सखी सावित्री समिती,सखी सावित्री समिती GR,सखी सावित्री समिती, सखी सावित्री समिती रचना, सखी सावित्री समिती रचना व कार्ये, Sakhai Savitri samiti शासन निर
सखी सावित्री समिती शासन निर्णय सखी सावित्री समिती रचना व
कार्ये
Sakhi Savitri Samiti Governance Decision Sakhi Savitri
Samiti Structure and Functions
सखी सावित्री समिती Sakhai Savitri samiti शासन निर्णय सखी सावित्री समिती रचना व कार्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व
निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर सखी सावित्री समिती गठन करणेबाबत सूचना देण्यात
आलेल्या आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व
निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी
सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे. शाळास्तर सखी सावित्री समिती स्थापन
करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, समितीची रचा, कार्ये
याविषयीचा नुकताच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर
माहिती आज आपण पाहणार आहोत. राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या
सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध
स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे.
शासन परिपत्रक -
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व
निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी
सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे.
शाळास्तर सखी सावित्री समिती रचना-
१. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-
अध्यक्ष
२. शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी - सदस्य
३. समुपदेशक - सदस्य
४. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी) -सदस्य
५. अंगणवाडी रोविका- सदस्य
६. पोलीस पाटील -सदस्य
७. ग्रामपंचायत सदस्य (महिला प्रतिनिधी) -सदस्य
८. पालक (महिला प्रतिनिधी) -सदस्य
९. शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थीनी व २
विद्यार्थी) -सदस्य
१०. शाळेचे मुख्याध्यापक - सदस्य सचिव
शाळास्तर सखी सावित्री समितीची कार्ये :-
१) आपल्या कार्यक्षेत्रातील १००% मुला-मुलींची (दिव्यांग
विद्यार्थी) पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी
शिक्षकांनी / बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे.
२) स्थलांतरीत पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला-मुलींना
सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे.
३) विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व
बौध्दिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला-मुलींचे व त्यांच्या पालकांचे
समुपदेशन करणे. सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे.
(४) मुला-मुलींच्या शिक्षणासाठी असणान्या शासकीय योजनांची
माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे.
५) मुला-मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे. मुलींच्या स्व-संरक्षणासाठी
स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
६) मुला मुलीसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि
निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिविर समुपदेशन
यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे.
७) आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या
पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न
करणे.
८) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे.
९) विविध कारणांमुळे मुला-मुलींचा होणारा अध्ययन हास कमी
करण्यासाठी उपाययोजना करणे.
१०) शाळेत समतामुलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व
समावेशक उपक्रम राबवणे. विद्यार्थी विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार
नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे. अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार
दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा POCSO अंतर्गत असलेल्या ई-बॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार
केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने
तयार केलेल्या CHIRAG या app ची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८)
बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे.
११) समितीच्या महिन्यातून १ वेळा (आवश्यकता भासल्यास अधिक
वेळा बैठका आयोजित कराव्यात. सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात, जेणे करून गुलामुलींचे प्रतीनिधी उपस्थित राहू शकतील.
१२) शाळास्तर समिती बैठकाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १०
तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा. केंद्रातील कोणत्याही स्तरावर
मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर
समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.
१३) सदर समित्यांचे फलक शाळेच्या/कार्यालयाच्या दर्शनी
भागावर लावावेत.
शाळास्तर सखी सावित्री समिती स्थापन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, समितीची रचा, कार्ये याविषयीचा शासन निर्णय व त्याबाबत करावयाची कार्यवाही ही माहिती पाहिली. आपणास आणखी माहिती हवी असेल तर मला खाली लिहू शकता.
सखी सावित्री समिती,सखी सावित्री समिती GR,सखी सावित्री समिती, सखी सावित्री समिती रचना, सखी सावित्री समिती रचना व कार्ये, Sakhai Savitri samiti शासन निर्णय
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS