राज्य अभ्यासक्रम आराखडा,राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024,राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024,State Curriculum Plan – Foundation Level 2024
राज्य अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत स्तर २०२४ | State
Curriculum Plan – Foundation Level 2024
राज्य अभ्यासक्रम आराखड्याबद्दल....
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० मध्ये शैक्षणिक स्तरांची
पुनर्रचना करण्यात आली. ही पुनर्रचना प्रामुख्याने अभ्यासक्रम व अध्यापनशास्त्र
पद्धतींशी संबंधित आहे. या धोरणात सूचविल्यानुसार ५+३+३+४ या नवीन संरचनेमध्ये वय
वर्षे ३-८ या पहिल्या पाच वर्षांच्या टप्प्याला 'पायाभूत स्तर'
असे संबोधण्यात आले आहे. या स्तरावर देण्यात येणाऱ्या शिक्षणाची
मूलतत्त्वे कोणती असावीत यांवर धोरणामध्ये सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. या
विवेचनाच्या आधारे पायाभूत स्तरासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात
आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (२०२०) व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (२०२२)
यांतील आशयाचा संदर्भ घेऊन व महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व भाषिक पार्श्वभूमीला सुसंगत ठरेल, अशा
प्रकारे हा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे.
अभ्यासक्रम
अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाची ध्येये व उद्दिष्टे साध्य
करण्याच्या दृष्टीने कोणत्याही शिक्षण व्यवस्थेमध्ये विदयार्थ्यांना देण्यात
येणाऱ्या विविध अनुभवांची सुसंबद्ध रचना.
अभ्यासक्रमामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो
ध्येये, लक्ष्य, पाठ्यक्रम,
अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचा आशय शिक्षणशास्त्रीय पद्धती आणि
मूल्यमापन, शैक्षणिक साधने, शैक्षणिक
वातावरण, शिक्षण व्यवस्थेची संस्कृती इ. काही घटक असे आहेत
की त्यांचा अभ्यासक्रमाशी जवळचा संबंध आहे आणि ते अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर
प्रत्यक्ष परिणाम करतात. अभ्यासक्रम यशस्वीरीत्या राबवण्यासाठी शिक्षक आणि
त्यांच्या क्षमता, पालक आणि समुदायाचा सहभाग, शिक्षणसंस्थांमधील प्रवेशप्रक्रिया, उपलब्ध साधने,
प्रशासन व्यवस्था हे सर्व घटक महत्त्वाचे ठरतात.
अभ्यासक्रम आराखडा
भारतातील वैविध्य लक्षात घेऊन ते जोपासणारे अभ्यासक्रम
विकसित करू शकणाऱ्या सक्षम शैक्षणिक संस्था आणि शिक्षणवेत्ते देशामध्ये तयार होतील
असे भाकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मध्ये केले आहे. अशाच प्रकारे आपल्या
राज्यातील वैविध्य लक्षात घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास सर्व राज्ये
संविधानानुसार व RTE नुसार वचनबद्ध आहेत हीच अपेक्षा
अभ्यासक्रम आराखड्याकडूनही केली जाते. आराखड्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे, ध्येये आणि संरचना यांचा अंतर्भाव असतो. या घटकांच्या आधारे पाठ्यक्रम,
अध्ययन- अध्यापन साहित्य, कार्यपुस्तिका,
पाठ्यपुस्तके आणि मूल्यांकन पद्धती विकसित करणे अपेक्षित आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याची उद्दिष्टे
धोरणांमध्ये विशद केल्याप्रमाणे अभ्यासक्रम व शिक्षण पद्धती
यांच्याद्वारे राज्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, हे
राज्य अभ्यासक्रम आराखड्याचे उद्दिष्ट आहे. हा बदल केवळ शिक्षणविषयक कल्पनांपुरताच
मर्यादित नसून शैक्षणिक संस्थांमधील दैनंदिन उपक्रमांमध्ये हा बदल घडणे अपेक्षित
आहे. तसेच हा बदल केवळ अभ्यासक्रमापुरता मर्यादित नसून शाळेतील वातावरण, संस्कृती यांमध्येही बदल होणे अपेक्षित आहे. विदयार्थ्याला मिळणाऱ्या
एकंदर शैक्षणिक अनुभवांमध्ये नवीन अभ्यासक्रमातून सकारात्मक बदल घडवून आणणे,
हे महत्त्वाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून राज्य अभ्यासक्रम आराखडा
तयार करण्यात आला आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याची वैशिष्ट्ये
शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक प्रशिक्षक, परीक्षा मंडळे, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम,
पाठ्यपुस्तके विकसित करणारे गट, शालेय शिक्षण
विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, एकात्मिक बाल विकास
योजना (ICDS) विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांना
स्वतःचे काम परिणामकारकरीत्या करण्यासाठीचा विचार आराखड्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे
हा आराखडा वाचणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे शिक्षण कशा प्रकारे असेल व त्यामध्ये
आपण पालक, समुदायाचा एक सदस्य किंवा जबाबदार नागरिक म्हणून
कोणती भूमिका पार पाडायला हवी हे समजेल.
शिक्षणामध्ये सकारात्मक बदल घडवण्यामध्ये शिक्षकांची भूमिका
ही महत्त्वाची आहे. एकंदर शिक्षणप्रक्रियेच्या केंद्रस्थानी बालक असते. त्यामुळे
शिक्षक व बालक या दोघांना केंद्रस्थानी मानून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
बदलासंबंधी केवळ तात्त्विक मांडणी केल्यास ते प्रत्यक्षात कसे आणायचे, याबद्दल
संभ्रम निर्माण होण्याचा संभव असतो. म्हणून, मार्गदर्शक
तत्त्वे प्रत्यक्षात आणणे सुलभ जावे या दृष्टीने आराखड्यामध्ये मांडणी करण्यात आली
आहे. पायाभूत स्तरामध्ये सर्वांगीण विकासाची क्षेत्रे, या
क्षेत्रांशी संबंधित बालकांमध्ये विकसित करण्याच्या क्षमता व त्यासाठी वयानुरूप
अध्ययन निष्पत्ती या स्वरूपात आरखड्याचा संपूर्ण पट मांडण्यात आला आहे. तसेच या
अध्ययन निष्पत्ती साध्य होण्यासाठी आवश्यक अनुभव, शिक्षणपद्धती,
मूल्यांकन, वेळेचे नियोजन यांसारख्या
घटकांसाठी संयुक्तिक उदाहरणे व नमुने देऊन आवश्यक स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
[राज्य अभ्यासक्रम आराखडा - पायाभूत स्तर २०२४ डाऊनलोड]
या आराखड्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची अपेक्षा
व्यक्त करण्यात आली असून, वस्तुस्थितीचे भान ठेवून सर्व साधनांनी
युक्त शिक्षण केंद्र कशा प्रकारचे असेल, हे सुस्पष्ट केले
आहे.
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS