पुढील शैक्षणिक वर्षात होणार या पाठ्यपुस्तकात बदल
पुढील शैक्षणिक वर्षात होणार या पाठ्यपुस्तकात बदल
Changes in this textbook will be made in the next academic
year
शैक्षणिक वर्ष २०२४ - २०२५ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भाने
झालेल्या बदलाबाबतची माहिती या पोस्टद्वारे कळविण्यात येत आहे.
- १) शैक्षणिक वर्ष २०२३ - २०२४ (जून २०२३) पासून पथदर्शी
स्वरूपात इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विदयार्थ्यांसाठी मराठी, हिंदी,
इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित
पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातीलपाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत. तसेच या संदर्भाने आवश्यक त्या
सूचना आपणास कळविण्यात आलेल्या आहेत.
- २) शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ (जून २०२४) पासून राज्यातील
सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशत: अनुदानित तसेच खाजगी व विना अनुदानित शाळांमधील इयत्ता १
ते ८ वीच्या विदयार्थ्यांसाठी गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली
या माध्यमांसाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये
विभागणी करून एकात्मिक स्वरुपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. या
पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट करण्यात
आलेली ...आहेत. सबब शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी
विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.
बालभारतीच्या इ १ ली ते 8 वी साठी वाचन आणि स्वाध्याय पुस्तिका सर्वांना उपलब्ध
- ३) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विदयार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील.
- ४) शैक्षणिक वर्ष २०२५ २०२६ साठी बालवाटीका, बालवाडी,
अंगणवाडी तसेच इयत्ता १ ली व इयत्ता २ रीसाठी प्रस्तावित नवीन राज्य
अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे.
त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ (जून २०२४) हे इयत्ता १ ली व इयत्ता २ या
इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या
पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.
तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद
राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर
सर्व संबंधितांनी घ्यावी.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url