शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे शेती: वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
शेती: वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
Agriculture: How to register heirs? How to apply online
for their registration?
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास
त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद
करणं आवश्यक असतं.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3
महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात
जायची गरज नाही.
तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून
घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता.
ई-हक्क प्रणाली
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं शेतकऱ्यांना ऑनलाईन
सुविधा पुरवण्याच्या हेतून ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे. "ई-हक्क
प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या ७ ते ८ प्रकारचे फेरफार अर्ज करू शकतात.
यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त
करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे
इत्यादी सेवांसाठी अर्ज करता येतो. तसंच अर्जाचं स्टेटसही चेक करता येतं."
जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- ·
bhulekh.mahabhumi.gov.in हे संकेतस्थळ
उघडायचे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन
होईल.
- ·
या पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना
दिसेल - ७/१२ दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली, अशी ही सूचना असून
त्याखाली एक लिंक दिलेली आहे.
- ·
https://pdeigr.maharashtra.gov.in या लिंकवर
तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- ·
त्यानंतर तुमच्यासमोर 'पब्लिक
डेटा एन्ट्री' नावानं एक पेज ओपन होईल.
- ·
यावरील Proceed to login/ या
पर्यायावर क्लिक केलं की तिथं तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करायचं आहे.
त्यासाठी 'Create new user' यावर क्लिक करायचं आहे.
- ·
मग 'New User Sign Up' नावाचं
नवीन पेज उपडेल,
- ·
इथं तुम्हाला सुरुवातीला तुमचं पहिलं नाव, मधलं
नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check availability या पर्यायावर क्लिक करायचं
आहे. त्यानंतर पासवर्ड टाकून तो परत एकदा टाकायचा आहे. मग Security
Questions मध्ये एक प्रश्न निवडून त्याचं उत्तर द्यायचं आहे.
- ·
ही माहिती भरून झाली की पुढे मोबाईल नंबर, ईमेल
आयडी, पॅन कार्ड नंबर आणि पिन कोड टाकायचा आहे. पिन कोड
टाकला की देश, राज्य आणि जिल्ह्याचं नाव तिथं आपोआप येईल.
त्यानंतर Select Cityमध्ये तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे.
- ·
त्यानंतर Address Details मध्ये
घर क्रमांक आणि गल्लीचं नाव किंवा घरावर काही नाव असेल तर ते टाकू शकता.
- ·
सगळ्यात शेवटी कॅप्चा टाकायचा आहे. इथं
असणारे आकडे किंवा अक्षरं जशीच्या तशी पुढच्या कप्प्यात लिहायची आहे, आणि
मग सेव्ह बटन दाबायचं आहे.
- ·
त्यानंतर या पेजवर खाली 'Registration
Successful. Please Remember Username & Password for Future Transaction.' असा लाल अक्षरातला मेसेज तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला 'Back'
या पर्यायावर क्लिक करून पुन्हा एकदा लॉग-इन करायचं आहे. आता आपण
नोंदणी करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे आणि
लॉग-इन म्हणायचं आहे.
- ·
त्यानंतर 'Details' नावाचं एक
पेज तुमच्यासमोर उघडेल. इथं Registration, Marriage, efiling. 7/12
mutations असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील. याचा अर्थ इथं
तुम्हाला या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- ·
यातल्या '7/12 mutations' वर
क्लिक करायचं आहे.
- ·
त्यानंतर तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा
आहे. सामान्य नागरिक असाल तर 'User is Citizen' आणि बँकेचे कर्मचारी
असाल तर 'User is Bank' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- ·
एकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर 'Process ' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- ·
त्यानंतर तुमच्यासमोर 'फेरफार
अर्ज प्रणाली ई-हक्क' नावाचे पेज ओपन होईल.
- ·
इथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे.
जिल्हा,
तालुका आणि गाव निवडायचं आहे.
- ·
त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, "तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार
निवडा," असा मेसेज तुम्हाला दिसेल.
- ·
आता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे
आपण "वारस नोंद' हा पर्याय निवडला आहे.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS