⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती सुरु

swiftchat app,swiftchat app download,swiftchat app download apk,swiftchat app kya hai in hindi,swiftchat app download for pc windows 10,swiftchat app download for iphone,swiftchat app kya hai,swiftchat application,swiftchat app download for pc windows 11,swiftchat app qr code

Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती
Online attendance of students on Attendance Bot (Chatbot)

शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

पायाभूत चाचणीचे गुण PAT (महाराष्ट्र) या चॅटबॉटवर गुण नोंदणी करताना येणाऱ्या काही अडचणी व त्यावरील उपाय

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे. त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ.१ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती SwiftChat या Application मधील Attendance Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि.18 जुलै २०२४  पासून सुरु करण्यात येत आहे.

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थिती मार्गदर्शक सूचना -

१. Google play store वरून Swift Chat हे Application download करावे.

२. प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार SwiftChat या Application मधील Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवावी.

३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.

४. शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना या Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.

७. काही शिक्षकांना Attendance Bot (चॅटबॉट) द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.

८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु-डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

९. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद करावी.

१०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून उपस्थिती Attendance Bot (चॅटबॉट) वर नियमितपणे कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची यांची दैनंदिन नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

११. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/AttendanceBot या लिंकवर सादर कराव्यात.

swiftchat app,swiftchat app download,swiftchat app download apk,swiftchat app kya hai in hindi,swiftchat app download for pc windows 10,swiftchat app download for iphone,swiftchat app kya hai,swiftchat application,swiftchat app download for pc windows 11,swiftchat app qr code

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम