⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२३ निकाल | Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2023 Result

intermediate drawing grade exam 2023 result,elementary drawing grade exam 2023 result,elementary drawing grade examination results 2023,elementary drawing grade examination results 2023

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२३ निकाल | Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2023 Result

कला संचालनालयामार्फत शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास शासन मान्यता देण्यात आली असून सदर अभ्यासक्रमानुसार २०१५ पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षांचे आयोजन करण्यात येते. सदर परीक्षा ऐच्छिक असून विद्यार्थ्यांना एकावर्षी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड या दोहोंपैकी फक्त एकाच परीक्षेला बसता येते.

शालेय स्तरावरील इयत्ता ७ वी ते १२ वी पर्यंतचे नियमित विद्यार्थी सबंधित विद्यालयामार्फत परीक्षा केंद्रावर सदर परीक्षेस प्रविष्ठ होतात. जे विद्यार्थी शालेय स्तरावर सदर परीक्षेस प्रविष्ठ झाले नाहीत असे उमेदवार बहिस्थ विद्यार्थी म्हणून शासकीय रेखाकला परीक्षेस प्रविष्ठ होतात. चालू शैक्षणिक वर्षात शासकीय रेखाकला परीक्षा २०२३ करीता सुमारे एकूण ८.४० लाख विद्यार्थीची नावनोंद करण्यात आली आहेत.

शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२३ निकाल जाहीर

कला संचालनालयाच्या दिनांक १२,०७,२०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक ०४ ऑक्टोबर, २०२३ ते ०७ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीमध्ये शासकीय रेखाकला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी www.doa.maharashtra.gov.in आणि https://dge.doamh.inया संकेतस्थळावर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करणे / निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.

निकाल दिनांक

  • इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा - दि.३१.०१.२०२४ दुपारी १२.००
  • एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा - दि.०५.०२.२०२४ दुपारी १२.००
    • सहभागी शाळेंना लॉगइनवरून ३ वेळा डाऊनलोड करता येईल.
    • केंद्रांना ३ वेळा डाऊनलोड करता येईल.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२३ निकाल | Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2023 Result


आपल्या केंद्रावरील सहभागी शाळांचे तसेच खाजगी परीक्षार्थ्यांचे निकाल दिनांक ३१.०१.२०२४ व दिनांक ०५.०२.२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे तसेच प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळणार असल्याबाबतची माहिती सहभागी शाळांना / सर्व संबंधितांना कळविण्यात यावे.

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२३ निकाल लिंक 

शासकीय रेखाकला परीक्षा २०२२ किंवा तत्पूर्वी ELEMENTARY DRAWING GRADE परीक्षा उत्तीर्ण झालेले व शासकीय रेखाकला परीक्षा (INTERMEDIATE DRAWING GRADE) २०२३ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थांना शासन निर्णयानुसार सवलतीच्या गुणांचा लाभ मिळण्याकरीता राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाकडून प्रस्ताव स्विकृती करिता सर्व संबंधित शाळांना मुदतवाढ देण्याबाबत राज्यातील सर्व विभागीय मंडळांना कळविण्यात आलेले आहे.

intermediate drawing grade exam 2023 result,elementary drawing grade exam 2023 result,elementary drawing grade examination results 2023,elementary drawing grade examination results 2023

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम