पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात सूचना | shikshak Bharti Jahirat Notification by Pavitra Portal
पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात सूचना | shikshak Bharti Jahirat Notification by Pavitra Portal
· अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
- · इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र सलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
- · इ. 1 ली ते इ 5 वी व इ. 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - 2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक
- · पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
- · इ. 6 वी ते इ 8 वी या गटातील इतिहास / भूगोल / सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2 / CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- · इ. 6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान / गणित / गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper / CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- · इ. 6 वी ते इ 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2 / CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- · इ. 9 वी ते इ 10 वी /इ 11 वी ते इ 12 वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- 2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
- · शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये " उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना" या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. सदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शासन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.
- · व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.
- · व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शविलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाच्या पदांचा समावेश आहे.
- · व्यवस्थापनाच्या जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
- · उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयांच्या अध्यापनाच्या दोन विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक अर्हता दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी (किमान द्वितीय श्रेणीमध्ये ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
शिक्षक भरती; पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम
देण्याच्या स्टेप्स
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Whats App Channel- https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS