते इ ५ वी /इ ६ वी ते इ ८ वी /इ ९ वी ते इ १० वी
/ इ ११ वी ते इ १२ वी या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल.
१२. अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण
विभाग,
शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९,२५/०२/२०१९,१२/०६/२०१९ व १३/१०/२०२३ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करावी.
१३. शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ मधील तरतुदीनुसार आवश्यक सुविधा दिली जाईल.
१४.इ ६ वी ते इ ८ वी या गटातील भाषा, गणित-विज्ञान,
गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या प्रमाणे
अध्यापनाच्या विषयासाठी मागणी करता येईल.
- अ) फक्त गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा.
- आ) फक्त विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा.
- इ) गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित- विज्ञान असा विषय निवडावा.
१५. इ ९ वी ते इ १० वी या गटातील भाषा विषय, गणित,
विज्ञान, गणित- विज्ञान, सामाजिक शास्त्र,इतिहास, भूगोल,
शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र या प्रमाणे
विषयासाठी मागणी करता येईल.
- अ ) फक्त गणित विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास गणित असा विषय निवडावा.
- आ) फक्त विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास विज्ञान असा विषय निवडावा.
- इ) गणित व विज्ञान हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित- विज्ञान असा विषय निवडावा.
- ई) इतिहास,भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व
विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिक शास्त्र असा विषय निवडावा.
- उ) फक्त इतिहास विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास इतिहास असा विषय निवडावा.
- ऊ) फक्त भूगोल विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास असा भूगोल विषय निवडावा.
- ऋ) शारीरिक शिक्षण या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध होत असल्यास शारीरिक शिक्षण असा विषय निवडावा.
१६. इ ११ वी ते इ १२ वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक /
कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या
पदांची मागणी नोंद करता येईल.
१७. शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ मधील तरतुदीनुसार अर्धवेळ
व दोन विषयातील कार्याभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करण्याची
सुविधा लवकरच दिली जाईल त्यानंतर अशी पदे असल्यास त्यांना नोंद करता येईल.
१८. जाहिरातीसाठी बिंदूनामावलीची माहिती भरल्यानंतर ती
तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर
विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल.
१९. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदूनामावली व विषय या दोन्ही
प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य (approve) करून घेणे आवश्यक आहे.
२०. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या
प्राधिकारी यांच्या लॉगीनवर उपलब्ध आहे.
२१. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक
०७/०२/२०१९ मधील तरतुदीनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी.
२२. जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टलवर Guidelines / Instruction या टॅब अंतर्गत Flow Mechanism / User Manual हे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
pavitra portal,pavitra portal 2023,pavitra portal registration 2023,pavitra portal registration 2022,pavitra portal registration 2023 last date,pavitra portal teacher recruitment 2023,pavitra portal teacher recruitment,pavitra portal helpline number,pavitra portal latest news,pavitra portal update
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS