पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाही,शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता
पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाही
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ मुलाखतीशिवाय
पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये 'पवित्र प्रणाली अंतर्गत
शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील
आवश्यक कार्यवाहीसाठी परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी/व्यवस्थापनासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना
उमेदवाराने स्वप्रमाणपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे
त्यांना मुलाखत / प्रमाणपत्र पडताळणीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येत आहे.
मुलाखत / निवडीच्या अगोदर कोणत्याही टप्प्यावर स्वप्रमाणपत्रात दिलेली माहिती मूळ
कागदपत्रांच्या/प्रमाणपत्रांच्या आधारे तपासण्यात येईल व त्याच्या आधारे पात्र
आढळून आल्यानंतरच उमेदवारास पढील संधी देण्यात येईल.
या संदर्भात आपणांस खालील प्रमाणे सूचित करण्यात येत आहे.
३. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या /खाजगी
व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित
तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, रात्र शाळा
यामधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी
देण्यात आली आहे. तसेच ‘शिक्षण सेवक’ पदासाठी
उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्यादृष्टीने 'अभियोग्यता
व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२' यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे
पवित्र पोर्टलवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
४. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ मध्ये प्रविष्ट
उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक
माहिती स्वप्रमाणित करण्याची, तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली
होती. असे असले तरी राज्यस्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी
करण्यात आलेली नाही.
'शिक्षण सेवक' पदभरतीसाठी दिनांक
१६/१०/२०२३ ते २२/०१/२०२४ या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत सक्षम
प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या बिंदुनामावलीची व विषयनिहाय रिक्त पदांच्या
माहितीची नोंद पवित्र पोर्टलवरील जाहिरातीत करण्यात आलेली आहे. बिंदुनामावली,
गट व विषयनिहाय रिक्त पदांच्या जाहिरातीची माहिती पोर्टलवर एकत्रित
स्वरूपात 'डाऊनलोड' या मेनुअंतर्गत
उपलब्ध आहे, तसेच व्यवस्थापनांनी वर्तमानपत्रामध्ये
जाहिरातदेखील दिलेली आहे. सदर जाहिरातीस अनुसरून उमेदवारांनी स्वप्रमाणित केलेल्या
माहितीच्या आधारे पात्र उमेदवारांना विविध व्यवस्थापनांमधील रिक्त पदांकरिता
त्यांच्या पात्रतेनुसार 'मुलाखतीशिवाय' व 'मुलाखतीसह' या दोन
प्रकारांमध्ये स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
६. खाजगी व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर शिक्षक पदभरतीसाठी 'मुलाखतीशिवाय'
पदभरती हा पर्याय निवडलेला आहे.
७. उमेदवाराची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करताना
उमेदवारास 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी२०२२' मध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदुनामावलीनुसार आरक्षण,
जाहिरातीनुसार अध्यापनाचा विषय तसेच उमेदवाराने स्वप्रमाणपत्रामध्ये
नमूद केलेली माहिती या सर्व बाबी एकत्रित विचारात घेण्यात आलेल्या आहेत.
८. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण
गुणवत्ता यादी (General Merit List) संस्थेच्या लॉगीनवर
उपलब्ध करून देण्यात येत आहे.
९. उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी
त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदाकरिता उमेदवारांची पात्रता तपासून
पात्र असल्यासच त्याच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे.
त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे
पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
१०. याबाबत स्पष्ट करण्यात येते की, उमेदवारांची
निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या
आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची
व आवश्यक पात्रतेसाठीच्या कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.
११. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व
त्याअनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे /प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राशी विसंगत
आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही, याची
कटाक्षाने नोंद घ्यावी.
१२. समांतर आरक्षणाचा ( महिला आरक्षण वगळून) दावा केलेल्या
उमेदवारांबाबतीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती आदेश
निर्गमित करण्यापूर्वी त्यांच्या केलेल्या दाव्याच्या मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी
सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात यावी. पडताळणीनंतर अशा उमेदवारांना नियुक्ती आदेश
देण्याबाबतची कार्यवाही करावी.
१३. उमेदवांराच्या मूळ कागदपत्रांबाबत शंका / संशय असल्यास
त्या बाबतचीदेखील खातरजमा संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी तात्काळ करावी.
१४. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैरप्रकार प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ५६/२०२१ व
५८/२०२१ अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान निष्पन्न
झालेल्या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवाराची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषद, पुणे यांनी दिनांक ३/०८/२०२२ व दिनांक १४/१०/२०२२
रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. सदर यादी पवित्र पोर्टलवर देखील
उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर यादीतील उमेदवारांची पवित्र पोर्टलमार्फत
निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, अशा उमेदवारांची
शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र. संकिर्ण-२०२४/प्रक्र०३/टीएनटी- १ दिनांक
१२/०१/२०२४ अन्वये चारित्र्य पडताळणी केल्याशिवाय नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही
करू येऊ नये.
१५. उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ अन्वये
जिल्हा परिषदेमध्ये 'शिक्षण सेवक' पदावर
नव्याने नियुक्ती झालेल्या उमेदवारांस जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, असे नियुक्ती आदेशामध्ये नमूद करावे.
१६. उपरोक्त शिवाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
करताना प्रामुख्याने खालील बाबी पाहाव्यात.
- १६.१ उमेदवाराने १२/०२/२०२३ या दिनांकापर्यंत प्राप्त केलेली
शैक्षणिक,
व्यावसायिक अर्हता विचारात घ्यावी. दिनांक १२/२/२०२३ नंतर प्राप्त
केलली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पात्रतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही, याची नोंद घ्यावी.
- १६.२ शासन पत्र संकिर्ण-२०२२-प्र.क्र.७०/टीएनटी- १ दिनांक ६
/ २ / २०२३ अन्वये सीटीइटी - डिसेंबर, २०२२ ही परीक्षा दिलेल्या
उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधिन राहून शिक्षक अभियोग्यता व
बुद्धिमत्ता चाचणी -२०२२ या चाचणीसाठी प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली होती.
यास्तव 'केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) पेपर-१ व
पेपर-२' नमूद केलेल्या उमेदवारांची डिसेंबर, २०२२ मधील पात्रता विचारात घेण्यात यावी. याबाबत मा. उच्च न्यायालय खंडपीठ
औरंगाबाद येथील याचिका क्रमांक ८५३४ / २०२३ व इतर याचिकांमधील दिनांक १४/०९/२०२३
च्या आदेशामधील परिच्छेद क्र. १९ नुसार डिसेंबर २०२२ मध्ये सीटीईटी परीक्षा
दिलेल्या उमेदवारांना या परीक्षेच्या निकालाच्या अधिन राहून शिक्षक अभियोग्यता व
बुद्धिमत्ता चाचणी २०२२ करिता प्रविष्ट होण्याची संधी देण्यात आली आहे.
- १६.३ उमेदवाराचे वय :- शिक्षक या रिक्त पदांच्या जाहिराती
पवित्र पोर्टलवर दिनांक १६/१०/२०२३ पासून प्रकाशित झाल्या आहेत. म्हणजेच पवित्र
पोर्टलवर जाहिराती सुरू झाल्याचा दिनांक १६/१०/२०२३ उमेदवाराचे वय गणन करण्यासाठी
विचारात घेण्यात आलेला आहे. सामान्य प्रशासन विभागचा शासन निर्णय क्र
सनिव-२०२३/प्रक्र १४/कार्या-१२ दि.०३/०३/२०२३ अन्वये कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर
नियमित वयाच्या तरतुदीमध्ये २ वर्षांची सूट (खुला प्रवर्ग-४० वर्ष, मागासप्रवर्ग
- ४५ वर्ष) देण्यात आलेली आहे. सदरची तरतूद सर्व स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व
गट (इ.१ ली ते १२ वी) व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक गटातील इ. १ ली ते ८ वी
करिता विचारात घेण्यात आलेली आहे. (सुलभ संदर्भासाठी वयाच्या सवलतीबाबतचा तक्ता
जोडला आहे)
- १६.४ खाजगी व्यवस्थापनांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसाठी (इ. ९ वी ते इ १२ वी) खाजगी शाळांच्या सेवा शर्ती नियमानुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
- १६.५ जन्मतारखेसाठी शालान्त प्रमाणपत्र परीक्षा / शाळा सोडल्याचा दाखला विचारात घेण्यात यावा.
- १६.६ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या संदर्भात शासन निर्णय
दिनांक ०७/०२/२०१९ मधील तरतुदी व शासन शुद्धिपत्रक दिनांक २५/२/२०१९, १६/०५/२०१९
व १२/०६/२०१९ सुधारणेसह मधील इ. १ ली ते इ ५ वीसाठी परिशिष्ट-अ, इ.६ वी ते इ ८ वीसाठी परिशिष्ट-ब, इ. ९ वी ते इ १०
वीसाठी परिशिष्ट-क, इ. ११ वी ते इ १२ वीसाठी परिशिष्ट-ड
विचारात घेण्यात यावे. (सोबत प्रपत्र जोडले आहे.)
- १६.७. इ. १ ली ते इ ५ वी या गटासाठी उमेदवार टीईटी/सीटीईटी पेपर-१ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- १६.८ इ. ६ वी ते इ ८ वी या गटातील गणित, विज्ञान
व गणित-विज्ञान या विषयांच्या पदासाठी टीईटी/सीटीईटी पेपर-२ गणित-विज्ञान विषय
घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- १६.९ इ. ६ वी ते इ ८ वी या गटातील इतिहास, भूगोल
व सामाजिकशास्त्र या विषयांच्या पदांसाठी टीईटी/सीटीईटी पेपर-२ सामाजिकशास्त्र
विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- १६.१० इ. ६ वी ते इ ८ वी या गटातील भाषा ( मराठी, हिंदी,
इंग्रजी, उर्दू, कन्नड
इत्यादी) या विषयांच्या पदासाठी टीईटी/सीटीईटी पेपर-२ गणित-विज्ञान अथवा
सामाजिकशास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- १६.११ खाजगी व्यवस्थापनातील इ. ९ वी ते इ १० वी साठी किमान उत्तीर्ण श्रेणीमध्ये व इ. ११ वी ते इ १२ वी साठी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असेणे आवश्यक आहे. (सुलभ संदर्भासाठी उत्तीर्णतेच्या सवलतीबाबतचा तक्ता जोडला आहे)
१७. उमेदवाराने स्वप्रमाणित केलेली माहिती तपासण्यासाठी
खालील प्रमाणे कागदपत्रांची पडताळणी करावी.
- १७.१ उमेदवाराने 'पवित्र पोर्टलवर' नोंद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत.
- १७.२ शालान्त परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र ( जन्म तारखेसाठी )
- १७.३ उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (इ. १ली ते इ ५ वी गटातील पदांसाठी )
- १७.४ डी.एड./ डी.एल.एड. / डी. टी. एड / टीसीएच, बेळगाव
गुणपत्रक व प्रमाणपत्र
- १७.५ शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी/सीटीईटी) गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- १७.६ पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र (इ. ६ वी ते इ ८ वी / इ. ९ वी ते १० गटातील पदांसाठी )
- १७.७ व्यावसायिक अर्हतेसाठी बी.ए.एलएड / बी.एस्सीएड/बी.एड. / बी. एड / बी. पी. एड ( फक्त शारीरिक शिक्षण विषयासाठी )
- १७.८ पदव्युत्तरपदवी परीक्षा गुणपत्रक व पदव्युत्तरपदवी प्रमाणपत्र (इ. ११ वी ते १२ गटातील पदांसाठी )
- १७.९ पदव्युत्तर पदवीस्तरावरील व्यावसायिक अर्हतेबाबत एम. पी. एड. इत्यादीबाबतचे पदव्यत्तरपदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका ( आरोग्य व शारीरिक शिक्षण या पदासाठी )
- १७.१० स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदासाठी महाराष्ट्र
राज्याचा रहिवासी असल्याबाबत 'अधिवास प्रमाणपत्र' अथवा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांमधील रहिवासी असल्याचा
दाखला
- १७.१९ जातीचा दाखला / जात प्रमाणपत्र (लागू असल्यास )
- १७.१२ जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास )
- १७.१३ समांतर आरक्षणातील लाभासाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असल्याचे प्रमाणपत्र
- १७.१४ समांतर आरक्षणातील लाभासाठी माजी सैनिक असल्याचे प्रमाणपत्र
- १७.१५ समांतर आरक्षणातील लाभासाठी 'पदवीधर
अंशकालीन' असल्याचे सक्षम प्राधिकारी (तहसीलदार) प्रमाणपत्र.
- १७.९६ समांतर आरक्षणातील लाभासाठी 'प्रकल्पग्रस्त'
असल्याबाबतचे प्रमाणपत्र
- १७.१७ समांतर आरक्षणातील लाभासाठी 'भूकंपग्रस्त'
असल्याचे प्रमाणपत्र
- १७.१८ समांतर आरक्षणातील लाभासाठी 'प्रावीण्यप्राप्त
खेळाडू' असल्याबाबतचे विभागीय क्रीडा उपसंचालक यांचा पडताळणी
अहवाल अथवा पडताळणीसाठी प्रस्ताव दाखल केल्याची पोचपावती.
- १७.१९ समांतर आरक्षणातील लाभासाठी 'अनाथ'
असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- १७.२० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- १७.२१ सन १९९१ चे जनगणना / १९९४ चे निवडणूक कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- १७.२२ उन्नत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- १७.२३ उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा.
१८. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील
विशेष अनुज्ञा याचिका क्र. ११२५४/२०१९ मधील दिनांक २४/१०/२०१९ च्या निर्णयानुसार
आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता परीक्षेमध्ये पात्रताविषयक बाबींमध्ये सवलत
घेऊन ती अर्हता प्राप्त केली असेल तर असा उमेदवार त्याच्या मूळ संवर्गातून निवडला
जाण्यास पात्र असेल, तर अशा प्रकारची कोणतीही सवलत न घेता
अशा आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने जर ती अर्हता प्राप्त केली असेल व अंतिम गुण
मूल्यांकनानुसार असा उमेदवार खुल्या प्रवर्गातून पात्र ठरत असेल, तर तो खुल्या प्रवर्गात समाविष्ट होऊ शकेल असे तत्त्व निश्चित झाल्याचे
दिसून येत आहे. त्यानुसार शिक्षक पात्रता परीक्षेत आरक्षित प्रवर्गासाठी असलेली
सवलत घेऊन पात्र ठरलेले उमेदवार त्यांच्या त्यांच्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र
ठरविण्यात आले आहेत, तर आरक्षित प्रवर्गातील ज्या
उमेदवारांनी अशी कोणतीही सवलत घेतलेली नाही असे उमेदवार गुणवत्ता यादीतील
त्यांच्या स्थानानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत,
याची कृपया नोंद घ्यावी.
१९. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - २०२२ प्रविष्ट
होताना दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना वेळेची सवलत, मदतनीस,
प्रश्नांची संख्या कमी इत्यादी प्रकारच्या सवलतींचा लाभ देण्यात
आलेला आहे. अशा उमेदवारांकडे स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या दिव्यांग
प्रकाराचे प्रमाणपत्र असल्याची खात्री करावी. ज्या दिव्यांग उमेदवारांची नियुक्तीसाठी
शिफारस दिव्यांग प्रवर्गात न होता, त्यांच्या पात्रतेनुसार
अन्य प्रवर्गातून झाली असेल, तरीही अशा दिव्यांग
उमेदवारांच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात यावी. अशा
उमेदवाराकडे संबंधित कागदपत्रे/प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. कागदपत्रे / प्रमाणपत्रे
नसल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
२०.कागदपत्र पडताळणीअंती नियुक्तीस पात्र ठरलेल्या
उमेदवारांची नियमानुसार चारित्र्य पडताळणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात
यावी.
२१. नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियमानुसार
शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी.
२२. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, पात्र-अपात्रतेची
कारणे, उमेदवारांचा रुजू अहवाल इत्यादींबाबत पवित्र पोर्टलवर
वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक त्या नोंदी आपल्या लॉगीनवर कराव्यात.
२३. विविध शासन निर्णयांमधील तदतुदींनुसार उमेदवारांच्या
कागदपत्रांची पडताळणी काटेकोरपणे करावी. अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे
निदर्शनास आल्यास त्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील, याची
नोंद घ्यावी.
वरील प्रमाणे कार्यवाही करून नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक संकिर्ण२०२३/प्रक्र १७४/टिएनटी-१ दिनांक २१/०६/२०२३ मधील मुद्दा क्रमांक ७ मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेवून समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS