राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे आयोजन | 22 डिसेंबर,राष्ट्रीय गणित दिन,राष्ट्रीय गणित दिन मराठी,राष्ट्रीय गणित दिन मराठी,mathematics day,mathe
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त "गणितोत्सवाचे आयोजन | Organized
"Ganitotsav" on the occasion of National Mathematics Day
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० मध्ये गणित विषयाचे
महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. शालेय स्तरापासूनच गणित विषयाची गोडी
लागावी यासाठी विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे. गणित विषयाचे पूर्व प्राथमिक
स्तरापासून कृती आधारित व आनंदायी पद्धतीने अध्यापन व्हावे यासाठी या स्तरापासूनच
खेळ आधारित अध्यापन शास्त्र, गणितीय खेळ, कोडी,
परिसरातील गणित यांचा समावेश दैनंदिन गणित अध्ययन-अध्यापन
प्रक्रियेत करावा याविषयी धोरणामध्ये सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय गणित दिवस | National Mathematics Day
तसेच,गणित विषयाची ध्येये ज्यामध्ये पायाभूत
स्तरावर प्रारंभिक संख्याज्ञान संपादन ते परिसरातील अनुभवांशी गणिताची जोड,
व्यवहारात सहजतेने वापर ते उच्च विचार प्रक्रियांचे विकसन , गणितीय तर्क करणे, गणितीय मर्मदृष्टी ( MathematicalIntuition ) ते विचारांचे गणितीकरण यांचा समावेश आहे.
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी
प्रत्येक वर्षी २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो. राष्ट्रीयगणित दिनानिमित्त "गणितोत्सव-२०२३” चे आयोजन दिनांक २२
डिसेंबर २०२२ रोजी आयोजन राज्यातील पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील
सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये व अंगणवाडीमध्ये करण्यात
यावे. यावर्षीच्या “गणितोत्सव”ची
प्रमुख संकल्पना (Theme) “प्रत्येकासाठी गणित ”
(Mathematics For Every One) ही निश्चित करण्यात येत आहे.
सदर संकल्पनेवर आधारित “गणित्तोत्सव-२०२३” मध्ये खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.सदर नियोजन करत
असताना विद्यार्थी, शाळा, शिक्षक,
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच पालक यांचा सक्रीय व उत्स्फूर्त
सहभाग घेण्यात यावा.
सर्व उपक्रमामध्ये आपण सर्व क्षेत्रीय अधिकारी, शाळा
व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, गणित
प्रेमी यांनी प्रदर्शनास भेटी द्याव्यात. उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी आणि
शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा /कार्यक्रमाचा २ ते ३
मिनिटाचा व्हिडीओ व फोटो, समाज संपर्क माध्यमांवर (उदा.
इंस्टाग्राम, फेसबुक व इतर) #Nationaleducationnpolicy२०२०,#Mathematicsday२०२३, #Ganitotsav२०२३, #Mathematicsforeveryone, #SCERTMAHARASHTRA या
HASHTAG (#) चा वापर करून आपल्या व्हिडीओ, फोटो व इतर साहित्याची पोस्ट अपलोड करण्यात यावी व प्रस्तुत कार्यालयाचे
अधिकृत फेसबुक पेज SCERT, MAHARASHTRA ला टॅग करावे.
Tag- राष्ट्रीय गणित दिन,राष्ट्रीय गणित दिन मराठी,राष्ट्रीय गणित दिन मराठी,mathematics day,mathematics day 2023,mathematics day in india,mathematics day speech,mathematics day drawing,mathematics day poster,mathematics day activities,mathematics day 2023 in india,mathematics day celebration,mathematics day date
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS