दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चे प्रवेशपत्र उपलब्ध | 10th Board Exam Admit Card March 2024 Available
दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2024 चे प्रवेशपत्र उपलब्ध | 10th Board Exam Admit Card March 2024 Available
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते
की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षा मार्च
२०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall
Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सर्व माध्यमिक शाळांना मार्च २०२४ च्या माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket ) ऑनलाईन
(Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दि. ३१ जानेवारी, २०२४ पासून
school login मध्ये download करण्याकरिता
उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी
विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध
करून घेण्याच्या अनुषंगाने सूचना
- १. मार्च २०२४ मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्याथ्यांना द्यावयाची आहेत.
- २. प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना (Open)
काही त्रुटी (Error) आल्यास सदर प्रवेशपत्र Google
Chrome मध्ये उपडावे.
- ३. प्रवेशपत्र (Hall Ticket ) ऑनलाईन (Online)
पध्दतीने प्रिंट करून देताना विद्याथ्र्यांकडून त्यासाठी कोणतेही
वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा
शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
- ४. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket ) विषय व माध्यम
बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून
घ्यावयाच्या आहेत.
- ५. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
- ६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
- ७. प्रवेशपत्र विद्याथ्र्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित
माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विसायांस प्रनेन खावयाचे आहे.
- तरी मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS