worldskills competition 2024,worldskills international competition 2024
जागतिक कौशल्य
स्पर्धा – २०२४ | World Skills Competition – 2024
जागतिक कौशल्य स्पर्धा (World Skills Competition – 2024) ही जगातील सर्वात मोठी
व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी आयोजित
होणारी ही स्पर्धा ‘जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024’ (World Skills Competition –
2024) यावेळी फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित करण्यात आली आहे. या
स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य
आणि देशपातळीवर करण्यात येणार असून स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील
जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
23 वर्षांखालील
तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ऑलिम्पिक खेळासारखीच ही स्पर्धा
आहे. (World Skills Competition – 2024) या स्पर्धा
पुढील अभ्यासक्रमाकरिता / क्षेत्राकरिता आयोजित केली जाणार आहे :
थ्री डी डीजिटल गेम
आर्ट, ॲटो
बॉडी रिपेअर, ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी,
ब्युटी थेरपी, ब्रिकलायींग, कॅबिनेट मेकिंग, कार पेंटींग, कार्पेंन्ट्री,
सीएनसी मिलींग, सीएनसी टर्निंग, कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन वर्क, कूकिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॅड (CAD), मोबाईल ॲप्लिकेशन
डेव्हलपमेंट, मोबाईल रोबोटिक्स, पेंटिंग
ॲन्ड डेकोरेटिंग, पेस्ट्रिज ॲन्ड कन्फेक्शनरी, प्लास्टरिंग ॲन्ड ड्रायवॉल सिस्टिम, प्लंबिंग ॲन्ड
हिटिंग, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप
मॉडेलिंग, रिफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंन्डिशनिग, रिनिव्हिबल एनर्जी.
World Skills Competition – 2024 स्पर्धेसाठीचे पात्रता निकष
(World Skills Competition – 2024) जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024 करिता वयोमर्यादा
हा एकमेव निकष ठवण्यात आला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी उमेदवारांचा जन्म दि. 1
जानेवारी 2002 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य
आहे. तसेच ॲडिटीव्ह मॅनिफॅक्च्युरिंग, क्लाऊड कंम्प्युटिंग,
सायबर सेक्युरिटी, डिजिटल कंन्स्ट्रक्शन,
इंडस्ट्रिअल डिजाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0,
इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, मेकाट्रॉनिक्स,
रोबोट सिस्टीम इन्टीग्रेशन ॲन्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा
जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा
तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.
फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक
कौशल्य स्पर्धा 2024 करिता इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक
आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई
शहर, 175 श्रेयस चेंबर, 1 ला मजला,
डॉ. डी.एन.रोड, फोर्ट मुंबई 400001 येथे प्रत्यक्ष अथवा (022) 22626303 या दूरध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा.
worldskills competition 2024,worldskills international competition 2024
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS