सेल्फी उपक्रम ; मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत उपक्रम selfie activities; Initiatives under Chief Minister Majhi Shalaa Sundar Shalaa
सेल्फी
उपक्रम ; मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गत उपक्रम
selfie activities; Initiatives under Chief Minister Majhi
Shalaa Sundar Shalaa
राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा,
सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या
शाळांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी
आजमितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत
आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर
शाळा" या अभियानातंर्गत मा.मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्याना उदेशून
लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात
आलेले आहे. या पत्रामध्ये मा.मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या
शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना
गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री
माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे.
राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in
हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग
विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
१. शैक्षणिक घोषवाक्य : अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे
विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी उपक्रमासाठीघोषवाक्य
२. मा.मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी
यांची सेल्फी : विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा.मुख्यमंत्री महोदयांचे संदेश
पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.
मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्र link
या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून
प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला
आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा.मुख्यमंत्री महोदय
यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
३. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय
वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी
घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल
तसेच विदयार्थ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर विदयार्थ्यांनी ऑनलाईन
प्रतिज्ञा घ्यावयाची आहे.
याकरीता www.mahacmletter.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या खाली जोडलेल्या मॅन्यूअल / फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि.१७/०२/२०२४ ते दि. २५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS