⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती राष्ट्रीय शिष्यवृत्ती

अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती राष्ट्रीय शिष्यवृत्ती  Pre-Matric Scholarship National Scholarship for Disabled Students

अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती राष्ट्रीय शिष्यवृत्ती

Pre-Matric Scholarship National Scholarship for Disabled Students

भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचे पत्र जोडण्यात आले आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभाग राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे अंपग विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने इयत्ता ९वी व इयत्ता १० वी साठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती लागू केलेल्या आहे.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे विद्यार्थ्यांची नोंदणी दिनांक ०१ ऑक्टोंबर पासून सुरू झालेली आहे, इयत्ता ९वी व इयत्ता १० वी साठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती या योजनाबाबत संपूर्ण तपशील सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या संकेतस्थळावर www.depwd.gov.in व राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarship.gov.in वर उपलब्ध करण्यात आली आहे सदर पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ पर्यंत आहे.

अपंग विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती राष्ट्रीय शिष्यवृत्ती,post-matric scholarship for students with disabilities,post-matric scholarship for persons with disabilities,post-matric scholarship for persons with disabilities

सदर योजनेसाठी पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर नोंदणी करण्याकरीता सर्व नोंदणीकृत सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळेच्या नोडल अधिकारी यांनी ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणाद्वारे रितसर पडताळणी विहित कालावधीमध्ये करण्यात यावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.

पात्रतेचे निकष खालील प्रमाणे

  • १. अनुदानित शाळांतील इयत्ता ९वी व १०वी च्या दिव्यांग विद्यार्थ्यांना (CWDs) प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाते.
  • २. सदर विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा जास्त असावे. नियमानुसार सक्षम अधिका-याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र हे Rights of Persons with Disabilities Act 2016 मध्ये निकषांनुसार असावे.
  • ३. एकाच पाल्यांच्या २ पेक्षा अधिक अक्षम (दिव्यांग) पाल्यांना ही शिष्यवृत्ती लागु नाही. मात्र दुसरे अपत्य जुळे असल्यास त्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल.
  • ४. सदर शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहील. विद्यार्थ्याने तीच इयत्ता रिपीट केल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही. विद्यार्थी नियमित असावा.
  • ५. जर विद्यार्थ्याला एकापेक्षा जास्त शिष्यवृत्ती लागू होत असतील तर विद्यार्थ्याने त्याच्या सोयीनुसार लाभाची (लाभदायी) शिष्यवृत्ती स्विकारुन दुसरी शिष्यवृत्ती वरिष्ठ कार्यालयास कळवून रद्द करवून घ्यावी. मात्र विद्यार्थी निवास, निवासासाठी देय अनुदान, किंवा अशा प्रकारची राज्यशासनाची किंवा इतर स्त्रोतांकडून पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्राप्त मदत स्विकारु शकतात.
  • ६. शिष्यवृत्तीधारक जर केंद्रशासनाच्या किंवा राज्यशासनाच्या अर्थसहाय्यित परीक्षा केंद्रावर प्रशिक्षण घेत असतील तर ही शिष्यवृत्ती सदर कालावधीसाठी बंद राहील.
  • ७. पालकांचे उत्तपन्नाच्या सर्व स्वोतातून प्राप्त वार्षिक उत्पन्न रु.२,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे -

फोटो, वयाचा दाखला, पालकांच्या उत्पन्नाचा दाखला (सक्षम अधिकारी यांच्या सहीचा), मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate) (Unic Disability Identity Card), आधारकार्ड 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम