List of documents required in the case of recognition of teachers in minority schअल्पसंख्याक शाळांतील शिक्षक मान्यता प्रकरणी आवश्यक कागद पत्रांची यादी
अल्पसंख्याक शाळांतील शिक्षक मान्यता प्रकरणी आवश्यक कागद पत्रांची यादी
List
of documents required in the case of recognition of teachers in minority
schools
१. संस्था असल्याबाबत, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राज्य अल्पसंख्याक आयोग यांच्याकडील कायम मान्यता प्रमाणपत्र अथवा
अल्पसंख्याक विकास विभाग यांच्याकडील प्रमाणपत्र
२. संस्थेद्वारा संचलित
शाळांची यादी
३. नियुक्ती करण्यात आलेल्या
वर्षापासूनच्या संच मान्यता
४. नियुक्ती करण्यांत
अलेल्या वर्षापासूनच्या कर्मचारी कार्यरत यादी, संस्थेची जेष्ठता यादी
५. पद रिक्त झाल्याचा पुरावा
- अ. ज्या कर्मचा-याचे पद रिक्त झालेले असेल त्या बाबतीत संबंधिताचा महालेखापाल यांनी मंजूर केलेल्या सेवानिवृती वेतनाचा आदेश (पिपिओ) ऑर्डर किंवा सेवा पुस्तकांचे पहिले व सेवामुक्त केल्याची नोंद असलेल्या सेवा पुस्तकातील पानाची सत्यप्रत
- ब. कर्मचा-यांचे निधन झालेले
असल्यास मृत्यु प्रमाणपत्र, संस्था
नियुक्ती आदेश, कुटुंब निवृत्ती वेतन
- क. कर्मचा-यांच्या
राजिनाम्यामुळे पद रिक्त झाले असेल तर राजिनाम्याची सत्यप्रत, संस्थेचा ठराव, सेवामुक्त
केल्याचा प्रमाणपत्र, सेवापुस्तकातील नोंद असल्याया पानाची
सत्यप्रत
- ङ. त्या नवीन शाळा / वाढीव
तुकडी/वर्ग असल्यास शासन निर्णय, विभागीय
शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्या मान्यता पत्राची
प्रत, तुकडी/वर्ग/शाळा अनुदानावर आल्याचे आदेश
६. पद भरतीसाठी परवानगी
घेतली असल्यास नाहरकत प्रमाणपत्र / परवानगी पत्र
७. पद भरतीसाठी जाहिरात
८. लेखा परीक्षा/मुलाखतीस
उपस्थित उमेदवार यादी
९. निवड समितीने निवड केल्याची
निवड यादी/गुणदान तत्का
१०. निवड झालेल्या
उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी शालेय समितीचा ठराव
११. संस्थेचा नियुक्ती आदेश
१२. रुजु अहवाल
१३. उमेदवारांची शैक्षणिक व
व्यावसायिक कागदपत्र
१४. शिक्षणाधिकारी यांचे
वैयक्तिक मान्यता आदेश
१५. शिक्षण संचालनालयाचे पत्र दि.१५/०६/२०१७ अनुसार शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत शालार्थ प्रणालीमध्ये नावाचा समावेश करण्यासाठी पत्र व प्रपन्न.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS