⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) - PARAKH 2023

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) - PARAKH २०२३

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) - PARAKH २०२३

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) २०२३ – PARAKH राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी शाळांमध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील खालील तक्त्यात नमूद केलेल्या माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने अंमलबजावणी करताना खालील बाबी विचारात घ्याव्यात.

जिल्हा स्तर प्रशिक्षण :

जिल्हा समन्वयक व जिल्हा सहायक समन्वयक यांनी जिल्हास्तरावर तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांचे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे व त्याचा अहवाल जिल्हा स्तरावर तयार करून ठेवावा.

सर्वेक्षणाचे वेळापत्रक :

  • १) दिनांक ०२/११/२०२३ - सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेत उपस्थित राहणे व खालील पूर्वतयारी करणे.
  • २) आवश्यकता असेल तर नमुना तुकडी व नमुना विद्यार्थी निवड करणे व त्याना ID क्रमांक देणे. ३) व विद्यार्थी बैठक व्यवस्था पडताळणी व पूर्वतयारी करणे. ( हवेशीर व विद्यार्थ्याना योग्य उंची नुसार बेंच, इतर सुविधा )
  • ४) हजेरी पत्रकातील नोंदी यांची प्रत मिळविणे. TQ प्रश्नावली साठी शिक्षक निश्चिती करणे. * दिनांक ०३/११/२०२३

खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळा स्तरावर क्षेत्रीय अन्वेषकांमार्फत कार्यवाही करावी.

राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) - PARAKH २०२३

शाळा पडताळणी:

शाळा पडताळणी संदर्भात आपणास दिलेल्या निकषानुसार बदलून आलेल्या शाळांचे पुनरावलोकन करून तात्काळ अहवाल सदर कार्यालयास सादर करावा.

शाळा भेटी:

१) मॉनिटरिंग परफॉर्मा (Monitoring Performa) हा तालुका समन्वयक यांच्याकडून भरून घ्यायचा आहे. याबाबत प्रशिक्षणामध्ये सविस्तर सूचना दिलेली आहे. सदर मॉनिटरिंग परफॉर्मा ऑनलाइन स्वरूपात आपणास पुरवण्यात आला आहे. तो तालुका समन्वयक याना पाठवण्यात यावा व त्यांच्याकडून भरून त्याचे संकलन जिल्हा स्तरावर करून घ्यावे.

२) जिल्हास्तरावरील इतर क्षेत्रीय अधिकारी यांच्या शाळाभेटीचे नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व योजना यांनी एकत्र येऊन करावे. जेणेकरून एकाच शाळेला अनेक अधिका-यांच्या भेटी होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येईल.

३) सदर शाळा भेटी करताना विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच शाळा भेटीचा अहवाल भरून त्याचे जिल्हा स्तरावर संकलन करून घ्यावे.

अधिकृत वेबसाईट - https://parakh.aicte-india.org/

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम