Answers to frequently asked questions about Attendance Bot,Attendance Bot बाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या समस्यांची उत्तरे
Attendance Bot बाबत वारंवार विचारल्या
जाणाऱ्या समस्यांची उत्तरे
Answers to frequently asked questions about Attendance Bot
सर्व शिक्षकांनी आपल्या विषयाचे गुण CHATBOT वर भरलेले असतीलच परंतु काही सहकार्यांना अजून विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत त्याचे काही अडचणीचे उपाय खाली देण्यात आलेले आहे,तरी त्या बघून घेणून तुमचे निरसन होईल हि अपेक्षा.आपल्या सहकाऱ्याला हि पोस्ट नक्की शेअर करावी.- [accordion]
- समस्या १. :- Invalid U-DISE कोड
- शाळेतील रेकॉर्डस, शाळा मान्यता प्रपत्र व UDISE
प्रपत्र यावर UDISE कोडची पडताळणी करावी. तालुका
समग्र शिक्षा डेटा ऑपरेटरशी संपर्क करुन UDISE कोड ची
पडताळणी करावी.
- समस्या २ :- Invalid मोबाईल क्रमांक
- सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर मुख्याध्यापक / DDO-1 यांनी शालार्थ पोर्टलवर अपडेट करावा व गटशिक्षण अधिकारी / DDO-2 यांनी approval दिल्यानंतर किमान ८ दिवस प्रतीक्षा
करा. हाच मोबाईल नंबर UDISE पोर्टल व सरल प्रणाली वर सुद्धा
नोंदविण्यात यावा.
- समस्या ३ :- Invalid शालार्थ /शिक्षक
आय.डी.
- मुख्याध्यापक / DDO-1 यांच्याकडून शालार्थ
पोर्टलवरून शिक्षक आय. डी. प्राप्त करून घ्यावा. तसेच, शालार्थ
आय. डी. व UDISE कोड विसंगत असल्यास अपडेट करावा.
- समस्या ४ :- उपस्थिती चिन्हांकित होत नाही.
- आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल.
- समस्या ५ :- पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.
- वेतन प्रणाली, शालार्थ पोर्टल व UDISE
वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी. अन्यथा
जुन्या शाळेच्या पोर्टल वर नावे दिसत राहतील. सेवानिवृत्त शिक्षकांची वेतन प्रणाली मधून DELETE करावी.
- समस्या ६ :- मदरसा मध्ये जाणारे विद्यार्थी
- शालार्थ वेतन प्रणालीतून वेतन मिळत असल्यास सदर मदराश्यातील विद्यार्थ्यांची माहिती भरता येते.
- समस्या ७ :- मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहे.
- विद्यार्थ्यांचे सरल पोर्टल वर पुढील वर्गात प्रमोशन करावे व यादी अपडेट करावी.
- समस्या ८ :- शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी
- सदर विद्यार्थ्यांची सरल पोर्टल वर New Tab घेऊन इयत्तनिहाय नोंद करावी. New Tab करता तालुका
समग्र शिक्षा ऑपरेटरशी संपर्क करावा.
- समस्या ९ :- सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत
- वेतन प्रणाली / शालार्थ पोर्टल व UDISE वर शिक्षकांच्या बदलीची नोंद घेऊन यादी अद्ययावत करावी.
- समस्या १० :- सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत
- आपल्या वर्गातील मुलांची नावे सरल व UDISE पोर्टल वर अद्ययावत करावी. त्यानंतर यादी उपलब्ध होईल.
- समस्या ११ :- शून्य शिक्षक असलेली शाळा
- सध्या माहिती भरू नये. अधिकृत शिक्षक नेमणुकीनंतर माहिती भरावी.
अधिक माहितीसाठी आमच्यासोबत जॉईन रहा.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS