⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

10 वी व 12 वी बोर्ड परिक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विर्द्यार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव | क्रीडा सवलत गुण अर्ज नमुना PDF

१० वी व १२ वी बोर्ड परिक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विर्द्यार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव | Sports Concession Offered to Athlete Candidates Appearing in 10th & 12th Board Exams

१० वी व १२ वी बोर्ड परिक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विर्द्यार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव | Sports Concession Offered to Athlete Candidates Appearing in 10th & 12th Board Exams

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतलेला आहे.

शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत गुण प्रस्ताव सादर करणेबाबत मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे

10 वी व 12 वी बोर्ड परिक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विर्द्यार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव | क्रीडा सवलत गुण अर्ज नमुना PDF

  • ·        माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इयत्ता. १० वी) परिक्षेस प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ.६ वी पासून १० वी पर्यंत केव्हांही क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य मिळविले असल्यास क्रीडा सवलत गुण देण्यात येतील तथापी त्या विद्यार्थ्याने इ. १० वी मध्ये क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक राहील व सहभागाचा पुरावा (ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रत मुख्याध्यापक स्वाक्षरीनिशी जोडणे आवश्यक राहील)
  • ·        उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इ.१२ वी) मध्ये प्रविष्ट खेळाडू विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्ता ६ वी पासून १२ वी पर्यंत केव्हांही क्रीडा स्पर्धेतील जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. परंतु सदर खेळाडूंस इ. १० वी मध्ये सदर प्रमाणपत्रावर क्रीडा सवलत गुण घेतले असल्यास यावर्षी तो क्रीडा सवलत गुण घेण्यास पात्र असणार नाही. तथापी या खेळाडूंने इ.११ वी १२ वी मध्ये प्राविण्य / सहभाग घेतला असेल तर तो क्रीडा सवलत गुण देण्यास पात्र राहील.
  • ·        भारतीय शालेय खेळ महासंघ व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे आयोजित जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
  • ·        खेळाडू कोणत्याही जिल्ह्यातून खेळला तरी, खेळाडू विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे शिफारशीसह प्रस्ताव सादर करावा.
  • ·        क्रीडा संचालनालयाने मान्यता दिलेल्या खेळप्रकारातील एकविध खेळ संघटनानी आयोजित केलेल्या राज्यस्तर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरिल सहभाग व प्राविण्य खेळाडूच क्रीडा सवलत गुणास पात्र राहतील.

सन २०२३-२४ या वर्षातील आवश्यक सर्व कागदपत्रे व स्पर्धा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावीत जेणेकरुन खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करता येतील. कागदपत्रे प्राप्त न झाल्यास सदर खेळाडूंचे प्रस्ताव शिफारस करता येणार नाहीत त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांच्या होणाया नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहाणार नाही.

  • ·        इयत्ता १० वी १२ वी मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांने एकापेक्षा जास्त स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले असेल तर सदर खेळाडूचे सर्वोच्च कामगीरी असलेल्या एकाच पात्र खेळाचे प्रमाणपत्र प्रस्तावासोबत जोडावे.
  • ·     प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही संबधीत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाची राहील. शाळा कर्मचारी /शिक्षक यांचेमार्फत प्रस्ताव सादर करावेत . पालकांसोबत प्रस्ताव पाठवू नये. संबधीत प्रस्तावात त्रुटीमुळे विद्यार्थ्यास क्रीडा सवलत गुण न मिळाल्यास संबधीत शाळा/क.महाविद्यालय जबाबदार राहील.

क्रीडा सवलत गुण अर्ज नमुना

10 वी व 12 वी बोर्ड परिक्षेमध्ये प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विर्द्यार्थ्यांना क्रीडा सवलत प्रस्ताव | क्रीडा सवलत गुण अर्ज नमुना PDF

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम