PAT Exam ; ५ वी, ८ वी वार्षिक परीक्षा २ एप्रिल २०२४ रोजी सुरु होणार | नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT )
५ वी, ८ वी वार्षिक परीक्षा 2 एप्रिल २०२४ रोजी सुरु होणार | 5th, 8th annual exam
will start on 2nd April 2024
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक ७ डिसेंबर २०२३
रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून इयत्ता ५ वी आणि ८ वी
साठी वार्षिक परीक्षा घेण्याचे निश्चित केले आहे. या शासन निर्णयानुसार राज्यातील
राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असणाऱ्या सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या इयत्ता ५ वी आणि
८ वी साठी एप्रिल महिन्यात वार्षिक परीक्षा घेण्यात यावी असे निर्देश आहेत. सदर
शासन निर्णय हा सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या
शाळांसाठी लागू करणेत आला आहे. या शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी वार्षिक
परीक्षा ही द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमावर आधारीत असणार आहे. या वार्षिक
परीक्षांसाठी इयत्ता ५ वी ला प्रथम भाषा, द्वितीय भाषा,
तृतीय भाषा, गणित, व
परिसर अभ्यास हे विषय असतील तर इयत्ता ८ वी ला प्रथम भाषा, द्वितीय
भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र हे विषय असतील तसेच इयत्ता ५ वी आणि ८ वी साठी
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन योजनेतील संकलित मूल्यमापन २ म्हणजेच वार्षिक
परीक्षा असणार आहे. सदर परीक्षेकरिता प्रत्येक शाळांनी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका
तयार करून परीक्षा घेण्यात यावी. शाळांनी प्रश्नपत्रिका विकसन करताना राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी त्यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेसाठी नमुना
प्रश्नपत्रिका तसेच संविधान तक्ते उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा उपयोग करून
प्रश्नपत्रिका तयार कराव्यात असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
इयत्ता पाचवी व आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी ज्या
विषयात उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत शाळेमार्फत त्या विषयासाठी अतिरिक्त पूरक
मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन
महिन्याच्या आत पुनर्परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल पुनर्परीक्षाचे आयोजन
देखील उपरोल्लेखित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित शाळांनी करावयाचे आहे.
पुनर्परीक्षा घेताना शाळांनी कोणती दक्षता घ्यावयाची याबाबतचे निर्देश संबधित शासन
निर्णयात दिलेले आहेत.
संकलित मूल्यमापन २ चे वेळापत्रक
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT ) शैक्षणिक वर्ष
२०२३ - २४ या वर्षात राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी
अनुदानित शाळांमधील इयत्ता ३ री ते ८ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम
भाषा, गणित व तृतीय भाषा ( एकूण १० माध्यम ) करिता तीन
नियतकालिक मूल्यांकन (PAT) चाचण्यांचे आयोजन करण्यात येत
आहे. त्यापैकी आतापर्यंत पायाभूत चाचणी व संकलित मूल्यमापन १ चे आयोजन करण्यात आले
असून संकलित मूल्यमापन २ चे आयोजन दिनांक २, ३ व ४ एप्रिल
२०२४ या कालावधीमध्ये राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी
अनुदानित शाळांमध्ये एकाच वेळी करण्यात येणार आहे.
इयत्ता ५ वी, ८ वी वार्षिक परीक्षा २०२४
साठी नमुना सराव प्रश्नपत्रिका
इयत्ता ३ री, ४ थी, ६ वी, ७ वी करिता प्रथम भाषा, गणित
व तृतीय भाषा या तीन विषयांकरिता नियतकालीक मुल्यांकन चाचणी हीच संकलित मूल्यमापन
२ असेल त्यामुळे या विषयांसाठी स्वतंत्रपणे संकलित मूल्यमापन -२ घेण्यात येणार
नाही व उर्वरित विषयांचे संकलित मूल्यमापन २ शाळांनी त्यांच्या स्तरावर
प्रश्नपत्रिका विकसित करून घ्यावयाचे आहे.
PAT महाराष्ट्र या ChatBoat वर भरणे सुविधा उपलब्ध | प्रशिक्षण | समस्या व उपाय
इयत्ता ५ वी व ८ वी साठी मात्र नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) ही संकलित मूल्यमापन २ असणार नाही. या दोन इयत्तांसाठी वार्षिक परीक्षा ही स्वतंत्रपणे घेण्यात येईल त्यामुळे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांनी दिनांक २, ३ व ४ एप्रिल २०२४ या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणीचे आयोजन निश्चित केले असल्यामुळे सदर चाचणी नंतरच वार्षिक परीक्षेचे आयोजन शाळांनी करावे, असे परिषदेच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. सर्व शाळांनी वरील सूचनांप्रमाणे आपल्या स्तरावर इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षा शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे अंमलबजावणी करून यशस्वीपणे परीक्षा पार पाडाव्यात, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे मार्फत करण्यात येत आहे.
चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना
१. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल
याची दक्षता घ्यावी.
२. चाचणीचे माध्यम व विषय:- सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. (मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, गुजराती, बंगाली, सिंधी) इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांच्या चाचण्यांचे आयोजन करण्यात येईल.
३. चाचणीचा अभ्यासक्रम :- द्वितीय सत्रातील अध्ययन निष्पत्तींवर
आधारित असेल.
४. चाचणीचे स्वरुप:- सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन
कार्यपद्धतीमधील तरतूदीनुसार सदर चाचण्यांची इयत्तानिहाय गुणविभागणी असेल.
त्यामध्ये लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक प्रश्नांचा समावेश असेल.
५. चाचणी निर्मिती सदर चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित
व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्यांची निर्मिती राज्य स्तरावरून राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत करण्यात येईल.
६. चाचणी कोणासाठी संकलित मूल्यमापन २ साठी छापील परीक्षा
साहित्याचा पुरवठा (चाचणी प्रश्नपत्रिका, उत्तरसूची तसेच शिक्षक
सूचना) शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच
खाजगी अनुदानित शाळांनाही करण्यात येईल
७. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी शाळेत उपस्थित राहतील
याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी
त्याची चाचणी घेण्यात यावी.
८. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका देळापत्रकाप्रमाणे त्या
त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
९. शिक्षकांनी चाचणीचे पर्तीवर नमुना प्रश्न निर्मिती करुन विद्यार्थ्याचा सराव घ्यावा व मार्गदर्शन करावे
१०. दिव्यांग विद्यार्थ्याच्या
बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग
प्रकारानुसार शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार तज्छ /
विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
११. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासून गुण नोंद करावी.
१२. चाचणीचे गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर
दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात करावी.
१३. मूल्यमापन / चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी
विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी. जेणेकरून संकलित
मूल्यमापन चाचणी १२ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.
१४. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांचे संकलित मूल्यमापन २ चाचणी साहित्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना व खाजगी अनुदानित शाळांना छापील स्वरुपात पुरवठा करण्यात येणार असलेमुळे सदर विषयांसाठी वेगळ्या चाचणीचे आयोजन शाळांनी करु नये.
१५. तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये शासन निर्णय राज्यमंडळाचा
अमासक्रम राबविण या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी लागू आहे. शासकीय व स्थानिक
स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळा तसेच इतर व्यवस्थापनाच्या शाळानी
राज्यस्तरावरून परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणा- या नमुना सराव
प्रश्नपत्रिकांचा वापर करून समांतर प्रश्नपत्रिका तयार करून इयत्ता ५ वी व ८ वी
साठी वार्षिक परीक्षा घ्याव्यात.
१६. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित
शाळांनी इयत्ता ३ री ते ८ वी (प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा) या
विषयांच्या संकलित मूल्यमापन चाचणी २ पुन्हा नव्याने घेवू नयेत. या चाचण्यांची
गुणनोंद सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन नोंदवहीमध्ये घेण्यात यावी. तसेच इतर
विषयांच्या चाचण्या शिक्षकांनी आपल्या स्तरावर राज्यस्तर चाचणीच्या धर्तीवर तयार
करून संकलित मुल्यमापन २ चे मूल्यमापन करावे. इयत्ता ५ वी व ८ वी वगळता उपरोक्त
इयत्ता ३ री ते ८ वीच्या वर्गासाठी चाचणीत मिळालेले गुण हे संकलित मूल्यमापन
चाचणीचे गुण समजण्यात यावेत.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS