राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या नियंत्रणाखाली “विद्या समीक्षा केंद्र (VSK) Vidya Samishka Kendra (VSK) ” कार्यान्वित करण्यात येत
विद्या समीक्षा केंद्र (VSK) | Vidya Samishka Kendra (VSK)
शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक
वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील
प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान
करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा
लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या नियंत्रणाखाली “विद्या समीक्षा केंद्र
(VSK) Vidya Samishka Kendra (VSK) ” कार्यान्वित करण्यात येते.
विद्या समीक्षा केंद्राची Vidya Samishka
Kendra (VSK)उद्दिष्टे:
- ·
समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पांतर्गत
राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण
करणे.
- · शैक्षणिक व भौतिक उपक्रम / योजनांचा राज्य स्तरावरून मागोवा घेणे आणि क्षेत्रिय अधिकारी व शिक्षक यांचे डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी सक्षमीकरण करणे.
- ·
प्रवेशित विद्यार्थी, शालाबाह्य
विद्यार्थी, गळती झालेले विद्यार्थी, मुक्त
शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षणाच्या प्रवाहात समाविष्ट
बालकामगार, दिव्यांग विद्यार्थी, व्यावसायिक
शिक्षण घेणारे विद्यार्थी, गणवेश व पाठ्यपुस्तक वितरण,
शिष्यवृत्ती, आर्थिक लाभाच्या योजना, शाळास्तरावरील मूल्यमापन, विद्यार्थी व शिक्षक यांना
आवश्यक मदत, प्रोत्साहन व पुरस्कार इ. बाबींवर लक्ष ठेवणे.
- · विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी व उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकांना मदत करणे.
- · डेटा आधारे तातडीने लक्ष देण्यासाठीची गरजाक्षेत्रे निश्चित करून निर्णय घेण्यासाठी मदत करणे.
- ·
शिक्षण व्यवस्थेस पूरक ठरणाऱ्या सर्व
संबंधितास माहिती, जागरुकता आणि मदत करण्यासाठी राज्यस्तरावर
मदत कक्ष (Help Desk) तयार करणे.
- ·
सुनिश्चित शाळा मानकांनुसार शाळांची
सद्यस्थिती व सुधारात्मक कामगिरीचा Real Time माहिती दर्शविणारा
डॅशबोर्ड विकसित करणे.
- · राज्यातील सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील समन्वय वाढवून त्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे.
- ·
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या
विविध उपक्रम / योजना / प्रकल्पांचे Real time संनियंत्रण करणे.
- ·
समग्र शिक्षा, स्टार्स
प्रकल्प, पी.एम. श्री. तसेच शासनाचे विविध उपक्रम / योजना /
प्रकल्पांचे वार्षिक कार्ययोजना व अंदाज पत्रक तयार करण्यास व शासन स्तरावर धोरण
निश्चितीस मदत करणे.
- · शिक्षण व्यवस्थेतील सर्व संस्थांच्या लेखा व वित्त विषयक बाबींचे डॅशबोर्ड विकसित करून संनियंत्रण करणे.
Vidya Samishka Kendra (VSK) विद्या समीक्षा केंद्रातील
शैक्षणिक कामकाजासाठी विद्या समन्वयक (Academic Coordinator) म्हणून शिक्षक संवर्गातून आवश्यकतेनुसार मनुष्यबळ प्रतिनियुक्ती / उसनवार
तत्वावर उपलब्ध करून घेतील. तसेच संगणक प्रोग्रॅमर / सहाय्यक संगणक प्रोग्रॅमर,
Data Scientist, तांत्रिक मनुष्यबळ तसेच स्वच्छता व सेवकवर्गीय
कर्मचारी बाह्य संस्थांकडून उपलब्ध करून घेतील.
विद्या समीक्षा केंद्राकरिता डेटा सिस्टीम व डॅशबोर्ड विकसित
करण्यासाठी तसेच अन्य बाबींसाठी विविध संस्थांसोबत करारनामा करण्याचे अधिकार यांना
असतील.
प्रशिक्षण वा गुणवत्तेसंबंधात ज्या उपक्रमाची अंमलबजावणी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत होत असेल तर त्यासंबंधीचा डॅशबोर्ड अद्ययावत ठेवण्याची
जबाबदारी असेल.
संबंधित विषयाच्या डॅशबोर्ड विकसनाच्या प्रक्रियेत संबंधित
संचालनालये सक्रीय सहभाग घेतील.
संबंधीत डॅशबोर्ड वरील डेटाचे विश्लेषण करून संबंधित
संचालनालये कृती कार्यक्रमाची आखणी करतील.
विद्या समीक्षा केंद्राची (VSK) कार्यपध्दती:-
- संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे हे नामांकित
संस्थांच्या मदतीने माहिती संकलित व विश्लेषित करण्यासाठी आवश्यक यंत्रणा विकसित
करतील.
- सदर यंत्रणा विकसित करण्यासाठी शासनाच्या सरल, शालार्थ,
सेवार्थ, यु-डायस पोर्टल व संबधित शासकीय
संस्थांकडील डेटाबेसचा उपयोग करण्यात येईल.
- विकसित केलेल्या Chatbot/App/ Platform इत्यादींद्वारे
शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती, विविध लाभाच्या योजना,
प्रशिक्षणे, चाचण्या, शाळाभेटी
इत्यादी बाबींची माहिती विद्या समीक्षा केंद्राच्या सर्व्हरवर संकलित केली जाईल.
- विद्या समीक्षा केंद्राच्या डॅशबोर्डमध्ये उपलब्ध विविध प्रकारच्या माहितीचा अहवाल तयार होईल.
- माहितीचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य./ योजना) यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून दिला जाईल.
- विद्या समीक्षा केंद्रामार्फत संकलित केली जाणारी माहिती
अन्य संस्थांकडून Chatbot /App/Platform / Links द्वारा संकलित
केली जाणार नाही वा त्याची द्विरुक्ती होणार नाही याबाबतची दक्षता राज्य व जिल्हा
स्तरावर घेण्यात येईल.
- ज्या संस्था विद्या समीक्षा केंद्राच्या माहिती व्यतिरिक्त शिक्षण विभागाशी संबधित इतर माहिती संकलित करीत असतील त्यांनी प्रस्तुत माहिती ही विद्या समीक्षा केंद्राच्या सर्व्हरवर संकलित करणे बंधनकारक राहील.
- विद्या समीक्षा केंद्रामार्फत संकलित माहिती शाळांकडून अहवाल स्वरुपात कोणत्याही स्तरावरून मागविली जाणार नाही. जेणेकरून शिक्षकांच्या कामकाजात वाढ होणार नाही.
विद्या समीक्षा केंद्राची प्रत्यक्ष अंमलबजावणी:-
- स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ.१० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. या बाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना आयुक्त (शिक्षण) यांचेद्वारा निर्गमित करण्यात येतील.
- दिक्षा, निष्ठा, राष्ट्रीय
संपादणूक सर्वेक्षण (NAS), राज्य संपादणूक सर्वेक्षण (SLAS)
PGI, पी.एम. पोषण, यु-डायस व PeriodicAssesment Test (PAT) यांचे डॅशबोर्ड संबंधित विभागांकडून प्रसारित
करण्यात येत आहेत.
- विद्यार्थ्यांच्या सरावासाठी ऑनलाईन पद्धतीने इ. २ री व ३ री
साठी भाषा व गणित या विषयाचा तर इ.४ थी ते ८ वी साठी भाषा, गणित
व विज्ञान या विषयांचा अध्ययन निष्पत्ती निहाय साप्ताहिक स्वाध्याय सुरु करण्यात
येत आहे.
टप्याटप्याने इतर उपक्रम सुरु करण्याविषयीच्या सूचना संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेद्वारा स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS