Study process management and continuous comprehensive assessment training,STARS प्रकल्प सन २०२३ - २४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षण
समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन
प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक
स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या
शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या
सर्व शिक्षकांना द्यायचे आहे. त्यानुषंगाने विभागस्तर प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर
ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५
दिवस होता त्यामध्ये ४ दिवस अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व १ दिवस सातत्यपूर्ण
सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी
विभागीय डायट प्राचार्य यांची होती.
उपरोक्तनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व
शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असून आयोजनाची जबाबदारी
संबंधित डायट प्राचार्य यांची राहील. सदर प्रशिक्षणाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.
- १. पहिला टप्पा दि. १६ ते २० जानेवारी २०२४
- 2. दुसरा टप्पा दि. 30 जानेवारी 2024 ते ०3 फेब्रुवारी २०२४
____________
STARS प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा, आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील इयत्ता १ ते ८ च्या सर्व शिक्षकांना द्यायचे आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ०५ दिवस असून विभागस्तर प्रशिक्षण दि. २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ या कालावधीत सुरु आहे. सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा डायट प्राचार्य यांची राहील.
विभागस्तर प्रशिक्षणानंतर तालुकास्तर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे एकूण ०५ दिवसांचे असेल. सदर प्रशिक्षणामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जि.प., म.न.पा./न.पा./न.प.),आदिवासी विभागाच्या शाळा, सामाजिक न्याय विभागाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांचा समावेश असेल.
इयत्ता १ ली ते ५ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
- १. पहिला टप्पा दि. १२ ते १६ डिसेंबर २०२३
- २. दुसरा टप्पा दि. दि. १९ ते २३ डिसेंबर २०२३
- ३. तिसरा टप्पा दि. २६ ते ३० डिसेंबर २०२३
इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणा-या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
- १. पहिला टप्पा दि. ०२ ते ०६ जानेवारी २०२४
- २. दुसरा टप्पा दि.०९ ते १३ जानेवारी २०२४
सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रती व्यक्ती ( प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ ) प्रती दिन रक्कम रु. १५०/- प्रमाणे निधीच्या मर्यादेत खर्च करावा.
खर्चाच्या बाबी व निकष खालील प्रमाणे
- १. मानधन - रु.४०० प्रती दिन (फक्त तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी)
- २. प्रशिक्षण वर्ग / Hall
- ३. इंटरनेट सुविधा
- ४. भोजन व्यवस्था व दोन चहा (Working Lunch)
- ५. स्टेशनरी व किरकोळ खर्च
- ६. तज्ज्ञ मार्गदर्शक TA एकदा (एकदा जाणे व येणे )
टीप - एकूण ५ दिवसांच्या खर्चापैकी १ दिवसाचा भोजन व मानधन खर्च सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाच्या निधीमधून करावा. उर्वरित सर्व खर्च अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणासाठी प्राप्त निधीमधून करावा.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS